चिमणी ची माहिती – Chimani Chi Mahiti

चिमणी ची माहिती – Chimani Chi Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण चिमणी ची माहिती जाणून घेणार आहोत. चिमणीला शास्त्रीय भाषेमध्ये सिकोनिया सिकोनिया असे म्हटले जाते इंग्लिश मध्ये तिला हाऊस स्पॅरो (house sparrow) असे म्हटले जाते तर संस्कृत भाषेमध्ये तिला चटक, वार्तिका ग्रहनीड अशा नावाने संबोधले जाते.

भारतामध्ये सर्वत्र ठिकाणी तुम्हाला चिमणी ही पाहायला मिळेल छोटीशी नाजूक चिमणी तुमच्या आसपास घरामध्ये झाडावर म्हणजेच माणसाच्या अवतीभवती नेहमी पाहायला मिळते.

सकाळ होताच या चिमण्यांची किलबिल ऐकून माणसे जागे होतात, चिमणी कडून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे सकाळी उठून ती आपल्या कामाला लागते आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी ती सकाळी उठून चाऱ्याच्या शोधामध्ये सर्वत्र फिरून घरी येते आपल्या कामांमध्ये अजिबात कंटाळा करत नाही, तसे पक्षांकडून शिकण्यासारखे भरपूर काही आहे आपल्याकडे पण तरीही आपण त्यांच्याकडून काहीही शिकत नाही.

चिमणी ही दिसायला खूपच नाजूक असते, चिमणीच्या कपाळावर, शेपटीवर आणि तिच्या मागच्या बाजूला राखाडी, कानाच्या जवळ पांढरा असा कलर असतो, ती चोच काळी असते.

आणखी वाचा : कावळ्याची माहिती

चिमणी ची माहिती

चिमणी वर्णन

चिमणी ही भारतामध्ये सर्वत्र आढळणारी पक्षी आहे. हा पक्षी हिमालयाच्या दोन हजार मीटर उंचीपर्यंत सर्वत्र आढळतो तसेच तो म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश आणि कश्मीरच्या वायव्य दिशेला ही आढळतो.

हा पक्षी नेहमी माणसांच्या अवतीभोवती राहतो ह्या या पक्षाचे मुख्य अन्न धान्य व मध, शिजवलेले अन्न यासारखे पदार्थ त्याच्या आवडीचे आहेत, मुख्यता छोटे-छोटे आळ्या त्यांचे प्रमुख अन्न आहेत.

चिमणी मधील मादी ही फिकट हिरव्या पांढऱ्या रंगाची असते तिच्यावर तपकिरी रंगाचे ठिपके असते ही मादी वर्षातून चार ते पाच अंडी देते, नर मादी हे घरटे बांधण्यापासून ते अंडी उबवण्याचे काम आळीपाळीने करतात. Phoenix Bird (स्वतःच्याच राखेतून जिवंत होणारा पक्षी)

चिमणी घरटे

चिमणी ही मिळते वस्तू वापरून आपले घरटे बनवते जसे की गवत कापूस पक्ष्यांची पिसे यासारख्या गोष्टीचा वापर करून चिमणी आपले घरटे स्वतः बनवते, तसेच झाडे बनवायला नर आणि मादी दोघे एकत्र काम करत असतात, चिमणी हे आपले घरटे झाडा झुडपांमध्ये जेथे कोणीही येणार नाही अशा ठिकाणी बनवते. चिमणीचे घरटे शक्यता मोठ्या झाडांवर किंवा एकदम झाडांची गर्दी असेल अशा ठिकाणी बांधते.

चिमणी जीवन

चिमणी चे जीवन सरासरी वर्ष 6 महिने ते 3 वर्ष असते, पण आज पर्यंत अशी नोंद आहे की आजपर्यंत सर्वात वयस्कर असलेली चिमणी कशी नोंद झाली आहे ती 23 वर्षे जगली आहे. एका माहितीच्या आधारे असे सांगितले जाते की वन्य चिमणी जवळपास 2 दशके जगली.

चिमणी ची माहिती

चिमणी बद्दल धारणा

पूर्वीचे लोक असे सांगत होते की किंवा मानतात जर एखाद्या चिमणीला माणसाचा स्पर्श झाला तर इतर चिमण्या तिला त्यांच्या समूहामध्ये घेत नाही किंवा त्यांच्या समाजामध्ये येऊन देत नाही कारण की माणसाचा स्पर्श त्यांना वर्जित मानला जातो, जर एखाद्या चिमणीला माणसाचा स्पर्श झाला तर बाकीच्या चिमण्या त्या चिमणीला चोचा मारून मारून टाकतात ज्यामुळे चिमण्या त्यांचे घरटे उंचीवरच्या ठिकाणी बांधतात. ज्यामुळे कोणत्याही मनुष्य प्राण्यां चा त्यांना स्पर्श होणार नाही.

चिमण्यांची संख्या

अलीकडे पाहण्यात आलेले आहे की वाढत्या शहरीकरणामुळे आणि वाढत्या लोक संख्येमुळे चिमण्यांचे प्रमाण खूपच कमी झालेले आहेत कारण की वाढत्या लोकसंख्येमुळे आधुनिकरण भरपूर मोठ्या प्रमाणात होत आहेत त्यामध्ये आज काल डिजिटल युग चालू झालेले आहे त्यामध्ये प्रत्येकाला मोबाईलची आवश्यकता भासत आहे त्यामध्ये मोबाईल कंपनीचे टावर यांच्यामध्ये स्पर्धा चालू झालेली आहे त्यामुळे प्रत्येक गोष्टीचे बाजारीकरण चालू झालेले आहे त्यामध्ये आता 4g आणि 5g तंत्रज्ञानामुळे जागोजागी high frequency tower लागले आहेत.

या टावर मधून electromagnetic range चे उत्सर्जन मोठ्या प्रमाणात होते या किरणांचा चिमणी या पक्षावर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसत आहे, या इलेक्ट्रॉनिक मॅग्नेटिक रेंज च्या संपर्कात आल्यामुळे चिमण्यांचा जागीच मृत्यू होतो असे एका संशोधनात आढळले आहे त्यामुळे शहरांमध्ये चिमण्यांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. तसेच आधुनिक पद्धतीच्या घरबांधणी मुळे आणि बेफिकीर वृक्षतोडीमुळे चिमण्यांना घरटे बनवण्यासाठी जागाच उपलब्ध नाहीये, तसेच शहरांमध्ये अन्नाची उपलब्धता होत नसल्याने सुद्धा शहरांमध्ये चिमण्यांचे प्रमाण कमी झालेले आहे याशिवाय शहरांमधील वाढते प्रदूषण शेतामध्ये होणारा रासायनिक खतांचा वापर कीटकनाशके यांच्यामुळे सुद्धा चिमणीच्या जीवनावर परिणाम होत आहे.

जागतिक चिमणी दिवस

20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो कारण आज-काल चिमण्यांची झपाट्याने कमी होणारी संख्या याला अनुसरून 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून जाहीर केला आहे. लोकांमध्ये जनजागृती घडवून आणण्यासाठी 20 मार्च जागतिक चिमणी दिवस म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. 2010 मध्ये भारत सरकारने 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवसानिमित्त चिमण्यांचा फोटो असलेले पोस्ट तिकीट चलनामध्ये आणलेले आहे चिमणी बद्दल जनजागृती करण्यासाठी हे मोठे पाऊल भारत सरकारने उचलले होते.

चिमणी ची माहिती

रान चिमणी

शहरी भागांमध्ये फारशी ना आढळणारी ही चिमणी म्हणजेच पितकंठ चिमणी होय, या चिमणीला रान चिमणी असे म्हटले जाते. हे चिमणी प्रामुख्याने नाशिक जिल्ह्यामधील शहराबाहेरील जंगलामध्ये आढळली जाते. डॉक्टर सलीम अली यांनी एका मृत चिमणी आढळली त्यांनी ते बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने तिचे परिक्षण केले,या सर्च मध्ये त्यांना असे आढळून आले की ही घरातली चिमणी नाहीये म्हणजेच हाऊस स्पॅरो नसल्याचं उघडकीस आले.

या चिमणीच्या मानेजवळ पिवळा रंगाचा ठिपका असतो त्यामुळे तिला पितकंठ चिमणी असे म्हटले जाते. ही चिमणी प्रामुख्याने इगतपुरी, पेठ हरसुल या भागांमध्ये आढळते. या रान चिमण्यांची सुद्धा संख्या आता झपाट्याने कमी होत चाललेली आहे कारण की यांची शिकार मोठ्या प्रमाणावर होत चाललेली आहे. काही ठिकाणी या पक्षांचा वापर अन्न म्हणून सुद्धा केला जातो. नेचर कॉन्झर्वेशन सोसायटी आणि वनविभागाच्या ग्रामीण भागात या संदर्भात जनजागृतीचे काम गेल्या सात ते आठ वर्षांपासून चालू आहे. विकिपीडियावरून

चिमणी संवर्धन

पक्षी प्रेमी यांच्या निरीक्षणावरून असे सरासरी प्रमाण समजले आहे की मागील पाच वर्षाच्या आकडेवारीमध्ये 2015 मध्ये चिमण्यांचे प्रमाण 33.33 टक्के होते 2016 मध्ये जाऊन ते 32.99 टक्के वर आले 2017 मध्ये 26.5 टक्के आणि 2018 मध्ये 22.13 टक्क्यावर चिमण्यांचे प्रमाण येऊन पोहोचले आहे. चिमण्यांच्या संवर्धनासाठी अहमदनगर जिल्हा निसर्गप्रेमी तर्फे जैवविविधता संशोधन व संवर्धन केंद्र सुरु करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये चिमण्यांच्या संवर्धनासाठी मजबूत अशा कुत्रिम काट्यांची आणि त्यांना मुलं खाद्य उपलब्ध होईल असे बर्ड फीडर जिल्हा भरपूर होण्याचे काम हे निसर्गप्रेमी करत आहेत.

चीनमधील चिमणी मारो आंदोलन माहिती मराठी

चायना मध्ये 1998 मध्ये four pest campaign चालू झाली होती ज्याच्या परिणाम पूर्ण जगावर पडला होता आणि त्याचे परिणाम आजही आपल्याला पाहायला मिळतात. जेव्हा चायनाला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा त्यांच्या येथे कम्युनिस्ट सरकारची स्थापना झाली. जेव्हा चायना मध्ये चीनी सरकार स्थापन झाले तेव्हा त्या सरकारने ठरवले होते की आम्ही चायनाला पॉलिटिक्स इकॉनोमी आणि जागतिक स्तरावर सर्वोच्च शिखरापर्यंत नेणार.

1958 ते 1962 या दरम्यान चिनी सरकारने पंचवार्षिक योजनेची सुरुवात केली. या योजनेचे नाव होते (the great leap forward) म्हणजेच की एक मोठी उंच उडी. या योजनेअंतर्गत चिनी सरकारने एग्रीकल्चर म्हणजे शेतीसाठी नवीन सुधारणा यंत्र सुरू केले, किंवा शेतीसंदर्भात नवीन नियम लागू केले.

Fore Pests Target

Fore Pests Target या योजनेअंतर्गत चायनीज सरकारने Rats, Flies, mosquito, Sparrow अशा प्राण्यांना टार्गेट केले होते.

चिमणी सोडून वरील तिन्ही जीव माणसांमध्ये रोग पसरवण्याचे काम करत होते चायना मध्ये 19 व्या शतका मध्ये लाखो लोकांचा जीव गेलेला होता त्यामध्ये प्रामुख्याने, Bubonic Plague, Cholera, tuberculosis, Small pox, Malaria, Dengue यासारख्या रोगांमुळे चायना खूपच ग्रासित झालेला होता.

चिमण्या बद्दलचे चायना ची अशी धारणा होते की चिमण्या या वर्षाला लाखो टन अन्नाची नासाडी करतात म्हणजेच अन्न खाऊन टाकतात तर त्यांच्यावर आळा घालण्यासाठी चायनाने कठोर निर्णय घेतले होते. त्यांच्या निष्कर्षानुसार एक चिमणी वर्षाला साडे चार किलो अन्न वर्षाला खाऊन टाकते त्यामुळे त्यांच्यावर आळा घालण्यासाठी चायनाला कठोर निर्णय घ्यावे लागले.

चायना ने लगेच आदेश काढले की हे चार जीव दिसताक्षणी मारून टाकले पाहिजे, त्यामुळे लोकांमध्ये या जीवान विषयी तिरस्काराची भावना जागृत होऊ लागली. याचा परिणाम लोकांमध्ये एक कॉम्पिटिशन ची भावना तयार झाली कोण जास्त चिमण्या मारतोय ह्या गोष्टींमध्ये स्पर्धा सुरू होऊ लागली.

आणखी वाचा : पोपटाची माहीती

चायनीज सरकारने या गोष्टीला अजून बळ देत जागोजागी चिमण्यांना मारण्याचे पोस्टर लावण्यात आले. या गोष्टीचा परिणाम असा झाला की एक वर्षाच्या आत मधेच 1 बिलियन चिमणी, 1.5 बिल्लियन उंदीर वर्षभराच्या आत मध्ये मारले गेले.

पण चायनाला तेव्हा फुड चैन याबद्दल फारशी माहिती नव्हती कारण की फुड चैन निसर्गावर अवलंबून असते चिमणी हा छोट्या जीवजंतू, आळ्या, झाडांवर पडणारे छोटे किडे यांना खाऊन आपले पोट भरते, पण चिमण्यांना मारण्याचा वेगळाच परिणाम चायनाच्या एग्रीकल्चर वर झाला.

बेसुमार चिमण्यांना मारल्यामुळे त्यांची शिकार झाल्यामुळे लवकरच चीन वर नागतोडा म्हणजे grass copper यांचे अटॅक त्यांच्या जमिनीवर होऊ लागले आणि बघता-बघता अशा रीतीने grass copper ने पूर्ण शेत जमीन खाऊन टाकले. या सगळ्या निर्णयामुळे चायनातील जनता उपाशी मरू लागली, चायना वर त्या वर्षी दुष्काळाचे सावट उभे राहिले.

जॅक स्पॅरो कोण आहे?

जॅक स्पॅरो हे काल्पनिक पात्र आहे. प्रसिद्ध हॉलीवूड चित्रपट “पायरट्स ऑफ द कॅरिबियन” चित्रपटांमध्ये जॅक स्पॅरो नावाची भूमिका हॉलीवुड ॲक्टर जॉनी डेप यांनी साकारली होती.

कन्क्लूजन

चिमणी ची माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आर्टिकल आवडल्यास तुमच्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

चिमणी ची माहिती – Chimani Chi Mahiti

4 thoughts on “चिमणी ची माहिती – Chimani Chi Mahiti”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group