Swami Dayanand Saraswati

Swami Dayanand Saraswati Biography in Marathi

Swami Dayanand Saraswati Biography in marathi संपूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी जन्म 1824.

संपूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी.

जन्म 1824.

वडिलांचे नाव अंबाशंकर

आईचे नाव अमृताबाई

शिक्षण शालेय शिक्षणापासून वंचित

विवाह अविवाहित.

Swami Dayanand Saraswati यांचे कार्य

जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना (Biography in Marathi)

एकदा शिवरात्र होती, वडील म्हणाले मुलशंकर आज सर्वांनी उपवास पकडायचा आहे, रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची.

हे ऐकून मूळशंकर ने उपवास सुरू केला दिवस संपत आला रात्र झाली मूळशंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले.

त्यांनी पूजा केली पिंडीवर फुले वाहिली तांदळाच्या अक्षता वाहिल्या रात्रीचे बारा वाजले.

वडिलांना झोप येऊ लागली पण मुल शंकर जागा राहिला.

आपला उपवास निष्फळ होईल या भीतीने तो झोपला नाही.

देवळातल्या बोळातून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडी भोवती फिरू लागले. ते पिंडी वरच्या अक्षता खाऊ लागले.

हे दृश्य पाहून जी मूर्ती उंदरा पासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ती भक्तांचे संकटापासून संरक्षण कशी काय करू शकेल, मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते, तेव्हा मूर्तिपूजेला काही अर्थ नाही, अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

त्या दिवसापासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली.

परमेश्वराचे शास्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली.

एकदा टंकारा नगरांमध्ये कॉलरची सात आली त्यामध्ये मूळशंकरची 14 वर्षाची बहीण मरण पावली.

ह्या घटनेनंतर तीन वर्षांनी मूळ शंकरच्या आवडत्या काकांचे ही कॉलरा यामुळे निधन झाले.

ह्या घटनेमुळे त्यांच्या मनावर जबरदस्त धक्का बसला.

गृहत्याग (Biography in Marathi)

कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा अशी मूळशंकराच्या मनात इच्छा निर्माण झाली.

जीवन काय आहे? मृत्यू का आहे?

या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्मा कडून समजून घ्यावीत असे त्यांना वाटत होते.

वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला.

त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला, हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते.

भौतिक सुखाचा आनंद लुटना पेक्षा स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले.

त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

गुरुचा शोध (Biography in Marathi)

गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद, बडोदा, हरिद्वार, काशी, कानपूर या ठिकाणी गुरूच्या शोधात जंगलातून व पहाडातूनसुद्धा प्रवास करीत राहिले, परंतु त्यांना योग्य गुरु मिळाला नाही.

ह्याच सुमारास त्या काळाचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांच्याशी मूळशंकराची भेट झाली.

त्यांचे शिष्यत्व पत्करून मूळ शंकरने संन्यास धर्माचा स्वीकार केला.

संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले.

पंधरा वर्षापर्यंत सर्वत्र भ्रमंती केल्या वर स्वामी पूर्णशर्मा नामक साधूच्या म्हणण्यानुसार स्वामी दयानंद मधुरेश येऊन पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करले त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्माचे ज्ञान त्यांनी घेतले.

वैदिक ज्ञानाचा प्रसार (Biography in Marathi)

स्वामी दयानंद यांना वेद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. teachings of swami dayanand saraswati मुख्य म्हणजे वेदामध्ये मूर्तिपूजा नव्हती किंवा उच्च-नीच हा भाव नव्हता वेदातील ज्ञान हे खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे, आणि समाजाकरिता ते अत्यंत उपयुक्त आहे, अशी आनंदाची श्रद्धा होती, म्हणूनच त्यांनी ‘वेदांकडे परत जा’ अशी भारतीयांना शिकवण दिली.

आपल्या अस्खलित प्रवचनाद्वारे ते मूर्ती पूजा जन्मजात, उच्चनीचता, जातीभेद, घातक रूढी, यज्ञ मध्ये केलेली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले.

2869 मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पंडिताशी शास्त्रावर वाद-विवाद केल्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले.

स्वातंत्र्य प्रेम (Biography in Marathi)

अठराशे सत्तावन च्या असफल ते पासून तर काँग्रेसच्या स्थापने पर्यंत भारतीयांच्या हृदयामध्ये स्वतंत्र प्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या महापुरुषांनी केले त्यापैकी दयानंद एक होते भारतातून ब्रिटिशांना ह करण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे अशी स्वामी दयानंद त्यांची पक्की खात्री होती.

स्वामी श्रद्धानंद लाला लाजपत राय आणि लाला हरदयाल इत्यादी ब्रिटिशांना भारतातून हकलण्या करिता उघडपणे लढणारे नेते आर्य समाजाचे होते.

शुद्धीकरण (Biography in Marathi)

स्वामी दयानंद आणि ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणले.

समाजाच्या सर्व घटकांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा चे स्थान मिळावे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

आर्य समाजाची स्थापना (Biography in Marathi)

 • Swami Dayanand Saraswati यांनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा ब्राह्मो समाजाकडून घेतली होती प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकार्यानेच धर्म प्रचाराने व धर्म सुधारणेचे कार्य करीत.
 • तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले आहे त्यानुसार त्यांनी मुंबई येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली.
 • आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणा बरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या वेदाचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा निर्माण होईल असे स्वामी दयानंद यांना वाटत होते.
 • उत्तर भारतात त्यांनी चालवलेले शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरले कार्य आर्य समाजाने लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केले.
 • तसेच गुरुकुल संस्थेची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालय देशाच्या विविध भागात उघडली.

स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार Quotes (Biography in Marathi)

 • सर्व मानव एक, सर्वांचे देव एक, सर्वधर्म एक, पृथ्वी माता हीच एक जीवनाची चतु:सूत्री आहे.
 • स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही त्यांना अज्ञानात ठेवले जाते भारताच्या अर्धपत्नाचे एक कारण आहे, ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेले रत्नांचे प्रतिबिंब आरशात दिसू शकत नाही, त्याचप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धती सारख्या मूर्ख रुढीचे बंधन तोडत नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे.
 • त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे असती आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्यात ते त्यांच्या सतीत्त्वामुळे आणि सद्गुनामुळे त्यांच्या पडद्यामुळे नाही.
 • स्त्रियांना समाजात समानतेचे स्थान मिळाले पाहिजे.
 • स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्यामुळे तिला अनेक अधिकार मिळाले पाहिजे.

स्वामी दयानंद सरस्वती यांचे ग्रंथ book

सत्यार्थप्रकाश हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंद यांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय या ग्रंथांमध्ये 15 अध्याय असून त्यामध्ये वेदाचा सत्यअर्थ दिलेला आहे म्हणून हा ग्रंथ झाला सत्यार्थप्रकाश म्हटले आहे हा ग्रंथ पूर्णपणे वेदावर आधारित आहे.

वेद भाष्य, संस्कार निधी, व्यवहार भानू इत्यादी ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिले.

स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू (Biography in Marathi)

swami dayanand saraswati death reason 1883 मध्ये स्वामी दयानंद यांचा वर विषप्रयोग झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.

Also Read

Swami Dayanand Saraswati Biography in marathi

Mahatma Gandhi

Mahatma Gandhi Biography in marathi

Mahatma Gandhi biography in marathi संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी जन्म 2 ऑक्टोंबर 1869 वडील करमचंद आईचे नाव पुतळाबाई.

Mahatma gandhi education शिक्षण 1887 मध्ये मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण 1891 मध्ये इंग्लंडमध्ये बॅरिस्टर होऊन भारतात परत आले. Lawyer, Politician, Activist, Writer

Mahatma Gandhi family

Kasturba Gandhi (m. 1883; died 1944)

Children Harilal, Manilal, Ramdas, Devdas

Mahatma Gandhi Works in marathi

 • 1893 मध्ये त्यांना दादा अब्दुला यांच्या व्यापारी कंपनीचा खटला चालवण्यासाठी दक्षिण आफ्रिकेत जावे लागले.
 • दक्षिण आफ्रिकेत असताना त्यांनी स्वतःला ही अन्याय व अत्याचाराला तोंड द्यावे लागले. त्याचा प्रतिकार करण्यासाठी भारतीय लोकांना संघटित करून त्यांनी 1894 मध्ये नाताळ इंडियन कॉंग्रेसची स्थापना केली.
 • 1906 मध्ये तेथील शासनाने एका आदेशवन्य कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बागळणे सक्तीचे केले होते याशिवाय कृष्णवर्णीयांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध घातले होते या अन्यायाविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने यशस्वी लढा दिला.
 • 1915 मध्ये गांधीजींनी भारतात परत आले आणि त्यांनी सुरुवातीला साबरमती येथे राहून सत्याग्रह आश्रमाची स्थापना केली.
 • 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य भागात ब्रिटिश मळे मालकांकडून भारतीय शेतकऱ्यांवर ठरलेल्या दारात पीक विकण्याची सक्ती केली जात होती. निळ ठरलेल्या दरात मुळे वाल्यांना विकण्याची सक्ती असल्यामुळे त्यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत होते गांधीजींनी चंपरण्या शेतकऱ्यांना संघटित होऊन सत्याग्रहाच्या मार्गाने आंदोलन केले परिणामी ब्रिटिश शासनाने शेतकऱ्यांवरील अन्याय दूर केला.
 • 1917 मध्ये गुजरात मध्ये खेडा जिल्ह्यात प्लेगची साथ पसरली तसेच तेथे वारंवार दुष्काळ पडत असे त्यामुळे शेतकऱ्यांना सारा भरणे अशक्य झाले त्यांनी सरकारकडे सारा माफीची मागणी केली. परंतु ब्रिटिश सरकारने ती अमान्य केली. तेव्हा शेतकऱ्यांनी साराबंदी चळवळ सुरू केली.
 • गांधीजीने या चळवळीचे नेतृत्व स्वीकारले आणि साराबंदी चा सत्याग्रह सुरू केला. थोड्याच कालावधीत सरकारने माघार घेतली व शेतसारा माफ केला.
 • 1918 मध्ये अहमदाबाद येथील कापड गिरणीतील येथील कामगारांनी वेतनवाढ मागितली होती गिरणी मालकांनी या वेतनवाढीच्या मागणीला नकार दिला गांधीजींच्या सल्ल्यावरून कामगारांनी संप व उपोषण सुरू केले. गांधीजींनी ही कामगारांना बरोबर उपोषणाला बसले गिरणी मालकांनी कामगारांची वेतनवाढीची मागणी मान्य केली.
 • 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय सभेचे नेतृत्व महात्मा गांधीजी कडे गेले.
 • 1920 च्या नागपूर येथील अधिवेशनात राष्ट्रीय सभेने असहकाराच्या देशव्यापी चळवळीला पाठिंबा देणारा ठराव संमत केला.
 • असहकार आंदोलनाची सर्व सूत्रे महात्मा गांधी कडे सोपवण्यात आली असहकाराच्या ठरावावन्ये शाळा महाविद्यालय विधिमंडळे, न्यायालय, सरकारी कचेऱ्या, परदेशी मालावर बहिष्कार घालण्यात आले.
 • 1924 साले बेळगाव येथे राष्ट्रीय सभेचे अधिवेशन झाले त्याच्यामध्ये गांधीजी हे अध्यक्षपद म्हणून भूषवले.
 • 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली मिठावरील कर व मीठ तयार करण्याची सरकारची मक्तेदारी रद्द करावी अशी गांधीजींनी रोहित कडे मागणी केली व्हाइसरॉयने ही मागणी धुडकावून लावली तेव्हा गांधीजींनी मिठाचा कायदा मोडून सत्याग्रह करण्याचे ठरवले.

दांडी यात्रा (dandi yatra) in marathi

 • मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरात मधील दांडी हे समुद्रकिनाऱ्यावरील गाव निश्चित केले.
 • साबरमती आश्रमातून 78 कार्यकर्त्यांनी शी गांधीजींनी दांडी कडे प्रयाण केले.
 • 385 किलोमीटरच्या या वाटचालीत असंख्य कार्यकर्ते त्यांना येऊन मिळाले.
 • 5 एप्रिल 1930 रोजी गांधीजीं दांडी येथे पोचले.
 • समुद्रकिनाऱ्यावरील मिठ उचलून त्यांनी मिठाचा कायदा मोडला व देशभर मिठा सुरू केली.
 • इसवी सन 1931 मध्ये राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून गांधीजींनी दुसऱ्या गोलमेज परिषदेला हजेरी लावली.

Mahatma Gandhi Social Works

 • 1932 मध्ये त्यांनी अखिल भारतीय हरिजन संघाची स्थापना केली.
 • 1932 मध्ये महात्मा गांधींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जातीय निवड यासंदर्भात जो करार केला त्याला पुणे करार म्हणून ओळखले जाऊ लागले.
 • 1933 मध्ये त्यांनी हरिजन नावाचे वृत्तपत्र सुरू केले.
 • 1934 मध्ये गांधीजींनी वर्धाजवळ सेवाग्राम या आश्रमाची स्थापना केली हरिजन सेवाग्राम उद्योग, ग्रामसुधार इत्यादी विधेयक कार्यक्रम राबवण्याचा त्यांनी प्रयत्न त्यांनी केला.
 • 1942 मध्ये चले जाव चळवळीची सुरुवात झाली ‘करेंगे या मरेंगे’ हा नवा मंत्र गांधीजींनी लोकांना दिला.

Mahatma Gandhi Facts (Book)

माय एक्सपेरिमेंट विथ ट्रथ (my experiments with truth)

The Story of My Experiments with Truth

Mahatma Gandhi MPSC

भारताचे राष्ट्रपिता (Father of the Nation)

महात्मा (Mahatma), Mahatma Gandhi, Bapu ji, Gandhi ji

Death

मृत्यू 30 जानेवारी 1948. 30 January 1948 (aged 78) New Delhi, India

महात्मा गांधी ची माहिती

महात्मा गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले मोहनदास करमचंद गांधी हे भारतीय स्वतंत्र आंदोलनाचे प्रमुख नेते होते.

सत्याग्रह आणि अहिंसेच्या मार्गावर चालून त्यांनी आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यांच्या या आंदोलनाच्या सिद्धांतामुळे संपूर्ण जगामध्ये लोकांना नागरिक अधिकार आणि स्वतंत्र आंदोलन करण्याची पेरणा मिळाली.

महात्मा गांधींना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधले जाते सुभाष चंद्र बोस यांनी 1944 मध्ये रंगून येथून रेडिओवर गांधीजींना “राष्ट्रपिता” म्हणून संबोधिले होते.

महात्मा गांधी हे संपूर्ण मानव जातीला एक पेरणा स्थान बनलेले आहे. त्यांनी नेहमी कठोर परिस्थितीतही अहिंसा आणि सत्य याच्या मार्गावर लोकांना राहण्याचे निवेदन केले होते आणि गांधीजी सुद्धा या दोन तत्त्वांचे पालन नेहमी काटेकोर पद्धतीने करत असे.

त्यांनी आपले संपूर्ण जीवन सदाचार मध्ये घालवले. ते संपूर्ण आयुष्य आपले धोतर आणि सुती वस्त्र पासून बनवलेले शाल वापरत असे, ते नेहमी शाकाहारी भोजन च ग्रहण करत असे, आपल्या आत्मशुद्धी साठी ते नेहमी उपवास करत असे.

1915 मध्ये भारतात येण्यापूर्वी गांधीजी एक वकील म्हणून दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना नागरिक अधिकारांसाठी न्याय मिळवून देण्यासाठी आफ्रिकेमध्ये गेले होते त्यांनी तेथे भारतीय लोकांसाठी नागरिक अधिकारासाठी तेथे मोठ्या प्रमाणात संघर्ष केला.

भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतामध्ये संपूर्ण भारताचे भ्रमण केले आणि त्यांनी शेतकरी मजूर आणि श्रमिक यांना एकत्र करून संघर्ष करण्यासाठी एकत्र केले.

1921 मध्ये त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस ची धुवा सांभाळली आणि त्यांनी देशाचे सामाजिक राजनेतिक आणि आर्थिक गोष्टीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

गांधीजीने 1930 मध्ये मिठाचा सत्याग्रह केला त्यानंतर त्यांनी 1942 मध्ये भारत छोडो आंदोलन केले.

सुरुवातीचे जीवन

मोहनदास करमचंद गांधी यांचा जन्म भारतामध्ये गुजरात मधील एक तटीय शहर पोरबंदर मध्ये 2 ऑक्टोंबर 1869 मध्ये झालेला होता. त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद होते ते ब्रिटिश राज मध्ये काठीयावाड एक छोटीसी रियासत चे म्हणजेच पोरबंदर से दिवान होते.

गांधीजींची आई खुपच प्रेमळ स्वभावाची होती, त्या खूप धार्मिक होत्या त्याआपल्या कुटुंबाच्या भल्यासाठी नेहमी उपवास करत असे कुटुंबामध्ये जर कोणी आजारी पडले तर त्यांच्या सेवेसाठी त्यात दिवस-रात्र एक करत असतात ह्याच गोष्टीचा प्रभाव गांधीजींवर सुद्धा होता त्यामुळेच गांधींच्या स्वभावामध्ये अहिंसा, शाकाहार, आत्मशुद्धी आणि उपवास ह्या गोष्टी जडल्या.

1883 मध्ये साडे तेरा वर्षाचे असताना गांधीजींचा विवाह कस्तुरबा यांच्या सोबत करण्यात आला.जेव्हा गांधी पंधरा वर्षाचे होते तेव्हा त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाला पण काही कारणास्तव त्यांचे पहिले पुत्र जास्त दिवस जगले नाही. गांधीजींचे वडील करमचन्‍द्र गांधी ह्याच वर्षी देवाघरी गेले. त्यानंतर गांधीजींना चार अपत्ये झाली.

गांधीजींच्या मुलांची नावे

 • हरिलाल गांधी (1888)
 • मणिलाल गांधी (1892)
 • रामदास गांधी (1897)
 • देवदास गांधी (1900)

गांधीजींचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर मध्ये आणि हायस्कूलचे शिक्षण राजकोट मध्ये झालेले होते. शैक्षणिक स्तरावर गांधीजी खूपच एव्हरेज स्टुडन्ट होते. 1887 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा आमदाबाद मधून उत्तीर्ण झाले होते. पुढच्या शिक्षणासाठी मी त्यांनी भावनगर मधील श्यामदास कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. पण खराब स्वास्थ्य मुळे त्यांना परत पोरबंदर ला जावे लागले.

गांधी हे आपल्या कुटुंबामध्ये सर्वात जास्त शिकलेले होते. त्यांच्या कुटुंबातील एका जाणकाराने गांधीजी यांना लंडनमधून बॅरिस्टर चे शिक्षण घेण्यासाठी सुचवले. 1888 मध्ये त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून वकिलीची परीक्षा आणि बॅरिस्टर बनण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले.

आपल्या आईला दिलेल्या वचनानुसार ते लंडनला गेले त्यांनी तेथे शाकाहारी भोजन ग्रहण केले पण तिथे शाकाहारी भोजन मिळणे खूपच कठीण होते त्यामुळे गांधीजींना कधीकधी उपाशीपोटी रहावे लागत असे.

लंडनमध्ये असताना त्यांनी व्हेजिटेरियन सोसायटी ची सदस्यता मिळवली या सोसायटीमध्ये काही सदस्य थिऑसॉफिकल सोसायटीचे सदस्य होते त्यांनीच गांधीजींना गीता वाचण्याचा सल्ला दिला होता.

जून 1891 मध्ये गांधीजी भारतात परतले. त्यांनी आपली वकिली बॉम्बे मध्ये सुरू केली त्यामध्ये त्यांना काही खास यश मिळाले नाही त्यानंतर ते राजकोट मध्ये गेले तेथे त्यांनी गरजू लोकांसाठी अर्ज लिहिण्याचे काम सुरू केले परंतु काही काळानंतर त्यांनी ते ही काम बंद केले.

शेवटी त्यांनी 1893 मध्ये भारतीय कंपनीच्या बाजूने दक्षिण आफ्रिका मध्ये केस लढवण्यासाठी एक वर्षासाठी दक्षिण आफ्रिकेला गेले.

दक्षिण आफ्रिकेमध्ये गांधी

वयाच्या चोविसाव्या वर्षी गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये पोहोचले. ते भारतीय पेटरिया भारतीय व्यापाऱ्यांचे न्यायिक सल्लागार म्हणून दक्षिण आफ्रिकेला गेले होते.

गांधीजी ने दक्षिण आफ्रिकेमध्ये खूप वर्ष काम केले आणि त्यांच्या राजनीतिक विचार आणि नेतृत्व कौशल्याचा विकास झाला. दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना गंभीर भेदभाव चा सामना करावा लागला.

एकदा गांधीची रेल्वेने प्रवास करत होते त्यांच्याकडे प्रथम श्रेणीचे तिकीट होते तरीसुद्धा त्यांच्या रंगामुळे त्यांना प्रथम श्रेणी मधून प्रवास करून दिला नाही गांधीजींना धक्के मारत खाली उतरविण्यात आले होते.

mahatma gandhi quotes

 • If we could change ourselves, the tendencies in the world would also change. As a man changes his own nature, so does the attitude of the world change towards him. We need not wait to see what others do.
 • A man is but a product of his thoughts. What he thinks he becomes.
 • I will not let anyone walk through my mind with their dirty feet.
 • Nobody can hurt me without my permission.
 • Happiness is when what you think, what you say, and what you do are in harmony.

Read This

Image by Wikipedia

Mahatma Gandhi Biography in marathi

Raja Ram Mohan Roy

Raja Ram Mohan Roy Biography in Marathi

Raja Ram Mohan Roy Biography in Marathi संपूर्ण नाव राम मोहन रमाकांत रॉय  जन्म 22 मे 1772

संपूर्ण नाव राम मोहन रमाकांत रॉय

जन्म 22 मे 1772

जन्मस्थान राधानगर (जिल्हा हुगळी बंगाल)

वडिलांचे नाव रमाकांत रॉय

आईचे नाव तारणी देवी

विवाह उमादेवी सोबत बालविवाह पहिल्या पत्नीचे निधन नंतर दोन विवाह.

Raja Ram Mohan Roy Information

शिक्षण वयाच्या नवव्या वर्षी अरबी फारसी भाषेचे अध्ययन.

1799 मध्ये बनारसला जाऊन त्यांनी संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले याशिवाय इंग्रजी फ्रेंच हिब्रू ग्रीक व लॅटिन भाषेचाही अभ्यास त्यांनी केला. विवाह उमादेवी सोबत बालविवाह पहिल्या पत्नीचे निधन नंतर दोन विवाह.

Raja Ram Mohan Roy Birth Place

राधानगर (जिल्हा हुगळी बंगाल)

Raja Ram Mohan Roy Work

 • इ.स. 1803 मध्ये त्यांनी तुहफत-उल-मुवाउद्दीन एक (ईश्वराचा नजराना) नावाचा फारसी भाषेतील ग्रंथ लिहिला.
 • इ.स. 1809 मध्ये रंगपूर येथे कलेक्टर जॉन डीबी यांचे दिवाण म्हणून नोकरी पत्करली.
 • इ.स. 1815 मध्ये त्यांनी आत्मीय सभा स्थापन केली.
 • इ.स. 1817 मध्ये त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली.
 • इ.स. 1821 ते 22 मध्ये त्यांनी बंगाली भाषेत ‘संवाद कौमुदी’ व फारसी भाषेचे ‘मिरत उल अखबार अशी दोन साप्ताहिके काढली.
 • इ.स. 1822 मध्ये त्यांनी अँग्लो हिंदू स्कूलची स्थापना केली.
 • इ.स. 1826 मध्ये संस्कृत वांडमय च्या अभ्यासासाठी व हिंदू एकेश्वरवादाचा समर्थनासाठी त्यांनी वेदांत कॉलेजची स्थापना केली.
 • इ.स. 1828 मध्ये कलकत्ता येथे त्यांनी ब्राम्हो समाजाची स्थापना केली.

Raja Ram Mohan Roy Sati 

Raja Ram Mohan Roy यांनी Sati अनिष्ठ व अमानुष प्रथेविरुद्ध प्रचाराची जोरदार आघाडी उभारली सतीची चाल धर्मविरोधी आहे असे त्यांनी अनेक धर्मग्रंथाच्या आधार देऊन प्रतिपादन केले त्यांनी केलेल्या लोक जागृती मुळेच तात्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी इ.स. 1829 मध्ये सतीची चाल बंद करण्यासंबंधी कायदा संमत केला.

बालविवाह, बालहत्या, केशवपण, जातीभेद, बहुपत्नीत्व यासारख्या प्रथानाही त्यांनी विरोध केला त्यांनी विधवा-पुनर्विवाह याचे समर्थन केले आणि समाजात विधवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न केले.

Raja Ram Mohan Roy यांनी गोंदिया हे बंगाली भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक लिहले.

Thought of Raja Ram Mohan Roy Biography in Marathi

Raja Ram Mohan Roy contribution to education भारतीयांनी जुन्या विद्या व धर्मग्रंथ यांच्या अध्या नातच गुरफटून न जाता गणित भौतिक शास्त्राचे शिक्षण घ्यावे.

ब्राम्हो म्हणजे ब्रह्माची उपासना करणारा ब्रह्म म्हणजे विश्वाचा अंतिम तत्त्व या अंतिम तत्त्वाची उपासना करणारा तो ब्राम्हो समाज होईल.

धर्मशास्त्राने सांगितलेले विचार स्वतःच्या अनुभवावर व विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिले पाहिजे.

प्रेम सेवा व परोपकार हाच धर्माचा खरा अर्थ होय असे समजुन सर्वांनीच परस्परांशी व्यवहार करावा.

Title of Raja Ram Mohan Roy Biography in Marathi

दिल्लीच्या मोगल बादशहा दुसरा अकबराने Raja Ram Mohan Roy Biography यांना राजा हा किताब सन्मानित केला.

आधुनिक भारताचे जनक.

मानवतावादी समाजसुधारक.

इंग्लंडला भेट देणारा पहिला भारतीय

Raja Ram Mohan Roy Death

मृत्यू 27 सप्टेंबर 1833 रोजी इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथे निधन.

Raja Ram Mohan Roy Images Wikimedia

Download PDF

Click Here Download PDF

Read This

Raja Ram Mohan Roy Biography in Marathi

Dadabhai Naoroji

Dadabhai Naoroji Biography in Marathi

Content

 • Biography of Dadabhai Naoroji
 • Dadabhai Naoroji Family
 • Dadabhai Naoroji Education
 • Dadabhai Naoroji Work
 • Books of Dadabhai Naoroji

Dadabhai Naoroji Biography in Marathi शिक्षण : इ.सन.1845 मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन वी महाविद्यालयातून पदवी संपादन.

Dadabhai Naoroji Family

संपूर्ण नाव: दादाभाई पालनजी नवरोजी

जन्म: 4 सप्टेंबर 1825

जन्मस्थान: मुंबई

वडील: पालनजी दोडी नवरोजी

आईचे नाव: माणिक बाई

विवाह: गुलबाई

Dadabhai Naoroji Education

शिक्षण : इ.सन.1845 मध्ये मुंबईच्या एलफिन्स्टन वी महाविद्यालयातून पदवी संपादन. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्याचा पहिला भारतीय होण्याचा मान Dadabhai Naoroji ला मिळाला होता.

Dadabhai Naoroji Work

 • इ.सन 1851 मध्ये लोकांत सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर जागृती घडवून आणण्यासाठी Dadabhai Naoroji यांनी ‘रास्त गोफ्तर‘ म्हणजेच खरी बातमी हे गुजराती साप्ताहिक सुरू केले होते.
 • इ.सन1852 मध्ये Dadabhai Naoroji व नाना शंकरशेठ यांनी दोघांनी पुढाकार घेऊन मुंबई त बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली होती. हिंदी जनतेची दुखे अडचणी इंग्रज सरकारच्या निदर्शनात आणून देणे आणि जनतेच्या सुखाकरिता सरकारला प्रत्येक गोष्टी मनापासून सहाय्य करावे या संस्थेचा स्थापनेमागील उद्देश होता.
 • इ.सन 1855 मध्ये लंडनच्या ‘कामा अंड कंपनीचे’ ते मॅनेजर म्हणून लंडनला गेले होते.
 • इ.सन 1865 ते 1866 काळात त्यांनी लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज गुजराती भाषेचे प्राध्यापक म्हणून कार्य केले.
 • इ.सन 1866 मध्ये Dadabhai Naoroji इंग्लंडमधील वास्तव्याच्या काळात ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली.
 • 1866 मध्ये Dadabhai Naoroji इंग्लंडमधील वास्तव्याच्या काळात ईस्ट इंडिया असोसिएशन या नावाची संस्था स्थापन केली. हिंदी लोकांच्या आर्थिक समस्यांचा विचार करणे आणि त्यांच्या प्रश्नावर इंग्लंडमधील लोकमत आपणास अनुकूल करून घेणे हे या संस्थेचे उद्दिष्ट होते.
 • इ.सन 1874 मध्ये बडोदा संस्थानाच्या दिवन पदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली अनेक प्रकारच्या सुधारणा केल्यामुळे त्यांनी कामगिरी स्मरणीय ठरली. पण दरबारी लोकांच्या कारवायांमुळे Dadabhai Naoroji अल्पावधीतच दिवान पद सोडून गेले.
 • 1875 मध्ये ते मुंबई महानगरपालिकेचे सदस्य बनले.
 • इ.सन 1885 मध्ये मुंबई प्रांतिक कायदेमंडळांनी चे सदस्य झाले.
 • 1885 मध्ये मुंबई राष्ट्रीय सभेची स्थापना करण्यात दादाभाई चा पुढाकार होता.
 • इ.सन अठराशे 86 कलकत्ता 893 लाहोर 1906 कलकत्ता अशी तीन अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
 • इ.सन 1892 मध्ये इंग्लंडमधील फिन्सबरी मतदारसंघातून ते हाऊस ऑफ कॉमन्स वर निवडून आले होते ब्रिटिश संसदेचे पहिले हिंदू सदस्य बनण्याचा मान त्यांनी मिळवला होता.
 • इ.सन 1906 मध्ये कलकत्ता येथे Dadabhai Naoroji यांच्या अध्यक्षतेखाली जे अधिवेशन भरले होते त्या अधिवेशनात स्वराज्याची मागणी करण्यात आली होती त्या मागणीस Dadabhai Naoroji यांनी पाठिंबा दिला होता.

Poverty and Un-British Rule in India

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी भारताची प्रचंड आर्थिक लूट चालवली आहे हे दादाभाईंनी लुटीचा सिद्धांत किंवा नि: सारण सिद्धांत सिद्धांत द्वारे स्पष्ट केला होता.

Dadabhai Naoroji Books यांनी लिहिलेले काही पुस्तके.

पावर्टी अंड अन ब्रिटिश रुल इन इंडिया. (poverty and un-british rule in india)

Title

 • भारताचे पितामह भारतीय अर्थशास्त्राचे जनक
 • आर्थिक राष्ट्रवादाचे जनक.
 • रॉयल कमिशनचे पहिले भारतीय सदस्य.

Books of Dadabhai Naoroji

 • दादाभाई नौरोजी (चरित्र, गंगाधर गाडगीळ)
 • दादाभाई नौरोजी : भारतीय राजकारणातील भीष्माचार्य (व्यक्तिचित्रण, निंबाजीराव पवार)
 • नवरोजी ते नेहरू (गोविंद तळवलकर)
 • भारताचा स्वातंत्र्य संघर्ष (बिपीनचंद्र)

Dadabhai Naoroji Death

मृत्यू 30 जून 1917 रोजी Dadabhai Naoroji यांचा मृत्यू झाला.

Dadabhai Naoroji Biography in Marathi

error: Content is protected !!