ओंकार भोजनेची महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये दमदार एंट्री

ओंकार भोजनेची महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये दमदार एंट्री

ओंकार भोजनेची महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये दमदार एंट्री #mhj #marathientertainment #mhjnews #maharashtrachihasyajatra #महाराष्ट्राची_हास्य_जत्रा

लवकरच महाराष्ट्राचा आवडता अभिनेता ‘कोकण कोहिनूरओमकार भोजने लवकरच आपल्याला सोनी मराठी वरील महाराष्ट्राची हास्य जत्रेमध्ये पुन्हा एकदा लोकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

काही काळासाठी “ओंकार भोजने” यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमांमधून ब्रेक घेतला होता. जेव्हा ओंकार भोजने यांनी महाराष्ट्राची हास्य जत्रा मधून ब्रेक घेतला होता तेव्हा तो ‘झी मराठी‘ वहिनी वर “फु बाई फु” या मालिकेमध्ये काम करत होता या गोष्टीवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती.

फॅन्सला वाटत होते की ओमकार भोजने यांनी मुद्दामून हास्य जत्रेमधून ब्रेक घेतलेला आहे कारण की त्याला ‘फु बाई फु‘ या मालिकेमध्ये काम करायचे होते काही लोकांचे म्हणणे असेही होते की त्याने पैशासाठी हा शो सोडला होता.

पण या सगळ्या गोष्टींना ओंकार भोजनांनी उत्तर दिले होते की त्याला नवीन काहीतरी करायचे आहे आणि त्याच्याकडे फिल्म देखील आहे त्याकडे त्यांना लक्ष द्यायचे होते त्यामुळे त्यांनी हास्य जत्रा सोडली होती.

आता लवकरच आपल्याला ओंकार भोजने “महाराष्ट्राची हास्य जत्रा” या कार्यक्रमांमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे.

मित्रांनो तुम्हाला ओंकार भोजने यांचा अभिनय कसा वाटतो हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन मराठी बातमीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका.

Author: Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *