Anandi Gopal Joshi

Anandi Gopal Joshi Biography in Marathi

Anandi Gopal Joshi Biography in Marathi भारतातील पहिल्या महिला डॉक्टर डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांनी समाजाला दाखवून दिले की महिला ही पुरुषांपेक्षा कुठल्याही क्षेत्रांमध्ये कमी नसतात. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1878 रोजी झाला ईश्वराने त्यांना फक्त 21 वर्षाचे आयुष्य दिले पण त्या आजच्या एकविसाव्या शतकात सुद्ध महिला समक्षीकरण चळवळीच्या प्रेरणा स्त्रोत्र आहे.

Anandi Gopal Joshi त्यांचा जन्म 31 मार्च 1865 रोजी पुणे मध्ये झाला. वयाच्या नवव्या वर्षी खेळण्याच्या बागडण्याच्या वयात त्यांचा त्यांच्यापेक्षा 20 वर्षांनी जास्त मोठे असलेले गोपाळराव जोशी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. तात्कालीन प्रख्यात समाज सुधारक गोपाळ हरी देशमुख यांचा गोपाळराव जोशींवर प्रभाव होता.

Anandi Gopal Joshi (biography in marathi)

गोपाळराव कारकून म्हणून नोकरी करीत पण ते सुधारणावादी होते समाजाचा उग्र विरोध असूनही त्यांनी त्यांची पत्नी आनंदी बाईला घरी शिकवण्यास सुरुवात केली. त्या काळात मुलींना शाळेत पाठविले जात नसत चूल आणि मूल एवढेच त्यांचे जग होते आनंदीबाईंनी उच्च शिक्षण घ्यावे यासाठी गोपाळराव जोशी स्वतः पत्नीला प्रोत्साहन देत असत गोपाळराव जोशी संस्कृत भाषेचे विद्वान होते इंग्रजीवर ही त्यांचे प्रभुत्व होते.

Anandi Gopal Joshi (biography in marathi)

आनंदीबाई वयाच्या चौदाव्या वर्षी आई बनल्या. परंतु योग्य ती काळजी न घेतल्यामुळे बाळाचा दहा दिवसाच्या आत मृत्यू झाला.

कारण प्रसुती करणाऱ्या दाईला पुरेसा अनुभव नव्हता, त्याच वेळी महिलांनी शिक्षण घेतले पाहिजे असे आनंदीबाई म्हणू लागल्या. त्यांनी उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला त्या काळात बंगाल पाश्चिमात्य संस्कृतीचे केंद्र होते सामाजिक सुधारणा चळवळी सुद्धा बंगाल मधूनच होत होते.

अशावेळी पंडिता रमाबाई सरस्वती वयाच्या विसाव्या वर्षी दक्षिण भारतातून बंगालमध्ये विलक्षण वाक्य चातुर्य आणि संस्कृत ग्रंथाचे अगाद ज्ञान यामुळे कलकत्ता येथील केशवचंद्र सेन सहित अनेक विद्वान प्रभावित झाले. डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी सुद्धा पंडिता रमाबाई यांच्याकडून प्रेरणा घेतली.

Anandi Gopal Joshi (biography in marathi)

पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी गोपाल रावांनी त्यांना डॉक्टर बनवण्याचा निर्णय घेतला. पण त्यासाठी त्यांना परदेशात जाणे आवश्यक होते आणि त्या काळात तर स्त्रियांना गावाबाहेर सोडा तर घराबाहेर जाण्याची ही परवानगी नव्हती. त्यांनी घरचा व शेजाऱ्यांचा विरोध पत्करून मिशनरी शाळेत त्यांचा प्रवेश करून दिला.

पती गोपाळरावांनी त्यांना पूर्ण साथ दिली पण तत्कालीन मराठा समाजाला आनंदीबाईचे हे धाडस पचत नव्हते त्यांनी जोशी दाम्पत्याला विरोध सुरू केला. वयाच्या एकोणिसाव्या वर्षी आनंदीबाई यांनी बंगालमधील श सेरामपोर कॉलेजच्या हॉलमध्ये भाषण केले व भारतात महिलाडॉक्टरांची गरज असल्याचे पटवून दिले व त्यांनी डॉक्टर होण्यासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला आणि तत्कालीन ब्रिटिश व्हाइसरॉयनी त्यांना दोनशे रुपयांची मदत दिली. इतरांनीही त्यांना अमेरिकेत जाण्यासाठी मदत केली.

Anandi Gopal Joshi (biography in marathi)

काही ख्रिश्चन मिशनरी आनंदीबाईंना अमेरिकेत जाण्यासाठी शिक्षणासाठी सर्व प्रकारे मदत करण्याची तयारी दर्शवली पण ख्रिश्चन होण्याची अट घातली आनंदीबाई जोशी यांना हे मान्य नव्हते अशा वेळेस कॉर्पोरेट नावाच्या अमेरिकन महिलेने आनंदीबाईंना अमेरिकेत येण्यास निमंत्रण दिलेले पत्र व्यवहार झाल्यानंतर माझे जेवण मी स्वतः करील असे म्हणून आमंत्रण स्वीकारले.

Anandi Gopal Joshi (biography in marathi)

आनंदीबाईंना फिलाडेल्फिया येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला अमेरीकेत सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारावा यासाठी त्यांच्यावर दडपण आणले पण त्या डगमगल्या नाहीत सर्व अडचणींवर मात करून विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया मधून त्या M.D झाल्या. त्यांनी भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला (india’s first female doctor) पण समाजाला त्यांच्या ज्ञानाचा फायदा होण्यापूर्वीच वयाच्या केवळ 21 व्या वर्षी 26 फेब्रुवारी 1877 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला.

Also Read

Anandi Gopal Joshi Biography in Marathi

3 thoughts on “Anandi Gopal Joshi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group