Amritpal Singh Biography in Marathi

Amritpal Singh Biography in Marathi: आजच्या मध्ये आपण “अमृतपाल सिंग” यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. कोण आहेत अमृतपाल सिंग आणि त्यांचा एवढा धबधबा आहे. खलिस्तान काय आहे? याविषयी आपण माहिती जाणून घेत आहोत.

असे म्हटले जाते की पंजाब भारतातील सर्वात समृद्ध राज्य आहे आणि शीख धर्माचे घर आहे. हे भारतातील कृषी प्रधान राज्य आहे ज्याचे अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठे योगदान आहे. जेव्हा भारताचे विभाजन झाले तेव्हापासूनच पंजाबचे दोन तुकडे झाले एक पंजाबचा तुकडा पाकिस्तान मध्ये गेला आणि दुसरा भारतामध्ये आला. पंजाब राज्य हे नेहमीच वादाचे केंद्र बनलेले असते आणि ते नेहमीच सरकार विरुद्ध दंगली होत असतात. आता एक नवीन वाद चालू झालेला आहे तो म्हणजे “खलिस्तान”.

काही वर्षांपूर्वी दीप सिद्धू जे ‘वारिस पंजाब दे’ नावाच्या सिख समर्थन संघटनाचे प्रमुख होते त्यांनी संपूर्ण राज्यांमध्ये ठिकठिकाणी दंगे भडकवले. काही काळानंतर दीप सिद्धू हा एका कार एक्सीडेंट मरण पावला. त्यांच्यानंतर त्यांची जागा “अमृतपाल सिंग” यांनी घेतली. चला तर जाणून घेऊया अमृतपाल सिंग कोण आहेत आणि पंजाब पोलीस तसेच भारत सरकार त्यांच्या मागे का आहेत याविषयी माहिती.

Amritpal Singh Biography in Marathi

अमृतपाल सिंग जीवन परिचय:
खलिस्तान विरुद्ध भारत हे आंदोलन देशातच नव्हे तर आता विदेशामध्ये देखील उग्र होऊ लागलेल्या आहे. खलिस्तान हा भारतातून वेगळा होऊन पाहणारा एक नवीन राज्य आहे सध्याच्या पंजाब राज्यांमधून या संकल्पनेची उत्पत्ती झालेली आहे. खलिस्तानी नेत्यांचे असे म्हणणे आहे की त्यांना पंजाब हा भारतापासून वेगळा हवा आहे ज्याचे नाव ते खलिस्तान असे ठेवणार आहे. खलिस्तान प्रांताची मांग करणारे सर्वात प्रथम नेते हे जनरल सिंह भिंद्रनवाले होते.

भारतामध्ये खलीस्तांची मागणीवर होत आहे कारण की अमृतपाल सिंग सध्या ‘वारिस पंजाब दे’ खलिस्तानचे मुख्य नेते झालेले आहे.

अमृतपाल सिंग कोण आहे? (Who is Amritpal Singh)

अमृतपाल सिंग यांचा जन्म 18 जानेवारी 1993 ला पंजाब अमृतसर मधील जल्लुपूर या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तरसेम सिंग आणि आईचे नाव बलविंदर कौर असे आहे. अमृतपाल ला एक मोठा भाऊ आहे आणि त्याला दोन जुळ्या बहिणी आहेत.

अमृतपाल यांनी बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले आणि नंतर तो कामासाठी दुबईला गेला जिथे त्यांनी ट्रान्सपोर्टचा व्यवसाय सुरू केला. जेव्हा भारतामध्ये शेतकरी आंदोलन सुरू झाले त्यावेळी तो दीप सिद्धूच्या संपर्कात आला जे ‘वारीस पंजाब दे’ संघटनेचे प्रमुख होते. हे दोघे एकमेकांना कधीच भेटले नव्हते फक्त इंटरनेटच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले गेले होते.

नावअमृतपाल सिंग
वय30 वर्ष
जन्म दिनांक18 जानेवारी 1993
जन्मस्थानजल्लूपूर खेडा, अमृतसर, पंजाब
वडिलांचे नावतरसिम सिंग
आईचे नावबलविंदर कौर
पत्नीचे नावकिरणदीप कौर
शिक्षण12वी पास
धर्मसिख (पंजाबी)
संघटनवारिस पंजाब दे

वारिस पंजाब दे म्हणजे काय?

वारिस पंजाब दे ही शीख समुदायाची संस्था आहे ज्याचे उद्दिष्ट पंजाबच्या हक्कांचे रक्षण करणे आणि तरुणांना जागृत करणे आणि त्यांना शीख धर्माच्या मार्गावर आणणे आहे. पंजाबच्या स्वातंत्र्यासाठी लढणे हे त्याचे खरे उद्दिष्ट आहे. या संस्थेची स्थापना पंजाबी अभिनेता दीप सिद्धू याने ३० सप्टेंबर २०२१ रोजी केली होती. दीप सिद्धू प्रसिद्धीच्या झोतात आला जेव्हा त्याने 26 जानेवारी रोजी शेतकरी आंदोलनादरम्यान लाल किल्ल्यावर हिंसाचार केला आणि खलिस्तानी झेंडा फडकावला. त्यानंतर काही वेळातच त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला. दीप सिद्धू हे खलिस्तानी चळवळ चालवणाऱ्या जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे समर्थक होते.

दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंग ‘वारीस पंजाब दे’ या संस्थेचा प्रमुख बनतो, ज्याची बातमी कुणालाही माहीत नाही, दीप सिद्धूचे कुटुंबीयही अमृतपाल सिंगला ओळखत नाहीत. खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग आता ही संघटना चालवतात आणि वेगळ्या शीख राज्याची मागणी करतात.

निष्कर्ष:
आशा आहे मित्रांनो तुम्हाला “Amritpal Singh Biography in Marathi” विषयी माहिती मिळाली असेल जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता.

1 thought on “Amritpal Singh Biography in Marathi”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group