Mahashivratri Information In Marathi

Mahashivratri Information In Marathi

Mahashivratri Information In Marathi : आजच्या आर्टिकल मध्ये आपण महाशिवरात्रि या भारतीय सणा बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पण त्या आधी जाणून घेऊया महाशिवरात्रीचे महत्व काय आहे.

God Shiv Biography

God Shiv Biography महाशिवरात्रीला भगवान शंकराचा जन्म झाला आहे अशी पौरानिक हिंदू धर्माची मान्यता आहे त्यामुळे महाशिवरात्रीला भगवान शंकराची पूजा केली जाते यावर्षी 2021 मध्ये 11 मार्चला महाशिवरात्री येणार आहे.

Mahashivratri 2021

Mahashivratri 2021 : भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. महाशिवरात्री हा हिंदू लोकांचा एक प्रमुख सण आहे. महाशिवरात्री हा वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि या सणाची वाट हिंदू भक्त खूप आतुरतेने वाट पाहत असतात. हिंदू धर्मामध्ये अशी मान्यता आहे की शंकराच्या पिंडीवर जल, दूध आणि बेलपत्र वाहिल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि आपल्या भक्ताची सर्व मनोकामना पूर्ण करतात.

महाशिवरात्रि कधी येते?

महाशिवरात्रि कधी येते : तसे पाहायला गेले तर दर महिन्याच्या कृष्ण पक्षच्या दिवशी शिवरात्री येत असते. पण फाल्गुन मासच्या कृष्ण चतुर्दशी ची शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हटले जाते. आपल्या पुराणामध्ये सर्वात जास्त महत्त्व शिवरात्रीचे आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार वर्षातून येणाऱ्या 12 शिवरात्रीमध्ये महाशिवरात्रि सर्वात महत्त्वपूर्ण असते. या वर्षी म्हणजेच 2021 मध्ये महाशिवरात्री ही 11 मार्चला येणार आहे.

महाशिवरात्री का साजरी केली जाते?

तुमच्या मनामध्ये नेहमी प्रश्न येत असेल की महाशिवरात्रि का साजरी केली जाते? महाशिवरात्री ही खूप प्राचीन काळापासून चालत आलेली एक हिंदू प्रथा आहे. महाशिवरात्रि बद्दल खूप सार्‍या मान्यता आहेत त्यापैकी काही खालील प्रमाणे.

  1. एका पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भगवान शिवजी पहिल्यांदा प्रकट झाले होते. त्याची अशी मान्यता आहे की जेव्हा शिवजी प्रकट झाले होते तेव्हा ते अग्नि ज्योतिर्लिंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले होते. ज्याचा आरंभ किंवा शेवट नव्हता. अशी मान्यता आहे की या शिवलिंगा बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी सृष्टीच्या रचना करताना ब्रह्माने हंसाचे रूप घेतले होते. आणि वर जाण्याचा प्रयत्न करू लागले पण त्यांना यामध्ये यश मिळाले नाही.
  2. एक आणखी पौराणिक कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी 64 शिवलिंग उत्पन्न झाले होते. पण आत्तापर्यंत 64 ज्योतिर्लिंगापैकी 12 ज्योतिर्लिंगाची माहिती मिळालेली आहे. ही 12 ज्योतिर्लिंगे आता भारतातील मुख्य धार्मिक स्थळे बनलेली आहेत.
  3. तिसऱ्या मान्यते अनुसार महाशिवरात्रीच्या रात्रीच भगवान शंकर आणि माता शक्ती यांचा विवाह संपन्न झाला होता.

अध्यात्मिक गुरु सद्गुरुंच्या अनुसार महाशिवरात्री का साजरी केली जाते?

Mahashivratri Information In Marathi
Mahashivratri Information In Marathi

अध्यात्मिक गुरु सद्गुरुंच्या अनुसार महाशिवरात्री का साजरी केली जाते : प्रत्येक चंद्र महिन्याचा चौदावा दिवस किंवा अमावस्येच्या आदल्या दिवशी शिवरात्रि म्हणून ओळखले जाते. कॅलेंडर वर्षात येणाऱ्या सर्व शिवरात्रींपैकी, महाशिवरात्रि सर्वात महत्वाची मानली जाते, जी फेब्रुवारी-मार्च महिन्यात येते. या रात्री, ग्रहाचे उत्तर गोलार्ध अशा प्रकारे स्थित आहे की मानवी ऊर्जा नैसर्गिकरित्या वरच्या दिशेने सरकते. तो दिवस असा आहे जेव्हा निसर्ग मनुष्याला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर पोहोचण्यास मदत करतो. या काळाचा वापर करण्यासाठी, या परंपरेनुसार, आपल्याकडे एक उत्सव आहे, जो रात्रभर राहतो. आपला मणका सरळ ठेवत – सतत जागृत राहण्यासाठी – उर्जेचा नैसर्गिक प्रवाह वाहण्याची पूर्ण संधी आहे हे सुनिश्चित करण्यासाठी हे रात्रभर उत्सव विशेष काळजी घेतात.

महाशिवरात्रीचे अध्यात्मिक महत्त्व

महाशिवरात्रीचे अध्यात्मिक महत्त्व : यामागील कथांना सोडून हा योगिक परंपरांमध्ये या दिवसालाही विशेष महत्त्व आहे कारण अध्यात्मिक साधकासाठी यास बर्‍याच शक्यता आहेत. आधुनिक विज्ञान आज बर्‍याच टप्प्यांतून पुढे आले आहे, जिथे त्यांनी आपल्याला पुरावा दिला आहे की आपण जे काही जीवन, पदार्थ आणि अस्तित्व म्हणून ओळखता, जे आपल्याला विश्व आणि नक्षत्र म्हणून माहित आहे; इतकीच फक्त एक उर्जा आहे, जी स्वतःला कोट्यावधी रूपात प्रकट करते. अनुभवाच्या प्रत्येक योगीसाठी हे वैज्ञानिक सत्य सत्य आहे. योगी शब्दाचा अर्थ असा होतो ज्याला अस्तित्वाची ऐक्य कळली असेल. जेव्हा मी ‘योग’ म्हणतो तेव्हा मी कोणत्याही विशिष्ट प्रथा किंवा तंत्र याबद्दल बोलत नाही. हा अमर्याद विस्तार आणि अस्तित्वातील एकात्म भावना जाणून घेण्याची सर्व इच्छा योग आहे. महाशिवरात्रीची रात्र व्यक्तीला अनुभवण्याची संधी देते.

शिवरात्री आणि महाशिवरात्रि काय आहे?

शिवरात्री आणि महाशिवरात्रि काय आहे : तसे पाहायला गेले तर हिंदू धर्मामध्ये खूप सारे सण असतात, पण तुम्ही कधी कुठल्या सणाच्या सुरुवातीला ‘महा‘ असा शब्द पाहिला नसेल कारण की याचे कारण असे आहे की महाशिवरात्रीला त्याचे स्वतःचे एक वेगळे महत्व आहे.

शिवरात्री आणि महाशिवरात्रि यामधील अंतर

शिवरात्री आणि महाशिवरात्रि यामधील अंतर याचे सर्वात मोठे अंतर म्हणजे महाशिवरात्रि ही वर्षातून एकदा येते आणि शिवरात्री ही दर महिन्याला येते. शास्त्राच्या अनुसार महिन्यातील सोमवार आणि प्रदोषचा दिवस भगवान शंकराचा पुजेचा दिवस मानला जातो. शिवरात्री ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी ला मानला जातो. ज्याला प्रदोष म्हटले जाते. हिंदू कथेच्या अनुसार जेव्हा प्रदोष श्रावण महिन्यामध्ये येते तेव्हा वर्षातील सर्वात मोठी महाशिवरात्रि मानली जाते. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्ष चतुर्दशी या तिथीला पडणारी शिवरात्रीला महाशिवरात्रि म्हटले जाते. शास्त्राच्या अनुसार या दिवशी चंद्र आणि सूर्य एक मेकांच्या जवळ असतात. अशा वेळेस समय जीवन रुपी चंद्रमा आणि शिव रुपी सूर्य यांचे मिलन होते. त्यामुळे या दिवशी भगवान शंकराची पूजा केली पाहिजे.

हे पण वाचा,
1. 15 ऑगस्ट ची माहिती.
2. साक्षरता दिवस ची माहिती.
3. व्हॅलेंटाईन डे का साजरा केला जातो.

महाशिवरात्रीच्या रात्री का झोपू नये?

यावर्षी 2021 मध्ये शिवरात्री ही 11 मार्चला (गुरुवारी) येणार आहे. महाशिवरात्रीची रात्र खूपच खास रात्र असते या रात्री भगवान शिवची चार प्रहर पूजा केली जाते. ही पुजा केल्याने तुम्हाला धर्म, काम, अर्थ आणि मोक्षाची प्राप्ती होते.

  1. पहिल्या चरण मध्ये धर्म ची पूजा केली जाते.
  2. दुसरा चरण मध्ये काम ची पूजा केली जाते.
  3. तिसरा चरण मध्ये अर्थ ची पूजा केली जाते.
  4. चौथ्या चरणामध्ये मोक्ष प्राप्त होण्याची पूजा केली जाते.

ही पुजा केल्याने त्या व्यक्तीचे सारे पाप नष्ट होते आणि त्याला मोक्षाची प्राप्ती होते.

महाशिवरात्रि 2021 : महाशिवरात्री पूजेचे शुभ मुहूर्त

हिंदू पंचांगानुसार फाल्गुन मासच्या कृष्णपक्षच्या चतुर्दशी महाशिवरात्रि येत असते, यावर्षी 2021 मध्ये महाशिवरात्रि 11 मार्च (गुरुवारी) येत आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी अशी मान्यता आहे की विधिविधान पूजा सर्व मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्रीचे नियम पालन करणाऱ्या व्यक्तीवर भगवान शिव प्रसन्न होतात.

महाशिवरात्रि व्रत नियम

  1. महाशिवरात्रीच्या दिवशी तांदूळ गहू पासून बनवलेल्या वस्तूंचे सेवन नाही केले पाहिजे.
  2. या दिवशी मास आणि दारू सारख्या गोष्टीपासून दूर राहिले पाहिजे.
  3. महाशिवरात्रीच्या दिवशी बेसन आणि मैदा सारख्या गोष्टींचे सेवन नाही केले पाहिजेल.
  4. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास ठेवणाऱ्या व्यक्तीने झोपले नाही पाहिजे. अशी मान्यता आहे की दिवसा झोपल्याने या उपवासाचा फायदा होत नाही.
  5. या दिवशी वाद-विवादा पासून वाचले पाहिजे.
  6. कटू शब्दांचा प्रयोग नाही केला पाहिजे.
  7. या दिवशी तुम्ही चहा, फळ आणि दूध सारख्या वस्तूंचे सेवन करू शकता.
  8. या दिवशी तुम्ही शाबुदाना पासून बनवलेली खिचडीचे सेवन करू शकता.

महाशिवरात्री पूजा विधी

  1. मातीच्या किंवा तांब्याच्या लोटे मध्ये पाणी किंवा दूध त्यामध्ये बेलपत्र, धोत्र्याचे फुल तांदूळ शिवलिंगावर अर्पण केले पाहिजे.
  2. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव पुराण आणि महामृत्युंजय मंत्राचा जप केला पाहिजे. महाशिवरात्रीच्या रात्री जागरण केले पाहिजे.
  3. शास्त्राच्या अनुसार महाशिवरात्रीची पूजा निशील काल मध्ये केले पाहिजे.

Mahashivratri Essay in Marathi

Mahashivratri Essay in Marathi : या आर्टिकल चा उपयोग तुम्ही महाशिवरात्री का साजरी केली जाते यासाठी सुद्धा करू शकता. जर तुम्हाला असेच हिंदू सणांविषयी डिटेल्स मध्ये माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच आमच्या ऑफिशियल वेबसाइट ला आणि ऑफिशियल यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून हिंदू सणांविषयी माहिती जाणून घेऊ शकता.

Conclusion,
Mahashivratri Information In Marathi हा Article तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Mahashivratri Information In Marathi

Tags : Mahashivratri 2021, Mahashivratri Information In Marathi, अध्यात्मिक गुरु सद्गुरुंच्या अनुसार महाशिवरात्री का साजरी केली जाते?, महाशिवरात्रि 2021 : महाशिवरात्री पूजेचे शुभ मुहूर्त, महाशिवरात्रि कधी येते?, महाशिवरात्रि व्रत नियम, महाशिवरात्री का साजरी केली जाते?, महाशिवरात्री पूजा विधी, महाशिवरात्रीचे अध्यात्मिक महत्त्व, महाशिवरात्रीच्या रात्री का झोपू नये?, शिवरात्री आणि महाशिवरात्रि काय आहे?

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group