Bageshwar Dham: Dhirendra Krishna Shastri Biography in Marathi

Bageshwar Dham: Dhirendra Krishna Shastri Biography in Marathi (information, Wikipedia, family, Brother, Sister, Wife, Instagram, YouTube, Controversy, Net worth, Contact Number) [बागेश्वर धाम: धीरेंद्र कृष्ण शास्त्री चरित्र मराठीत माहिती, विकिपीडिया, कुटुंब, भाऊ, बहीण, पत्नी, इंस्टाग्राम, यूट्यूब, विवाद, नेट वर्थ, संपर्क क्रमांक]

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “धीरेंद्र कृष्णा शास्त्री” (Dhirendra Krishna Shastri) ज्यांना आपण भागेश्वर धाम (Bageshwar Dham) चे पीठाधीश म्हणून देखील ओळखतो. सध्या बागेश्वर धाम हे आपल्या चमत्कारामुळे संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होताना दिसत आहेत.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे असे म्हणणे आहे की त्यांच्यावर “हनुमानजीची” कृपा आहे आणि त्यांना साक्षात्कार त्यांच्यामुळेच घडते. तर काही लोक याला अंधविश्वास म्हणून देखील ओळखतात. असा चमत्कार फक्त मानसशास्त्र तज्ञ (Psychology Expert) करू शकतात. सध्या धीरेंद्र शास्त्री हे चर्चेत असल्याचे कारण म्हणजे ते नागपूरच्या दोऱ्यावर आले होते जिथे त्यांची सात दिवसाची ‘राम कथा’ चालू होती. महाराष्ट्रातील अंधश्रद्धा निर्मूलन संस्था अनिस (ANIS) यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना आव्हान दिले होते. त्यांनी त्यांच्यासमोर दहा प्रश्न ठेवले होते ज्याची उत्तरे त्यांनी बरोबर दिली तर अनिस हे संस्था त्यांच्या संस्थेला ’30 लाख रुपये’ देणगी देतील आणि जर बागेश्वर बालाजी हे ओळखण्यास असमर्थ ठरले तर त्यांनी 3 लाख रुपये अनिसच्या कार्यकर्त्यांना द्यावे. असे आव्हान “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव” यांनी दिले होते. पण धीरेंद्र शास्त्री यांचे आव्हान्स स्वीकारताच पलायन केले असे म्हटले जाते.

बागेश्वर धाम धीरेंद्र कृष्ण शास्त्री जीवन परिचय मराठी – Bageshwar dham Dhirendra Krishna Shastri Maharaj Ji Biography in Marathi

सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा आहे ती म्हणजे बागवेश्वर धाम महाराज कोण आहेत? त्यांचे नाव काय आहेत? आणि ते चमत्कार कसे करतात? याविषयी लोक सर्व काही जाणून घेण्यास उत्सुक आहेत. चला तर जाणून घेऊया “बागेश्वर धामचे मठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री” यांच्या विषयी थोडीशी रंजक माहिती.

About Dhirendra Krishna Shastri:
असे म्हणतात की धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे आपल्या दरबारात येणाऱ्या लोकांचे मन ओळखतात आणि त्यांना जीवनात पुढे जाण्याचे मार्ग दाखवतात. लोक असे म्हणतात की बागेश्वर धाम यांच्याकडे एक अलौकिक शक्ती आहे ज्याच्या मदतीने ते लोकांचे दुःख वेदना दूर करतात. ते नेहमी आपल्या प्रवचनामध्ये सनातन हिंदू धर्माबद्दल बोलत असतात त्यामुळेच काही हिंदू विरोधी लोक त्यांना नेहमीच वादग्रस्त टिपण्या करतात.

संपूर्ण नावधीरेंद्र कृष्ण शास्त्री
उपनावभागेश्वर धाम महाराज
जन्मचार जुलै 1996
वय27 वर्ष (2022)
जन्म स्थानगडा, चतुरपूर, मध्यप्रदेश (भारत)
जातपंडित
धर्महिंदू

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे सुरुवातीचे जीवन (Dhirendra Krishna Shastri Early Life)

भागेश्वर धाम म्हणजेच धीरेंद्र कृष्ण महाराज यांचा जन्म 4 जुलै 1996 ला गडा छतरपूर मध्यप्रदेश भारतामध्ये झाला. लोक त्यांना भागेश्वर महाराज या नावाने देखील ओळखतात. कारण कि ते बागेश्वर धाम से मठाधीश आहेत. लोकांना चमत्कारी बाबा या नावाने देखील ओळखतात कारण की ते आपल्या दरबारामध्ये लोकांच्या समस्येचे निवारण करतात.

बागेश्वर धाम दरबार कुठे आहे?
बागेश्वर धाम दरबार मध्य प्रदेश मध्ये आहे.

बागेश्वर धाम यांच्या वडिलांचे नाव?
बागेश्वर धाम म्हणजेच श्री धिरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या वडिलांचे नाव ‘श्री राम करपाल गर्ग’ आहे आणि त्यांच्या आईचे नाव ‘सरोज गर्ग’ आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची अध्यात्मिक शिक्षा त्यांच्या आजोबांकडून झाली त्यांचे नाव ‘श्री भगवान दास गर्ग’ होते.

लहानपणापासूनच घरामध्ये आध्यात्मिक संस्कार असल्यामुळे बागेश्वर धाम यांना पुढे जाऊन आध्यात्मिक मध्ये रस निर्माण झाला. त्यांना रामायण कथा, भगवद्गीता यासारख्या कथांचे वाचन करणे फार आवडत असे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या परिवाराची माहिती (Dhirendra Krishna Shastri Family)

वडिलांचे नावश्री राम करपाल गर्ग
आईचे नावश्रीमती सरोज गर्ग
आजोबांचे नावश्री भगवान दास गर्ग
भावाचे नावN/A
बहिणीचे नावN/A

धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या कुटुंबातील सर्वात मोठे आहेत त्यांच्या नंतर त्यांना एक भाऊ आणि एक बहीण आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री शिक्षण (Dhirendra Krishna Shastri Education)

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या शिक्षणाबद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. पण त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलेले आहे. पण जास्त वेळ त्यांनी आपल्या आजोबांसोबत धार्मिक शिक्षण घेण्यामध्ये घालवले कारण की त्यांच्या कुटुंबामध्ये आध्यात्मिक गोष्टीला जास्त महत्त्व होते. त्यांनी आपल्या आजोबांकडून संस्कृत शिकले बागेश्वर धाम यांचे कुटुंब खूपच गरीब होते पैशाचा अभावामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता आले नाही असे देखील म्हटले जाते.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री आध्यात्मिक जीवनाची सुरुवात (Dhirendra Krishna Shastri Career)

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना लहानपणापासूनच रामायण, महाभारत सारख्या काव्याचे अध्ययन केले होते. त्यांना वृंदावन मध्ये जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा होती. पण पैशाच्या अभावामुळे त्यांना तसे करता आले नाही. बागेश्वर धाममध्ये स्थित “हनुमान मंदिरामध्ये धीरेंद्र कृष्ण शास्त्री ध्यान लावत असे.” आणि इथूनच त्यांना पुढे हनुमानजीचा साक्षात्कार झाला. हनुमानजीमुळे त्यांना दिव्य दृष्टी मिळाली असे त्यांनी एका इंटरव्यू मध्ये सांगितले होते.

बागेश्वर धाम महाराज अध्यात्मिक शिक्षण करण्यासोबत मानव सेवा देखील करत होते.

बागेश्वर धाम मराठी कथा (Bageshwar Dham Marathi Story)

बागेश्वर धाम यांच्या दरबाराला “दिव्य दरबार” म्हणून देखील ओळखले जाते. सोशल मीडियावर या दिव्य दरबाराविषयी नेहमी बातमी ऐकायला मिळत असते. बागेश्वर धाम हे मध्यप्रदेश मधील छतरपुर जिल्ह्यातील गडा नावाच्या गावामध्ये स्थित आहे. जेथे प्राचीन हनुमानजीचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या आजोबाची समाधी बनलेली आहे. हा दरबार दर मंगळवारी लागतो जिथे लोक आपल्या समस्या घेऊन बागेश्वर धाम महाराज यांच्याकडे येतात.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना मिळालेले पुरस्कार (Awards)

बागेश्वर धाम महाराज यांना आपल्या कार्यासाठी अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. बागेश्वर धाम महाराज आपल्या प्रवचना निमित्त विदेशामध्ये फिरत असतात. लंडनमध्ये 14 जून 2022 ला ब्रिटिश संसदेत ‘संत शिरोमणी वर्ल्ड बुक ऑफ लंडन आणि वर्ल्ड बुक ऑफ युरोप’ ने सन्मानित केले.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री विवाद (Dhirendra Krishna Shastri Controversy)

अलीकडेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री एका वादामध्ये अडकले होते. राम कथा वाचन करण्यासाठी ते महाराष्ट्रातील नागपूर येथे येणार होते तेथे “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने” त्यांच्यावर आरोप लावले की बागेश्वर धाम महाराज समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवण्याचे काम करत आहेत. “अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव” यांनी बागेश्वर धाम महाराज यांना आव्हान दिले होते की ते आमच्या दहा प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले तर आम्ही तुमच्या संस्थेला 30 लाख रुपये देणगी देऊन आणि जर बाबांनी उत्तर देण्यास असमर्थ ठरले तर त्यांनी 3 लाख रुपये आमच्या सहकाऱ्यांना द्यावे. पण हे आव्हान न स्वकारताच बागेश्वर धाम महाराज यांनी पालायन केले असे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले.

Dhirendra Krishna Shastri Net Worth

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या आर्थिक संपत्ती (Net Worth) विषयी कुठेही माहिती उपलब्ध नाही.

Bageshwar Dham Maharaj Social Media Account Handle

InstagramClick Here
FacebookClick Here
YouTubeClick Here

बागेश्वर धाम महाराज कोण आहेत?

बागेश्वर धाम महाराज हे मध्य प्रदेश मध्ये राहणारे 27 वर्षाचे युवक आहेत.

बागेश्वर धाम महाराज यांचे चमत्कार खरे आहेत का?

बागेश्वर धाम महाराज यांच्या चमत्काराविषयी सोशल मीडियावर खूपच वादविवाद आहेत. शेवटी प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे काहींना हा चमत्कार वाटतो तर काहींना ही अंधश्रद्धा वाटते.

निष्कर्ष:
बागेश्वर धाम महाराज सध्या टीकेचा विषय आहे. काही लोक त्यांना चमत्कारी बाबा म्हणतात तर काही लोक त्यांना अंधविश्वासू बाबा म्हणतात. पण बागेश्वर धाम महाराज स्वतःला नेहमी सनातन हिंदू असे म्हणतात.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group