धोंडो केशव कर्वे

Biography of Dhondo Keshav Karve in Marathi धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या आजोळच्या गावी 18 एप्रिल 1858 रोजी झाला.

Biogrpahy of Dhondo Keshav Karve in Marathi

महर्षी धोंडो केशव कर्वे

धोंडो केशव कर्वे यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील शेरवली या आजोळच्या गावी 18 एप्रिल 1858 रोजी झाला.

प्राथमिक शिक्षण मुरुड येथे झाले. दहावीची परीक्षा पास झाल्यावर इंग्रजी शिक्षणासाठी ते रत्नागिरीला गेले.

तेथे त्यांना दरमहा दीड रुपया शिष्यवृत्ती मिळत असे अत्यंत कष्टाने व काटकसरीने राहून 1881 मध्ये ते मॅट्रिक झाले पुढे मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून गणित हा विषय घेऊन 1884 मध्ये ते B.A परीक्षा उत्तीर्ण झाले.त्यांच्या चांगल्या अभ्यासामुळे त्यांना मासिक आठ रुपये शिष्यवृत्ती विल्सन कॉलेजात असताना मिळत होती तिच्यातल्या चार रुपयात महिना स्वतःचा सर्व खर्च भागवून उरलेल्या चार रुपये ते गावी असलेल्या वडिलांना पाठवीत होते त्यांनी पुढे दिवसभर तीन शाळात शिक्षकाच्या नोकऱ्या व उरलेल्या वेळेत शिकवण्या घेऊन M.A ची परीक्षा दिली.

या परीक्षेत ते नापास झाले तरी त्यांनी हिंमत सोडली नाही पूर्वीच 1873 मध्ये म्हणजे शिक्षणक्रम चालू असताना राधाबाईशी त्यांचा विवाह झाला होता.

Also Read

Biography of Dhondo Keshav Karve in Marathi

Dhondo Keshav Karve कार्य

  • 1891 मध्ये धोंडो केशव यांच्या पत्नी वारली व त्याच सुमारास नामदार गोखले यांनी फर्ग्युसन कॉलेजात गणिताचे प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक केली.
  • 1892 मध्ये ते पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे आजीव सदस्य बनले.
  • 1893 मध्ये त्यांनी गोदूबाई या बाल विधवेशी पुनर्विवाह केला.
  • 1893 मध्ये त्यांनी विधवा विवाहोत्तेजक मंडळी या संस्थेची स्थापना केली.
  • विधवांचा पुरस्कार करणे व विधवांशी विवाह संबंधी सामाजिक जागृती निर्माण करणे हे या संस्थेचे प्रमुख कार्य होते.
  • विधवा स्त्रिया सर्वस्वी परावलंबी असतात त्यांना स्वावलंबी जीवन लाभावे याची मानसिक व बौद्धिक सामर्थ्य वाढावी म्हणून अण्णांनी 1896 मध्ये पुण्याला अनाथ बालिकाश्रमनावाची संस्था स्थापन केली पुढे 1899 मध्ये पुण्यात प्लेगची साथ आली त्यावेळी गावातील आश्रम कोठे हलवावे अशी अण्णांना पंचायत पडली पण श्री रावबहादुर गोखले नावाच्या गृहस्थांनी अण्णा हिंगणे येथे सहा एकर जमीन आश्रमासाठी दिली. त्यामुळे तेथे चार खोल्यांची इमारत मधून त्यांनी आश्रम सुरू केला.
  • 1907 मध्ये स्त्रियांना त्यांच्या दैनंदिन जीवनात उपयोगी पडेल असे शिक्षण देण्याच्या उद्देशाने महर्षी कर्वे यांनी हिंगणे येथे महिला विद्यालयाची स्थापना केली.
  • 1910 मध्ये महर्षी कर्वे यांनी निष्काम कर्ममठ या संस्थेची स्थापना केली.
  • स्त्रियांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या संस्थानाचे कार्य निस्वार्थपणे व त्यागी वृत्तीने करणारे निष्ठावंत कार्यकर्ते तयार करणे या उद्देशाने कर्वे यांनी या संस्थेची स्थापना केली होती.
  • 1916 मध्ये महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची स्थापना केली विद्यापीठात मुलींना प्रपंच शास्त्र, आरोग्यशास्त्र, चित्रकला इत्यादी स्त्री जीवनाला उपयुक्त ठरतील अशा विषयांचा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अंतर्भाव करण्यात आला होता.
  • 1920 मध्ये शेठ विठ्ठलदास ठाकरसी यांनी आपल्या मातोश्री श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी यांच्या स्मरणार्थ 15 लाख रुपयांची देणगी या विद्यापीठाला दिली पुढे या विद्यापीठाचे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (SNDT) रूपांतरित झाले.
  • 1936 मध्ये महर्षी कर्वे यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र ग्राम शिक्षण मंडळ या संस्थेची स्थापना केली.
  • 1944 मध्ये समाजातील जातिभेद व अस्पृश्यता यांच्यासारख्या अनिष्ट प्रथांचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी समता संघाची स्थापना केली.

Biography of Dhondo Keshav Karve in Marathi

पुरस्कार

  • 1955 मध्ये भारत सरकार तर्फे पद्मविभूषण
  • 1958 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान
  • बनारस व पुणे विद्यापीठाकडून डि.लीट सन्मान दर्शक पदवी
  • मुंबई विद्यापीठाकडून एलएल.डी ही पदवी.

विशेषतः

  • स्त्री जातीचे करते सुधारक
  • विद्यार्थ्यांना मोठ्या भावासारखे प्रेमाने वागवले यामुळे विद्यार्थी कर्वे यांना अण्णा असे म्हणत.
  • कर्वे यांच्या कार्याचे स्मारक म्हणून हिंगण्याला कर्वेनगर असे नाव देण्यात आले.
  • भारतरत्न मिळविणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती.

मृत्यू

9 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांचे निधन झाले.

Biography of Dhondo Keshav Karve in Marathi

5 thoughts on “धोंडो केशव कर्वे”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group