Biography in Marathi

बायोग्राफी इन मराठी | खऱ्या व्यक्तींच्या प्रेरणादायी गाथा

रिया चक्रवर्ती – Rhea Chakraborty – Biography in Marathi

रिया चक्रवर्ती ही एक भारतीय अभिनेत्री आणि मॉडेल आहे. तिने आपल्या करिअरची सुरुवात एमटीव्ही इंडियावर 'व्हीजे' (VJ) म्हणून केली होती.

हिचा जन्म १ जुलै १९९२ रोजी बंगळुरू येथे एका मध्यमवर्गीय बंगाली कुटुंबात झाला. तिने आपले शिक्षण आर्मी पब्लिक स्कूलमधून पूर्ण केले आहे.

करिअर

रियाने २०१२ मध्ये 'तुनेगा तुनेगा' या तेलुगू चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. त्यानंतर तिने 'मेरे डॅड की मारुती', 'सोनाली केबल' आणि 'हाफ गर्लफ्रेंड' सारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.