Biography of Indira Gandhi in Marathi

Biography of Indira Gandhi in Marathi शिक्षण अलाहाबाद, पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण काही कारणास्तव पदवी न मिळविता भारतात त्या परत आल्या.

Biography of Indira Gandhi in Marathi

Biography of Indira Gandhi in Marathi

(इ.स. १९१७ ते १९८४)
  • संपूर्ण नाव इंदिरा फिरोज गांधी.
  • जन्म १९ नोव्हेंबर, १९१७.
  • जन्मस्थान अलाहाबाद (उत्तर प्रदेश).
  • वडील जवाहरलाल.
  • आई कमला
  • शिक्षण अलाहाबाद, पुणे, मुंबई, कलकत्ता या ठिकाणी त्यांचे शिक्षण झाले. उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमधील ऑक्सफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला पण काही कारणास्तव पदवी न मिळविता भारतात त्या परत आल्या.
  • विवाह फिरोज गांधी यांच्या सोबत (इ. स. १९४२ मध्ये). 

Biography of Indira Gandhi in Marathi

Indira Gandhi कार्य

  • इ.स. १९३० च्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळी काँग्रेसच्या स्वयंसेवकांना साहाय्य करण्यासाठी त्यांनी लहान मुलांची ‘वानरसेना’ स्थापन केली. 
  • इ.स. १९४२ च्या ‘ चले जाव ‘ आंदोलनात त्यांनी भाग घेतला आणि त्याबद्दल तुरुंगवास भोगला.
  • इ.स. १९५५ मध्ये राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीच्या त्या सदस्या बनल्या. पुढे इ.स. १९५९ मध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा म्हणून त्यांची निवड झाली.  
  • इ.स. १९६४ मध्ये पंडित नेहरूंच्या मृत्यूनंतर लालबहादूर शास्त्री हे भारताचे पंतप्रधान बनले. त्यांच्या मंत्रिमंडळात इंदिराजींनी माहिती व नभोवाणी खात्याच्या मंत्री म्हणून काम पाहिले.
  • इ.स. १९६६ मध्ये लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर Indira Gandhi यांची देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली. भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होण्याचा मान त्यांना मिळाला.
  • इ.स. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडून जुन्या काँग्रेस नेत्यांच्या नेतृत्वाखाली सिंडिकेट काँग्रेस व Indira Gandhi यांच्या नेतृत्वाखाली इंडिकेट काँग्रेस असे दोन वेगळे पक्ष अस्तित्त्वात आले. याच वर्षी त्यांनी पुरोगामी व लोककल्याणकारी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्याची जोरदार मोहीम उघडली. प्रथम त्यांनी देशातील चौदा बड्या बँकांचे राष्ट्रीयीकरण केले. याशिवाय संस्थानिकांचे तनखे रद्द करण्याचा निर्णय घेतला.
  • इ.स. १९७१ मध्ये इंदिराजींनी लोकसभा विसर्जित करून लोकसभेची मुदतपूर्व निवडणूक घोषित केली. या निवडणुकीमध्ये त्यांनी ‘गरिबी हटाव’ ची घोषणा दिली. या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पक्ष प्रचंड बहुमताने विजयी झाला.

Biography of Indira Gandhi in Marathi

  • काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे त्यांच्या हाती केंद्रित झाली आणि त्या काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या बनल्या. भारतावर सतत आक्रमण करण्याऱ्या पाकिस्तानच्या पूर्व बंगाल मधील गांजलेल्या प्रजेला स्वतंत्र करण्यासाठी लष्करी मदत करून त्यांनी भारतद्वेष्ट्या पाकिस्तानचे ‘बांगला देश ‘व’ पाकिस्तान’ असे दोन तुकडे केले. तत्पूर्वीच Indira Gandhi नी पाकिस्तानचे अमेरिकेशी असलेले घनिष्ठ संबंध विचारात घेऊन मोठ्या धूर्तपणे इ.स. १९७१ मध्ये सोव्हिएत युनियनशी वीस वर्षांचा ऐतिहासिक असा मैत्री व परस्पर सहकार्य करार घडवून आणला. त्यांची ही असामान्य कामगिरी लक्षात घेऊन राष्ट्रपतींनी त्यांना इ.स. १९७१ मध्ये ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करून गौरव केला.
  • इ.स. १९७२ मध्ये इंदिराजींनी पाकिस्तानशी द्विपक्षीय ‘सिमला करार’ करून आपल्या मुत्सद्देगिरीचे दर्शन घडविले.
  • इ.स. १९७५ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिराजींची रायबरेली मतदार संघातून लोकसभेवर झालेली निवड अवैध ठरविली.
  • Indira Gandhi नी इ.स. १९७५ मध्ये आणीबाणी लागू केली. पण भारतातील लोकशाहीप्रेमी जनता त्यामुळे नाराज झाली व इ.स. १९७७ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला हार खावी लागली. स्वतः Indira Gandhi रायबरेली मतदारसंघातून पराभूत झाल्या. परिणामी जनता पक्षाच्या हातात सत्ता गेली. पण त्या पक्षाचे व सरकारमधील घटक पक्षाचे भांडण लागल्याने इ.स. १९८० मध्ये मुदतपूर्व झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने दैदीप्यमान विजय मिळविला आणि इंदिराजी पुन्हा भारताच्या पंतप्रधान झाल्या

Biography of Indira Gandhi in Marathi

  • इ.स. १९८२ मध्ये दिल्लीत नवव्या आशियाई स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. 
  • इ.स. १९८३ मध्ये नवी दिल्लीत अलिप्ततावादी राष्ट्रांची सातवी शिखर परिषद भरविली गेली. या परिषदेचे तसेच अलिप्त राष्ट्र चळवळीचे नेतृत्व Indira Gandhi यांच्याकडे सोपविण्यात आले.
  • पाकिस्तानच्या चिथावणीने पंजाबमधले शीख अतिरेकी पंजाबचे स्वतंत्र ‘खलिस्तान’ नावाचे राष्ट्र निर्माण करण्यासाठी विघातक कारवाया करू लागले.
  • शीख अतिरेक्यांनी अमृतसरमधील सुवर्णमंदिरासारख्या पवित्र जागेत शस्त्रास्त्रे ठेऊ लागले. त्यामुळे इंदिराजींनी व्यापक देशहितासाठी सुवर्णमंदिरात सैन्य घुसविले. सैनिकी कारवाई करून देशद्रोही अतिरेक्यांना मारावे लागले या घटनेने काही अविचारी शिखांची माथी भडकली ३१ ऑक्टोबर, १९८४ रोजी सतवंतसिंग व बेअतसिंग या शरीररक्षकांनीच त्यांची गोळ्या घालून भ्याड हत्या केली.

पुरस्कार

  • इ.स. १९७१ मध्ये ‘भारतरत्न’.

विशेषता 

  • भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान.
  • भारतरत्न मिळविणारी पहिली महिला.

मृत्यू

३१ ऑक्टोबर , १९८४ रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

Indira Gandhi Mahiti

Indira Gandhi Mahiti : Indira Gandhi यांचे असे काही निर्णय सांगू शकता ज्यामुळे भारताचे चित्र बदलले गेले? पंडित जवाहरलाल नेहरू यांची कन्या श्रीमती Indira Gandhi यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 रोजी एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. पुढे चालून त्या देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

‘आयरन लेडी’ नावाने प्रसिद्ध असणाऱ्या Indira Gandhi यांची भारतीय राजकारणात एक वेगळी ओळख आहे.

Indira Gandhi यांच्या अनेक निर्णयांमुळे जगातील ताकदवान नेत्यांमध्ये त्यांचं नाव आजही गणलं जातं. ज्या काळात चूल आणि मूल हेच बाईचं कार्यक्षेत्र होतं, त्याकाळात त्यांनी भारताच्या उज्ज्वल भविष्याचा पाया रचला.

Indira Gandhi त्यांची काही महत्वपूर्ण निर्णय 

▪️ बँकांचे राष्ट्रीयकरण : Indira Gandhi यांनी बँकांचा राष्ट्रीयकरणाचा निर्णय घेतला,या निर्णयामुळे बँकावरचे औद्योगिक घराण्यांचे वर्चस्व संपुष्टात आले.

▪️ राजा-महाराजांचे भत्ते बंद : स्वातंत्र्यापूर्वीची देशातील 500 छोटी-मोठी संस्थाने भारतात सामिल करुन घेण्यासाठी भारत सरकारद्वारे दरवर्षी राजभत्ता दिला जायचा. Indira Gandhi यांनी हा राजभत्ता रद्द करण्याचा निर्णय घेतला.

▪️ बांग्लादेशचा उदय : भारताच्या फाळणीनंतर बंगालपासून पूर्व पाकिस्तान बनला होता. तेथील नागरिकांना अधिकार नव्हते. भारताला बांग्लादेशियांच्या विनंतीनंतर या समस्येमध्ये हस्तक्षेप करावा लागला. 1971 चे युद्ध झाल्या नंतर बांगलादेश चा उदय झाला.

▪️ ऑपरेशन ब्लू स्टार : स्वतंत्र ‘खलिस्तान’ची मागणी करणाऱ्या दहशतवाद्यांनचा ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ अंतर्गत खात्मा केला गेला . या ऑपरेशनमुळे स्वतंत्र खलिस्तानची मागणी धुडकावून लावण्यात आली.

त्यांनी जीवनात अनेक क्षेत्रात लौकिक प्राप्त केला. त्यांना 1972 मध्ये भारतरत्न पुरस्कार, 1972 मध्ये बांगलादेश मुक्तीकरिता मेक्सिकन अकादमी पुरस्कार, 1973 मध्ये एफएओ चे दुसरे वार्षिक पदक व 1976 मध्ये नागरी प्रचारिणी सभेकडून साहित्य वाचस्पती (हिंदी) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 1953 साली श्रीमती Indira Gandhiं यांना अमेरिकेच्या ‘मदर’ पुरस्काराने, मुसद्देगिरीतील उत्कृष्ट कार्याबद्दल इटलीने ‘इसाबेला डी’इस्टे’ पुरस्कार व येल विद्यापीठाने हाउलंड मेमोरियल पुरस्कार देऊन गौरविले. फ्रांस जनमत संस्थेच्या सर्वेक्षणानुसार त्या 1967 व 1968 मध्ये फ्रान्सच्या जनतेमधल्या सर्वात लोकप्रिय महिला होत्या. 1971 मध्ये अमेरिकेच्या विशेष गैलप जनमत सर्वेक्षणानुसार त्या जगातील सर्वात लोकप्रिय महिला होत्या. प्राण्यांच्या संरक्षणासाठी 1971 मध्ये अर्जेंटिना सोसायटीकडून त्यांना मानद उपाधी देण्यात आली होती.


Indira Gandhi Family : संजय, राजीव, मेनका, सोनिया, प्रियांका आणि राहुल यांच्यासह

Biography of Indira Gandhi in Marathi

2 thoughts on “Biography of Indira Gandhi in Marathi”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon