Mister Natwarlal Biography Marathi

Mister Natwarlal Biography Marathi

Biography of Mister Natwarlal
Profession : Lawyer, con man
Name : मिथिलेश कुमार श्रीवास्तव
Date of Brith : 1912
Death : 2009
Age : 97 years
Birthplace : Bangra in the Siwan district of Bihar
Hometown : 
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
School : Not Known
College : Not Known
Education : Not Known
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : N/A
Wife : Not Known
Cast : Not Known
Hobbies : Con Man
Net Worth : N/A
Mister Natwarlal Biography Marathi
Biography in Marathi

Mister Natwarlal Biography Marathi

इतिहासातील सर्वांत बुद्धिमान गुन्हेगार कुणाला म्हणता येईल?
नीरव मोदी, विजय मल्ल्यासारख्या गुन्हेगारांनाही लाजवेल असा महाठग, आठ राज्यातले पोलिस त्याला शोधत होते, त्याने फसवलेल्या लोकांच्या यादीत धीरूभाई अंबानी, टाटा-बिर्ला सारखे उद्योगपती आहेत. एव्हढंच नाही त्याची पुढची कामगिरी सांगितली तर तुम्ही त्याला दंडवतच घालाल..!! या महाठगाने सरकारी अधिकारी बनून तीन वेळा ताजमहाल, दोन वेळा लाल किल्ला आणि एकदा तर चक्क राष्ट्रपती भवनच विदेशी उद्योगपतींना विकले होते.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

मिथिलेश कुमार श्रीवास्तव ऊर्फ नटवरलाल

याने असे काही पराक्रम केलेत की, महाठग किंवा घोटाळेबाजचा समानार्थी शब्द नटवरलाल बनलाय.त्याने लोकांना फसवण्यासाठी बनवलेल्या पन्नास ते बावन्न नावांपैकी नटवरलाल हे एक नाव. या नावानेच तो सगळीकडे ओळखला जायचा. नटवरलालचा जन्म १९१२ साली बिहारमध्ये झाला. व्यवसायाने वकील असला तरी त्याचा मुख्य धंदा वेषांतर करून लोकांना फसवणे हाच होता. एकदा नटवरलालच्या शेजाऱ्याने त्याच्याकडे चेक देऊन बँकेतून पैसे आणायला सांगितले, नटवरलालने शेजाऱ्याची सही शिकून नंतर परस्पर त्याच्या खात्यातून पैसे काढले. हा त्याने केलेला पहिला गुन्हा. त्यानंतर तो त्याचा व्यवसाय बनला. अनेक ठिकाणी खोट्या सह्या करून त्याने लोकांना करोडोंचा गंडा घातला. समाजसेवक बनून तो उद्योगपतींकडे जायचा आणि त्यांच्याकडून देणगी घेऊन गायब व्हायचा. वेषांतर करणे, नकली सह्या करणे, नाव बदलणे यात तो पारंगत होता.

राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद एका कार्यक्रमात आले असता त्याने राष्ट्रपतींची हुबेहुब सही करून सर्वांना आश्चर्यचकित केले. राष्ट्रपतींनी त्याला नोकरीची ऑफरही दिली होती मात्र त्याने ती नाकारली. त्याच्या नावावर शंभरपेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याला तब्बल ११३ वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र तो २० वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहिला नाही. मूळचा बिहारचा असला तरी आठ राज्यातून त्याच्या नावावर वेगवेगळे गुन्हे दाखल होते आणि आठ राज्यातले पोलिस त्याला शोधत होते. पोलिसांनी नऊ वेळा त्याला पकडले होते, पण प्रत्येक वेळी तो पळून जाण्यात यशस्वी झाला. शेवटचे म्हणजे नवव्या वेळेस जेव्हा तो पकडला गेला त्यावेळी त्याचे वय ८४ वर्ष होते.

पकडल्यानंतर त्याला कानपूर जेलमधून एम्स हॉस्पिटलमध्ये आणलं जातं होतं, त्यावेळी नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन तो पसार झाला तो कायमचाच..!! त्यानंतर परत कधी तो पोलिसांना सापडलाच नाही. २४ जून १९९६ ला त्याला शेवटचं पाहिलं गेलं.

नटवरलालला स्वतःच्या हुशारीवर प्रचंड विश्वास होता. तो म्हणतं असे की, “भारत सरकारने परवानगी दिली तर मी माझ्या अफरातफरी करण्याच्या कौशल्यावर भारतावर असलेलं सगळं कर्ज फेडू शकतो.”

नटवरलालच्या आयुष्यावर बॉलिवूडमध्ये मि. नटवरलाल हा सिनेमाही येऊन गेला, ज्यात अमिताभ बच्चन यांनी नटवरलालची भूमिका केली होती. अशा या नटवरलालला त्याचे गावकरी मात्र फार मानतं. त्यांच्या मते गावात त्याचे एक स्मारक उभारले जावे. २००९ साली नटवरलालच्या वकिलांनी नटवरलालचा मृत्यू झाला असून त्याच्या नावावर असलेले सगळे गुन्हे मागे घेण्यासाठी याचिका दाखल केली, कारण मृत व्यक्तीवर खटला चालवला जाऊ शकत नाही. मात्र त्याच्या भावाने त्याचा मृत्यू खूप आधी म्हणजे १९९६ लाच झाल्याचं सांगितलं. त्याच्या मृत्यूबद्दलही अद्याप कोणती ठोस माहिती नाही. काहींच्या मते, पोलिसांपासून वाचण्यासाठी त्यानं केलेला हा बनाव आहे. काही असलं तरी या महाठगाने स्वतःला गुन्हेगारी विश्वात अमर करून ठेवलं आहे..!!!

Mister Natwarlal Biography Marathi

Leave a Comment