अप्पी आमची कलेक्टर ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार!
येता काही दिवसांमध्ये अप्पी आमची कलेक्टर (Appi Amchi Collector Zee Marathi) जी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी बातमी कळत आहे. ही मालिका 22 ऑगस्ट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीसाठी होती या मालिकेने तब्बल अडीच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. या मालिकेत शिवानी नाईक (अप्पी – अपर्णा माने) यांचे मुख्य भूमिका होती. ही मालिका झी मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका आहे.
लवकरच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे अशी बातमी मिळत आहे.
छोट्या पडद्यावरील मराठी मालिकेची लोकप्रियता ही टीआरपीवरून ठरवले जाते गेल्या काही दिवसांपासून वाहिन्यांमध्ये टीआरपीच्या शर्यतीत चढाओढ चालू आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळावा यासाठी वाहिन्यांकडून विविध प्रयत्न केले जातात. अनेक मालिकांमध्ये महासंग्राम घडवून आणले जातात. नव्या कलाकारांच्या एन्ट्री इंट्रीमुळे टीआरपी वाढवला जातो.
आपली आमची कलेक्टर या मालिकेत अर्जुन नावाची भूमिका साकारणारा अभिनेता रोहित परशुराम ने लिहिलेली पोस्ट सर्वत्र चर्चेत आलेली आहे या पोस्टमुळे मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.