Babasaheb Ambedkar

Dr. Babasaheb Ambedkar Biography in Marathi जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील इंदूरजवळील महु येथे.

Babasaheb Ambedkar Biography in Marathi

  • जन्म 14 एप्रिल 1891 मध्ये मध्यप्रदेशातील इंदूरजवळील महु येथे.
  • मूळ गाव रत्नागिरी जिल्ह्यातील अंबावडे.
  • आंबेडकरांचे वडील लष्करात सुभेदार पदावर काम करत होते त्या दरम्यान आंबेडकर यांचा जन्म येथे झाला.
  • मूळ नाव भीमराव रामजी सपकाळ उर्फ अंबावडेकर.
  • आईचे नाव भिमाबाई.

भीमरावांच्या बालपणीच त्यांच्या मातोश्री चे निधन झाल्याने पिता रामजी व आत्या मीराबाई यांनी त्यांचे पालन पोषण केले.
प्राथमिक शिक्षणासाठी काही काळ दापोली व त्यानंतर साताऱ्यातील एग्रीकल्चर स्कूल मध्ये प्रवेश या शाळेतील आंबेडकर या प्रेमळ गुरु बद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी भीमराव आणि आपल्या गुरुंचे आंबेडकर हे नाव स्वीकारले.

  • 1907 मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमधून मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण. या शाळेतील केळकर नावाच्या शिक्षकाच्या प्रयत्नाने भीमरावांना बडोदा पती सयाजीराव गायकवाड यांची दरमहा 25 रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली व एलफिन्स्टन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला.
  • 1913 पर्शियन व इंग्रजी हे विषय घेऊन बाबासाहेब एलफिन्स्टन कॉलेजमधून B.A ची परीक्षा उत्तीर्ण झाले.
  • जानेवारी 1913 बडोदा संस्थानात काही काळ नोकरी.
  • 2 फेब्रुवारी 1913 आंबेडकरांना पितृशोक बडोद्यात  जाण्याचे नाकारले.

Babasaheb Ambedkar Biography in Marathi

  • जुलै 1913 ते जुलै 1916 या काळात महाराज सयाजीरावांच्या मदतीने आंबेडकरांनी उच्चशिक्षणासाठी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात प्रवेश घेतला.
  • 1915 प्राचीन भारतातील व्यापार हा प्रबंध कोलंबिया विद्यापीठात सादर केला व M.S ची पदवी संपादन केली (Trade in Ancient India).
  • 1916 कोलंबिया विद्यापीठाची Ph.D मिळवण्यासाठी आंबेडकरांनी “National Dividend of India A Historical and Analytical Study” (भारताच्या राष्ट्रीय नफ्याचा वाटा एक ऐतिहासिक पृथक्करणत्मक परिशीलन) हा प्रबंध लिहिला.
  • 1917 Evolution of Provincial Finance in British India या नावाने प्रसिद्ध झाल्यावर त्यांना कोलंबिया विद्यापीठ आचे Ph.D पदवी मिळाली.


  • ऑक्टोंबर 1916 लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये आंबेडकरांनी प्रवेश घेतला दरम्यान शिष्यवृत्तीची मुदत संपल्याने वर्षभरात त्यांना भारतात परतावे लागले.
  • 1917 मुंबईत ‘वर्स कॉलेज’ या खाजगी व्यापारी शिक्षण संस्थेत काही काळ अर्थशास्त्र, बँकिंगकायदा या विषयांचे अध्यापन.
  • नोव्हेंबर 1918 मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून नियुक्ती.
  • सिडनेहॅम कॉलेजमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अर्थशास्त्र हा विषय शिकवत असत.
  • 31 जानेवारी 1920 राजश्री शाहू महाराज यांच्यासह यामुळे आंबेडकरांनी मूकनायक हे पाक्षिक सुरु केले.
  • सप्तेंबर 1920 यावर्षी राजश्री शाहूंच्या आर्थिक सहाय्य मुळे आंबेडकर पुढील अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले.
  • 1921 लंडन विद्यापीठाची एम एससी पदवी प्राप्त.
  • 1920 लंडन विद्यापीठाची डि एससी ही पदवी विषय द प्रॉब्लेम ऑफ रुपी भारतीय रुपयाचा प्रश्न या दरम्यान काही काळ जर्मनीतील बॉन विद्यापीठात कायद्याचा अभ्यास केला.
  • 1923 बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण.
  • 1924 भारतात परतल्यावर काही काळ मुंबई उच्च न्यायालयात वकिली.



“यापुढील काळात अस्पृश्यतानिवारण हे आंबेडकरांनी आपल्या जीवन कार्य मानले”.

  • 20 जुलै 1924 बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना. (उद्देश अस्पृश्यात नवजागृती करणे व त्यांची शैक्षणिक प्रगती सुधारणे).
  • बहिष्कृत हितकारणी सभेच्या माध्यमातून अस्पृश्यांसाठी वाचनालय, प्रौढ रात्रशाळा सुरू करण्यात आल्या.
  • 1926 मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाच्या सदस्य म्हणून नियुक्ती (1926-1936).
  • 3 एप्रिल 1927 बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरु केले.

Babasaheb Ambedkar Biography in Marathi

  • 1927 समाज समता संघाची स्थापना.
  • 1928 या संघातर्फे समता, जनता व प्रबुद्ध भारत ही पत्रे सुरू केली.
  • 1928 मुंबईतील शासकीय विधी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य.
  • 20 मार्च 1927 आंबेडकरांनी आपल्या अनुयायांसह महाड जिल्हा रायगड येथे चवदार तळे सत्याग्रह केला.
  • 25 डिसेंबर 1927 अस्पृश्यतेचे समर्थन करणाऱ्या ‘मनुस्मृती’ या ग्रंथाचे आंबेडकरांनी महाड येथे दहन केले.
  • 2 मार्च 1930 जिल्हा नाशिक येथील काळाराम मंदिर सत्याग्रह याचे नेतृत्व दादासाहेब गायकवाड यांनी केले. (काळाराम मंदिर 1935 साली अस्पृश्यांना खुले झाले).

“आंबेडकरांनी केलेली हिंदू मंदिर प्रवेशाची चळवळ ही अस्पृश्यांच्या सामाजिक गुलामगिरीची बंधने तोडण्यासाठी केलेली चळवळ होती”.

  • 1930 ते 1932 लंडन येथील तिन्ही गोलमेज परिषदांना अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणुन आंबेडकर उपस्थित होते.
  • 25 सप्टेंबर 1932 महात्मा गांधी व डॉक्टर आंबेडकर यांच्यात येरवडा कारागृहात ‘ऐक्य करार’ ज्याला ‘पुणे करार’ असे ही म्हणतात.
  • 1933 आंबेडकरांनी विधिमंडळात ग्रामपंचायत बिलावर भाषण केले.
  • 1935 बाबासाहेबांच्या प्रथम पत्‍नी रमाबाई यांचे निधन झाले.
  • 23 ऑक्टोबर 1935 येवला जिल्हा नाशिक येथे प्रतिज्ञा: ‘हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही.’
  • 1935-38 या काळात मुंबईतील शासकीय विधी विद्यालयाचे प्राचार्य.
  • 1936-37 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना (Independent Labour Party) या पक्षाने 1937 च्या प्रांतिक निवडणुका लढविल्या.
  • 1933 हिंदू धार्मिक ग्रंथांच्या पारायणासाठी मुखेड येथे सत्याग्रह.
  • 1942 अखिल भारतीय शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना (मुख्यालय: नागपुर)
  • 1942-1946 ह्या काळात गवर्नर जनरल कार्यकारी मंडळावर मजूरमंत्री म्हणून नियुक्ती.
  • 1946 मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना.

या संस्थेमार्फत मुंबई येथे सिद्धार्थ कॉलेज 1946 तर औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज ची स्थापना (1950)

  • 1947 स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात कायदेमंत्री.
  • 29 ऑगस्ट 1947 घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड.
  • 1948 डॉक्टर सविता शारदा कबीर यांच्याशी दुसरा विवाह.
  • 1948 हिंदू कोड बिलाची निर्मिती.

(हिंदू कोड बिल हे अविभक्त कुटुंब पद्धती विरुद्ध होते या बिलानुसार स्त्रिया व समाजातील इतर घटकांना समान हक्क मिळणार होते)

“हिंदू कोड बिलाला विरोध झाल्याने आंबेडकरांनी मंत्रिपदाचा त्याग केला”.

बाबासाहेबांची ग्रंथसंपदा

14 ऑक्टोबर 1956 नागपूर येथे डॉक्टर आंबेडकर यांनी आपल्या हजारो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.

नागपूरला दीक्षाभूमी असे संबोधिले जाते. चंद्रमणी महास्थवीर यांनी आंबेडकरांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.

6 डिसेंबर 1956 दिल्ली येथे डॉक्टर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण.

  • हु वेअर द शूद्र? (शूद्र कोण होते)
  • थॉट्स ऑन पाकिस्तान
  • रिडल्स इन हिंदुइझम
  • कास्ट इन इंडिया
  • द प्रॉब्लेम ऑफ रुपी.
  • बुद्ध अँड हिज धम्म.
  • द अनटचेबल्स.
  • अँनिहीलेशन ऑफ कास्ट.
  • रानडे, गांधी आणि जीना

आंबेडकरांची पत्रकारिता

  • मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता, प्रबुद्ध भारत ही वृत्तपत्रे आंबेडकरांनी सुरु केली.
  • मूकनायक पाक्षिकाच्या शीर्ष भागी संत तुकारामाची वचने होते तर बहिष्कृत भारत पाक्षिकाच्या शिष्यभागी संत ज्ञानेश्वरांची वचने होती.
  • मूकनायकाचे संपादक देवराई नाईक.

“आंबेडकरांना ‘आधुनिक मनु’ असे संबोधले जाते”.

  • ऑल इंडिया शेड्युल कास्ट फेडरेशनच्या स्थापने मागे अप्पा दुराई यांची प्रेरणा होती.

येवला येथे 1935 ची हिंदू धर्म त्यागण्याची प्रतिज्ञा केल्यावर आंबेडकरांनी सुमारे 12 वर्षे बहुतेक सर्व धर्माचा अभ्यास केला व बुद्ध धर्मात अस्पृश्यांचे खंडन केलेले आढळल्यामुळे त्यांनी या धर्माचा स्वीकार केला व 1956 मध्ये नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला.

बौद्ध धर्माच्या दीक्षासाठी नागपूरची निवड करण्यामागे कारण म्हणजे नागा लोकांनी आपल्या या भूमीत बौद्ध धर्माचा प्रसार केला होता.

बाबासाहेबांचे मुद्रणालय भारत भूषण प्रिंटिंग प्रेस.

  • 1991 डॉक्टर आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
  • 1990-1991 हे आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष सामाजिक न्याय वर्ष म्हणून पाळले गेले.
  • आंबेडकर यांच्या मुंबई येथील समाधी स्थळाचे नाव चैत्यभूमी (दादर)

डॉक्टर बाबासाहेब हे त्यांच्या आई-वडिलांचे चौदावे अपत्य होते.

शिका, चेतवा व संघटित व्हा हे बहिष्कृत हितकारणी सभेचे ब्रीद वाक्य होते.

आंबेडकरांनी गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा फुले यांना गुरुस्थानी मानले.

1920 च्या माणगाव अस्पृश्यता परिषदेत अध्यक्ष होते.

मंदिरप्रवेश चळवळीमुळे 1935 मध्ये काळाराम मंदिर अस्पृश्यांना खुले झाले त्यानंतर एलीचपूर येथील दत्त मंदिर, अमरावतीचे अंबादेवीचे मंदिर सोलापूरचे सिद्धेश्वर मंदिर इत्यादी मंदिराच्या सत्याग्रहाच्या चळवळीपुढे आल्या.

आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत दलितांना प्रोटेस्टंट किंवा नॉन कॉन्फेर्मिस्ट हिंदूंचा दर्जा मिळावा अशी मागणी केली.

1928 सायमन कमिशनला भारतभर विरोध होत असताना डॉक्टर बाबासाहेबांनी कमिशनसमोर अस्पृश्यांचा समस्या मांडण्याचे धाडस केले.

रिपब्लिकन पार्टी स्थापन करण्याचे डॉक्टर बाबासाहेबांचे स्वप्न त्यांच्या मृत्यूनंतर प्रत्यक्षात आले.

डॉक्टर बाबासाहेबांनी साउथबोरो समितीसमोर साक्ष मानताना क्रांती कायदेमंडळात अस्पृश्यांना स्वतंत्र प्रतिनिधीत्व देण्यासंबंधी शिफारस केली.

डिसेंबर 1950 मध्ये श्रीलंकेतील कोलंबो 1954 मध्ये नेपाळमधील काठमांडूम्यानमारमधील रंगून येथील जागतिक बौद्ध धर्म परिषद यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते.

1951मध्ये डॉक्टर बाबासाहेबांना भारतीय बौद्धजन महासंघाची स्थापना केली.

मजूर वर्गाने संघटित होऊन कायद्याच्या आधारे सामाजिक सुधारणा घडवून आणणे गरजेचे आहे या उद्देशाने डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली.

आंबेडकरांची प्रसिद्ध वचने

  • भाकरी पेक्षा इज्जत प्यारी.
  • राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली आहे.
  • देशाच्या स्वातंत्र्यासाठी रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत लढलेले पाहिजेल.
  • शिका संघटित व्हा संघर्ष करा.
  • भिक्षेने गुलामगिरी मिळते स्वातंत्र्य नाही.
  • आम्हाला सामाजिक व धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करतो.
  • जर माझ्या मनात द्वेष व सूडबुद्धी असती तर पाच वर्षांच्या आत मी या देशाचे वाटोळे केले असते.
  • हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही.
  • तिरस्करणीय गुलामगिरी व अन्यायाच्या अमानुष गर्तेत पिचत पडलेल्या ज्या समाजात मी जन्मास आलो त्या समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यात मी अपयशी ठरलो तर स्वतःलाच गोळी घालीन.
  • “वाचन मला अन्न पुरविते. या अन्नाचे चवर्न केले तरच ते पचते. अन्न पचले तरच बुद्धी प्रगत होते”

आंबेडकरांचे प्रसिद्ध अग्रलेख

“पुनश्च हरिओम बहिष्कृत भारत”

विशेषता

  • भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
  • मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार
  • दलितांचा मुक्तिदाता असा गौरव सायाजिराव गायकवाड यांनी केला.
  • आंबेडकरांन मध्ये तुम्हाला तुमचा उद्धार करता लाभलेला आहे (1920 च्या माणगाव परिषदेत राजश्री शाहू महाराजांचे अस्पृश्यांना आव्हान)

Babasaheb Ambedkar Biography in Marathi

Also Read

Baba Amte

Maharaj Sayajirao Gaekwad

Babasaheb Ambedkar Biography in Marathi

Join Information Marathi Group Join Group