Galileo Biography in Marathi Language

Galileo Biography in Marathi Language

Galileo Biography in Marathi Language
Biography of Galileo Galilei
Profession Analytical, dynamicsheliocentrismkinematicsobservational astronomy
Name : Galileo di Vincenzo Bonaiuti de’ Galilei
Date of Brith15 February 1564
Died : 8 January 1642 (ArcetriGrand Duchy of Tuscany)
Age : (aged 77)
Birthplace PisaDuchy of Florence
Hometown : PisaDuchy of Florence
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : N/A
Hair Colour : N/A
Nationality : PisaDuchy of Florence
Zodiac sign :
Religion
School : N/A
College : N/A
EducationUniversity of Pisa
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : 
Girlfriend : 
Wife Name
Cast
Hobbies
Net Worth : N/A

Galileo Biography in Marathi Language

Galileo Biography in Marathi Language
Galileo Biography in Marathi Language

Galileo ला महान वैज्ञानिक का म्हणतात?

Galileo हा इटलीमध्ये १६ व्या शतकात जन्माला आलेला वैज्ञानिक. एका रविवारी तो चर्चमध्ये गेला असताना एक मजेशीर घटना घडली. त्या दिवशी चर्चमध्ये उद्बोधन देण्यासाठी कोणीतरी नवीनच पाद्री आले होते. त्यांचे बोलणे नेहमीच्या पाद्री प्रमाणे प्रभावी नव्हते. त्यामुळे Galileo ला त्याच्या बोलण्याकडे लक्ष लागेना.

त्याऐवजी तो इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर छताला लावलेल्या एका झुंबरावर गेली. खिडकीतून आलेल्या वाऱ्यामुळे ते झुंबर मध्यभागी यायचे आणि तेथे न थांबता ते पुढे निघून जायचे. काही अंतर गेल्यावर ते थांबत असे आणि त्यानंतर झुंबराच्या परतीचा प्रवास सुरू होत असे.

झुंबराच्या हेलकाव्याने त्याचे तक्ष वेधून घेतले. Galileo ला गणिताची दृष्टी असल्याने एकदा केंद्रापासून गेल्यावर परत त्याच ठिकाणी यायला म्हणजे एक झोका पूर्ण करायला झुंबराला किती वेळ लागतो असा अंदाज तो करू लागला. त्याच्या असे लक्षात आले की एक झोका पूर्ण करण्यासाठी झुंबराला जवळपास सारखाच वेळ लागतो. वारा येऊन झोका मोठा होतो आणि पुन्हा पुन्हा झोके झाल्याने तो लहान होत जातो हे त्याच्या लक्षात आले. आपण केलेल्या निरीक्षणाचे त्याला नवल वाटले, त्यासाठी काही प्रयोग करायचे त्यांनी ठरविले.

चर्चमधून बाहेर पडून Galileo सरळ विद्यापीठात पोहोचले. तेथे त्यांनी झुंबराची प्रतिकृती तयार करून घेतली. झुंबराच्याऐवजी त्यांनी एक लोखंडी गोळा घेतला. हा गोळा दोरीला बांधून एक आधारावर अडकविला. प्रथम त्यांनी एका आंदोलनाला लागणारा वेळ ठरविला. त्या काळात घड्याळ उपलब्ध नव्हते. म्हणजे कालमापन करण्यासाठी त्यांनी नाडीच्या ठोक्याया उपयोग केला. या प्रयोगाअंती त्याच्या लक्षात आले की त्याचा अंदाज बरोबर होता. एका आंदोलनाला लागणारा कालावधी कायम असेच त्याला आढळले.

त्यानंतर त्यांनी दोर्याची लांबी वाढविली आणि आंदोलनाला लागणारा कालावधी कायम असल्याचे त्याच्या निदर्शनास आले की हा आंदोलनकाळ अर्थात आधीच्या आंदालनकाळाहून जास्त होता. जर दोरीची लांबी वाढविली तर आंदोलनकाळ वाढतो आणि दोरीची लांबी कमी केली तर आंदोलनकाळ कमी होतो असे त्याच्या लक्षात आले. दोरीची लांबी बदलल्याने काय होते हे त्यांनी पाहिले.

त्यानंतर आंदोलनामध्ये वस्तूमान बदलले तर काय होते हे पाहण्याच्या त्यानी प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळ्या वस्तूमानाचे लोखंडी गोळे वापरले. यावेळेस त्यांच्या असे लक्षात आले की आंदोलनकाळ केवळ दोरीच्या लांबीवर अवलंबून असतो, लंबकाच्या वस्तुमानावर नाही. या निरीक्षणाच्या आधारे आंदोलन काळ देणारे एक समीकरण त्यांनी बनविले ते असे सांगतात. यातीलT काळ दाखविते. l दोरीधी लांबी आणि g हे पृथ्वीचे गुरूत्वाकर्षण दाखविते. अशा पद्धतीने भौतिकशास्तील एक महत्वाचे सूत्र Galileoने निर्माण केले.

आपण निर्माण केलेल्या साधनाच्या म्हणजे लंबकाच्या मदतीने काळाचे मापन करता येईल हे Galileo च्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी लंबकावर चालणारे घड्याळ बनविले. ही घड्याळे अनेक वर्षे वापरात होती. डिजिटल रूपात कालमापन सुरू झाल्यानंतर लंबकाचे घड्याळ प्रकार मागे पडला. तरीही गलिलिओचे काम कमी महत्वाचे ठरत नाही. वेळ मोजण्याचे यंत्र त्यांनी जगाला दिले. त्याचे मूळ होते चर्चमध्ये झुंबराचे आंदोलन.रोजच्या घटनेकडे गणितीय दृष्टीने बघण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे जगाला घड्याळ उपलब्ध करून दिले, हे आपण विसरता कामा नये.

Galileo इटलीमध्ये गणितात संशोधन करण्यात गुंतले होते. त्याचवेळेस डेन्मार्कमध्ये हान्स लॅपरशे नावाच्या एका चष्माच्या दुकानात काम करण्याच्या व्यक्तीने दुर्बीण बनविली. त्याचा उपयोग तो दूरच्या वस्तू पाहण्यासाठी आणि ग्राहकांना दुकानात आकर्षित करण्यासाठी करीत असे, Galileo ने ती दुर्बीण मिळविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला यश आले नाही.

तेव्हा त्यांनी रात्रंदिवस एक करून दुर्बीण बनविण्याचा चंग बांधला. त्याच्या या प्रयत्नांना थोड्याच वर्षात यश आले. एकदा दुर्बीण तयार झाल्यावर त्यांनी आपला मोर्चा ग्रहगोलाकडे वळविला. दुर्बीणच्या मदतीने आकाशातील ग्रहगोल मोठे दिसतात. एवढेच नव्हे तर ते स्पष्ट दिसतात असे त्यांनी दाखवून दिले. आपण बनविलेल्या दुर्बीणच्या आधारे त्यांनी आकाशातील अनेक ग्रहगोलांचे निरीक्षण केले. त्याच्या निरीक्षणातून गुरुला अनेक चंद्र तर शनीला कडे असल्याचे त्याच्या लक्षात आले. आपले निरीक्षण त्यांनी संशोधन नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध केले. अशाप्रकारे एक खोगलशास्रज्ञ म्हणून त्यांनी नाव कमविले. आणि इतिहासात अजरामर झाले.

Galileo Biography in Marathi Language

Join Information Marathi Group Join Group