पंडित जवाहरलाल नेहरू

पंडित जवाहरलाल नेहरू Biography in marathi 1955 साली भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पंडित नेहरूंना देऊन सन्मानित करण्यात आले.

पंडित जवाहरलाल नेहरू Biography in marathi

  • संपूर्ण नाव जवाहरलाल मोतीलाल नेहरू
  • जन्मस्थान अलाहाबाद उत्तर प्रदेश
  • वडील मोतीलाल
  • आई स्वरूपराणी
  • शिक्षण 1910 मध्ये केंब्रिज विद्यापीठाच्या कॉलेजातून पदवी संपादन केली. 1912 इनर टेंपल या लंडनमधील कॉलेजातून बॅरिस्टर पदवी संपादन केली.
  • विवाह कमला सोबत

पंडित जवाहरलाल नेहरू Biography in marathi

  • 1912 मध्ये इंग्लंडहून भारतात परत आल्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या वडिलांचे ज्युनियर म्हणून अलाहाबाद उच्च न्यायालयात वकिली सुरू केली.
  • 1916 मध्ये राजकारणात कार्य करण्याच्या उद्देशाने पंडित नेहरूंनी गांधीजींची भेट घेतली देशाच्या राजकारणात भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यावा अशी त्यांची इच्छा होती.
  • 1916 मध्ये त्यांनी डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या होमरूल लीगमध्ये प्रवेश केला. 1918 मध्ये ते या संघटनेचे सेक्रेटरी बनले. सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यातही ते सहभागी झाले.
  • 1920 मध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेल्या असहकाराच्या चळवळीत नेहरू सहभागी झाले त्याबद्दल त्यांना सहा महिने कारावासाची शिक्षा झाली.
  • 1922-23 मध्ये जवाहरलाल नेहरूंची अलाबाद नगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
  • 1927 मध्ये नेहरूंनी सोव्हिएत युनियनला भेट दिली.
  • समाजवादाच्या प्रयोगाने ते प्रभावित झाले समाजवादी विचारांकडे आकृष्ट झाले.
  • 1919 मध्ये लाहोर येथे भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून नेहरूंची निवड झाली होती याच अधिवेशनात काँग्रेसचे प्रथम संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली.
  • या अधिवेशनात भारताला पूर्णपणे स्वातंत्र्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव पास करण्यात आला.
  • हा निर्णय सर्व भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी 26 जानेवारी 1930 हा दिवस राष्ट्रीय सभेने निश्चित केला.
  • गावोगावी प्रचंड महासभा झाल्या जनतेने स्वातंत्र्यासाठी लढण्याची प्रतिज्ञा केली म्हणून 26 जानेवारी हा दिवस महत्त्वाचा आहे.
  • 1930 मध्ये महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली पंडित नेहरू या चळवळीतील सहभाग अत्यंत महत्त्वाचा होता.
  • 1937 मध्ये काँग्रेसने प्रांतिक कायदेमंडळांना निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आणि त्यामध्ये भरघोस यश संपादन केले यावेळी काँग्रेसच्या प्रचाराची धुरा प्रामुख्याने नेहरूनीच वाहिली.
  • 1942 च्या चले जाव चळवळीला भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात अतिशय महत्त्वपूर्ण स्थान प्राप्त झाले काँग्रेसने ही चळवळ सुरू करावी म्हणून गांधीजींचे मन वळवण्यातपंडित नेहरूंनी पुढाकार घेतला होता त्यानंतर लगेच सरकारने त्यांना अटक करून अहमदनगरच्या तुरुंगात स्थान बंद केले. तसेच त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.
  • 1946 मध्ये स्थापन झालेल्या भारताच्या हंगामी सरकारचे पंतप्रधान म्हणून नेहरूंची निवड झाली.
  • भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर ते स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले आयुष्याच्या अखेरपर्यंत ते या पदावर राहिले.
  • 1950 मध्ये पंडित नेहरूंनी नियोजन आयोगाची स्थापना केली.
  • पंचशील तत्वे भारताच्या परराष्ट्र धोरणाची आधार तत्त्वे म्हणून जवाहरलाल नेहरुंनी पंचशील तत्वांना प्राधान्य दिले होते ही पंचशील तत्वे 1954 मध्ये जवाहरलाल नेहरू आणि चीनचे पंतप्रधान चौ-एन- लाय यांच्यात झालेल्या चर्चेत निश्चित करण्यात आली होती या पंचशील तत्वात पुढील पाच तत्त्वांचा समावेश करण्यात आला आहे.

पंडित जवाहरलाल नेहरू Biography in marathi

पंचशील तत्वे

  • राष्ट्रांनी परस्परांच्या प्रादेशिक सलगतेचा आणि सार्वभौमत्वाचा आदर करावा.

  • राष्ट्रांनी परस्परांच्या प्रदेशावर अतिक्रमण करू नये.

  • राष्ट्रांनी एकमेकांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये.

  • राष्ट्रांनी परस्परांशी समतेची व सहकार्याची वागणूक ठेवावी.

  • राष्ट्रांनी शांततामय सहजीवनाचे व आर्थिक सहकार्याचे धोरण स्वीकारावे.

पंडित जवाहरलाल नेहरू बुक्स

आत्मचरित्र 1936 ऑटोबायोग्रफी, जगाच्या इतिहासाचे ओझरते दर्शन 1939, भारताचा शोध 1946.

पंडित जवाहरलाल नेहरू बुक्स पुरस्कार 

  • 1955 साली भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पंडित नेहरूंना देऊन सन्मानित करण्यात आले.
  • विशेषता आधुनिक भारताचे शिल्पकार
  • पंडित नेहरूंचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिवस बालक दिन म्हणून साजरा केला जातो.

मृत्यू

27 मे 1964 रोजी पंडित नेहरूंचे निधन झाले.

पंडित जवाहरलाल नेहरू Biography in marathi

7 thoughts on “पंडित जवाहरलाल नेहरू”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group