पृथ्वीक प्रताप यांचा अमेरिकेतील व्हिडिओ व्हायरल

पृथ्वीक प्रताप यांचा अमेरिकेतील व्हिडिओ व्हायरल

सोनी मराठी वाहिनीवरील “महाराष्ट्राची हास्य जत्रा” कार्यक्रमातील अभिनेता “पृथ्वीक प्रताप” यांनी नुसताच एक व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केलेला आहे आणि या व्हिडिओला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

सध्या महाराष्ट्रातील हास्य जत्रेमधील कलाकार सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहे. अभिनेता ‘पृथ्वीक प्रताप‘ सध्या अमेरिकेचा दोरा करत आहे. अमेरिकेत फिरत असताना त्यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेला आहे आणि हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ पोस्ट करत अभिनेता पृथ्वीक यांनी हा व्हिडिओ बनवण्या मागचे कारण सांगितले आहे.

अमेरिकेला येण्यासाठी ची सगळी तयारी सुरू असताना आई अचानक म्हणाली ‘मला पण घेऊन चल ना अमेरिकेला’ आणि तिच्या या वाक्यावर तिला काय उत्तर देऊ हे मला कळेच ना… खूप विचार केला आणि लक्षात आलं की आता सध्या तरी आई ला प्रतिकात्मक रूपे अमेरिकेत घेऊन जाऊ शकतो म्हणून आज न्यूयॉर्क शहर फिरत असताना आईच्या साडी पासून बनवलेला कुर्ता घातला आणि सगळं शहर पिंजून काढलं तेवढच आपलं आई आपल्या सोबत असल्याची फीलिंग.
बाय द वे इथे अमेरिकेत तसं वातावरण थोडं गोंधळात पाडणारं आहे मध्येच ऊन लागत मध्येच पाऊस त्यामुळे तब्येतीवर होणारा परिणाम… त्यात सतत चा प्रवास, लागोपाठ शो यामुळे आलेला थकवा… हे सगळं आज जरा कमी झालं …
कारण ऊन, पाऊस, थकवा, आजारपण हे आपलं काहीच बिघडवू शकत नाही जर आपण आईच्या पदरा खाली असू. ❤️

मिस यू अम्मा ❤️

तळटीप : लवकरच आई ला अमेरिका वारी घडवेन त्यामुळे चिंता नसावी ☺️

Author: Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *