Ghar Chi Mahiti
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Ghar Chi Mahiti जाणून घेणार आहोत.
Ghar ही एक शिकरी पक्ष्याची जात आहे. तिचा रंग तपकीरी असून तिच्या अंगावर भरपुर पीसे असतात.तिचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. ती अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.
घारीचे अनेक प्रकार आहेत.
- साधी घार Milvus migrans
- ब्राम्हणी घार
- काळी घार अथवा कापशी
- घारीची शेपटी दुभंगलेली असते त्यामुळे उडत असताना घार सहज ओळखता येते.
Ghar ही आकाराने लहान असून तिची लांबी 50 ते 60 सेंटिमीटर असते तसेच तिचा रंग व तपकिरी असतो डोळे बसके असतात. तिची चोच आकडी सारखे असते. चोचीच्या बुडाला मांसल भाग पिवळसर डोळे तपकिरी पाय आखूड व पिवळे असून त्यावर तपकिरी पिसे असतात नखे तीक्ष्ण व काळी असतात पंख लांब व टोकदार असतात आणि शेपूट लांब व दुभागलेले असते.
आकाशात उडताना दुभंगलेल्या शेपटीमुळे तिला ओळखणे खूपच सोपे जाते.
कधी कधी आपण घार आणि गरुड यांच्यामध्ये फरक लवकर समजून येत नाही.
Ghar Chi Mahiti
गरुड घार आणि ससाणा हेफॅल्कॉनिफॉर्मिस पक्षिगणातील ॲक्सिपिट्रीडी कुलातील पक्षी असून त्यांना शिकारी पक्षी म्हणून ओळखतात तीक्ष्ण दृष्टी, शक्तिशाली टालोन्स आणि टोकदार चोच ही यांची वैशिष्ट्ये आहेत हे पक्षी दिवसा सक्रिय राहून अन्न शोधतात . तीक्ष्ण दृष्टी त्यांना उडताना अचूकपणे अन्न शोधण्यास , मजबूत पाय भक्ष्य पकडण्यासाठी आणि वक्र चोच मांस फाडण्यासाठी मदत करते.
घार या पक्षाला इंग्रजीमध्ये (black kite) असे म्हटले जाते.
गरुड ॲक्सिपिट्रिडी पक्षिकुलातील असून घार व ससाणा हुन मोठा आकार, उडण्याचा प्रचंड वेग, तीक्ष्ण आणि मजबूत चोच, मोठ्या अणकुचीदार नख्या, यासारख्या खुणांनी पटकन ओळखता येतो . गरुडाच्या ४-५ जाती भारतात दिसतात शरीराची लांबी ६०-९० सेमी. असते. शरीर सामान्यतः तपकिरी असते पण पुष्कळदा रंग मळकट पिवळसर, तपकिरी किंवा तांबूस तपकिरी असतो. शेपूट गडद करड्या तपकिरी रंगाचे असते. डोक्याचा माथा बसका, चोच जाड, मजबूत, टोकाशी वळलेली व तीक्ष्ण असते. पाय बोटांपर्य़ंत पिसांनी झाकलेले असून रंगाने तपकिरी पिवळे असतात. पायाची बोटे पसरट असतात. नख्या बाकदार व टोकदार असतात. नर व मादी रंगरूपाने सारखे दिसतात. मादी ही नरापेक्षा मोठी असते.
गरुड पंखाची फडफड न करता फक्त तरंगत मोठे अंतर तो पार करतो.ते उडताना पंखांची टोके पसरलेल्या हाताच्या पंजांसारखी दिसतात. पंखाची फडफड न करता फक्त तरंगत मोठे अंतर तो पार करतो.
ससाणा हा आकाराने कावळ्यापेक्षा थोडा मोठा असतो. याच्या वरील भागाचा रंग तपकिरी राखाडी असतो. पोटाखालचा रंग पांढरा, छाती व पोटावर तांबूस रंगाचे जवळ जवळ असलेले पट्टे, पिवळे डोके, गालावर तांबूस चट्टा असे नर ससाणाचे वर्णन आहे. मादीच्या वरील भागाचा रंग गडद तपकिरी व छाती आणि पोट पांढरे व त्यावर गडद करड्या तांबूस रंगाचे जवळ जवळ पट्टे असतात. गालावर पट्टे नसतात, पण शेपटीवर गडद रंगाचे पट्टे असतात.
साधरणपणे पक्षांच्या पंखाचा आकार , उडण्याची पध्दत तसेच डोके व पाय पाहून ओळखता येतात तसेच विविध पक्षांच्या मधील फरक सांगता येतो . त्यामुळे गरुड , घार व ससाणा यांचे ही हे गुणधर्म पाहून फरक कळतो .
पंखाचा आकार : ससाण्याचे पंख लांब सडपातळ असून टोकदार असतात . ससाणा अचूकतेपेक्षा वेगाने अधिक पारंगत असतात, जे त्यांचे वायुगतिशास्त्रीय आकार स्पष्ट करतात.
गरुडाच्या, पंखांच्या टोकांवर वेगळे, वेगळे पिसे असतात ज्यामुळे ते अधिक अचूकपणे जास्त वेळ टेहळणी करू शकतात
दुसरा फरक: फ्लाइट पॅटर्न
या तिन्ही पक्ष्यांच्या फ्लाइटचे बारकाईने नमुन्यांचे केल्यास असे दिसते की ससाण्याचे पंख अधिकसडपातळ असल्याने ते पंखाची हालचाल उडताना थोडा वेळ वेगाने करून उडतात दुसरीकडे, गरुड घार यांचे पंख शरीराच्या जास्त पृष्ठभागाच्या क्षेत्रामुळे त्यांचे पंख हळूहळू फडफडतात.
डोक्याचा आकार :, पक्ष्याच्या डोक्याचा आकार पाहून पक्षी ओळखता येतात . ससाण्याचे डोके सामान्यत: लहान आणि गोलाकार असते तर गरुडाचे डोके टोकदार दिसते.
पक्षी ओळखण्यासाठी व त्यांचा मधील फरक हे पक्षी निरीक्षणाच्या जास्त सरावाने शक्य होते . आपणास पक्षी निरीक्षणाची आवड असल्यास विविध पक्षी विविध ठिकाणी बघण्याचा जास्त सराव करा व गरुड , घार व ससाणा यातील फरक अचूक ओळखा.
घार – घार अकाशात उचांवरुन घिरट्या घालत तिचे खाद्य शोधते.तिचे खाद्य म्हणजे बेडुक, मासे, सरडे, मटण कींवा कोणत्यहि पक्ष्याची पिल्ले.
1 thought on “Ghar Chi Mahiti”