Gautama Buddha Biography Marathi

Gautama Buddha Biography Marathi

Biography of Gautama Buddha
Name : Gautama Buddha
Other Names : Shakyamuni (“Sage of the Shakyas“)
Date of Brith : Siddhartha Gautama c. 563 BCE or 480 BCE
LumbiniShakya Republic (according to Buddhist tradition)
Died : c. 483 BCE or 400 BCE
Age : (aged 80)
Birthplace Lumbini Nepal
Hometown : Lumbini Nepal/Indian
Measurements : Not Known
Height : Not Known
Weight : Not Known
Eye Colour : Not Known
Hair Colour : Not Known
Nationality : Lumbini Nepal/Indian
Zodiac sign : N/A
ReligionBuddhism
Family :
Father Name : Śuddhodana
Mother Name : Maya Devi
Step Mother : महाप्रजापती गौतमी
Bother Name : Devdatt
Sister : Not Known
Married Status : 
Spouse : Yasodharā
Children : Rāhula 

Gautama Buddha Biography Marathi

Gautama Buddha Biography Marathi
Gautama Buddha Biography Marathi
जन्म : इ.स.पू. ५६३ लुंबिनी, नेपाळ.वडील राजा शुद्धोधनजन्म इ.स.पू. ५६३ लुंबिनी, नेपाळ.
मृत्यू : इ.स.पू. ४८३ कुशीनगर, उत्तर प्रदेश, भारत.
टोपण नावे : गौतम, शाक्यमुनी
प्रसिद्ध कामे : बौद्ध धर्माचे संस्थापक
मुळगाव : कपिलवस्तु
धर्म : बौद्ध धर्म
जोडीदार (पत्नी) : यशोधरा
मुलगा : राहुल
वडील : राजा शुद्धोधन
आई : महाराणी महामाया
राष्ट्रीयत्व : भारतीय

गौतम बुद्ध यांचा संपूर्ण इतिहास काय होता?

गौतम बुध्द हे भारतीय तत्वज्ञ व बौध्दधर्माचे संस्थापक होते. शाक्य गणराज्याचा राजा शुध्दीधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया(मायादेवी) यांच्या पोटी त्यांनी लुंबिनी येथे राजकुमाराचा जन्म झाला.

या राजकुमाराचे नाव ‘सिध्दार्थ’ असे ठेवण्यात आले. सिध्दार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिध्दार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिध्दार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते.

राजकुमार सिध्दार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिध्दार्थ गौतमाचा इ.स. पू. ५४७ मध्ये विवाह झाला व पुढे त्यांना राहुल नावाचा एक पुत्र झाला.

Also Read : Lord Krishna Biography Marathi

‘बुध्द’ या शब्दाचा अर्थ आहे ‘आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी’ आणि ही उपाधी गौतम बुध्दांनी स्वप्रयत्नांनी मिळवली आहे. ‘संबुध्द’ म्हणजे बुधत्व-संबोधी प्राप्त स्वत: वर विजय मिळवलेला आणि स्वत: उत्कर्ष करु शकणारा महाज्ञानी बुध्द, आणि ‘समांसबुध्द’ म्हणजे बुध्दत्व – संबोधी प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष उध्दार करु शकणारा महाज्ञानी बुध्द, बौध्द अनुयायी लोक शाक्यमूनी गौतम बुध्दांना वर्तमानातीलसर्वश्रेष्ठ बुध्द म्हणजेच ‘संमासबुध्द’ मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुध्द हे सर्वश्रेष्ठ बुध्द मानले जातात.

बौद्ध धम्म (सदाचारी जीवन जगण्याचा मार्ग) तथागत बुद्धांपूर्वी जन्मलेल्या दीपंकर यांनी स्थापन केला, त्यापूर्वी तो श्रमण धम्माचा भाग होता [बौद्ध आणि जैन धम्म पूर्वी श्रमण धम्म (संस्कृति) चा भाग होते], बौद्ध त्रिपिटकातील बुद्धवंस ग्रंथानुसार दीपंकर हे पाहिले बुद्ध होते तर गौतम बुद्ध हे पंचविसावे बुद्ध होते.

बौद्ध धम्मातील गौतम बुद्धांच्या पूर्वीचे चोवीस बुद्ध (पूर्व बुद्ध) त्यांचा संपूर्ण इतिहास बौद्ध त्रिपिटकातील, सुत्त पिटक या ग्रंथातील, खुद्दक निकाय मधील बुद्धवंस (The Chronicle of Buddhas) या ग्रंथात उपलब्ध आहे, ते सर्व श्रमण (समन) धम्माचे होते :

१. दीपङ्करबुद्ध
२. कोण्डञ्ञबुद्ध
३. मङ्गलबुद्ध
४. सुमनबुद्ध
५. रेवतबुद्ध
६. सोभितबुद्ध
७. अनोमदस्सीबुद्ध
८. पदुमबुद्ध
९. नारदबुद्ध
१०. पदुमुत्तरबुद्ध
११. सुमेधबुद्ध
१२. सुजातबुद्ध
१३. पियदस्सीबुद्ध
१४. अत्थदस्सीबुद्ध
१५. धम्मदस्सीबुद्ध
१६. सिद्धत्थबुद्ध
१७. तिस्सबुद्ध
१८. फुस्सबुद्ध
१९. विपस्सीबुद्ध
२०. सिखीबुद्ध
२१. वेस्सभूबुद्ध
२२. ककुसन्धबुद्ध
२३. कोणागमनबुद्ध
२४. कस्सपबुद्ध

बौद्ध धम्माची खूप-खूप मोठी प्राचीन परंपरा आहे, मोहनजदड़ो-हड़प्पा सभ्यतेच्या पूर्वीपासून बौद्ध धम्माची परंपरा अखंडपणे चालत आलेली आहे. मोहनजदड़ो-हड़प्पा सभ्यतेत सुद्धा बौद्ध स्तूप सापडले आहेत. गौतम बुद्ध हे बौद्ध धम्माचे संस्थापक नसून ते बौद्ध धम्माचे पंचविसावे प्रवर्तक होते. त्यांनी पूर्वीच्या बुद्धांनी स्थापित केलेल्या विचारांचा सन्मान केला, सोबत त्यांनी बौद्ध धम्म खऱ्या अर्थाने बुद्धिवादी-विवेकवादी धम्म बनविला, यात कोणाचेही दुमत नाही!

गौतम बुद्धांनी स्वतः असे म्हटले आहे की पूर्वबुद्धांचीच परंपरा मी पुढे चालवित आहे! (संयुक्त निकाय- निदान संयुक्त, महावग्ग, सुत्त -५) गौतम बुद्ध हे व त्यांचा परिवार हा वैदिक-ब्राह्मणी धर्माचा होता, हा पूर्णपणे खोटा आणि खोडसाळ प्रचार आहे! (तथाकथित हिन्दू- प्रत्यक्षात हिन्दू हा धर्म नाही, हा शब्द सुद्धा प्राचीन नाही आणि तो अपमानजनक शब्द मुस्लिम शासकांनी भारतवासियांना उद्देशून म्हटला आहे)

गौतम बुद्ध आणि महावीर यांनी आपल्या धम्मांना सनातन धम्म (परंपरेने चालत आलेला, रूढ़िवादी, शाश्वत) आहे असे म्हटले आहे!

(धम्मपद- यमकवग्गो- गाथा-५, ऐस धम्मो सनन्तनो / ऐष धर्म: सनातन: अर्थात हा धम्म सनातन आहे)!!!

Gautama Buddha Biography Marathi

1 thought on “Gautama Buddha Biography Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group