सद्गुरु बायोग्राफी इन मराठी (Sadhguru Biography in Marathi)

सद्गुरु बायोग्राफी इन मराठी (Sadhguru Biography in Marathi, Birth Date, Age, Education, Family, Wife, Daughter, Net Worth, Awards, Isha Foundation, Quotes, Books and Wiki)

आजच्या आर्टिकल मध्ये आपण “जग्गी वासुदेव” (सद्गुरु) यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. जग्गी वासुदेव यांना “Sadhguru” या नावाने देखील ओळखले जाते. ईशा फाउंडेशनची (Isha Foundation) स्थापना त्यांनीच केली आहे त्यामुळे त्यांना भारतातच नव्हे तर परदेशातही प्रसिद्धी मिळालेली आहे. चला तर जाणून घेऊया ‘जग्गी वासुदेव म्हणजेच आपले सद्गुरु‘ यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Sadhguru Latest Health News: सध्या जग्गी वासुदेव म्हणजेच सद्गुरु यांची प्रकृती खालवलेली आहे त्यामुळेच ते मीडियामध्ये खूपच चर्चेमध्ये आहे. सध्या त्यांच्यावर अपोलो हॉस्पिटल (Apollo Hospital) येथे उपचार सुरू आहे. याबद्दल डिटेल माहिती तुम्हाला लवकरच न्यूज मीडियामध्ये कळेल.

सद्गुरु बायोग्राफी इन मराठी (Sadhguru Biography in Marathi)

जगदीश वासुदेव ज्यांना आपण सद्गुरु या नावाने देखील ओळखतो त्यांचा ‘जन्म 3 सप्टेंबर 1957 म्हैसूर, कर्नाटक, भारत एका तामिळ कुटुंबामध्ये झाला.’ सध्या त्यांचे वय 66 वर्ष आहे. त्यांच्या वडिलांचे नाव बी.वी वासुदेव (father) असे आहे आणि त्यांच्या आईचे नाव सुशीला वासुदेव (mother) असे आहे. सद्गुरु हे पाच भावंडांमधील सर्वात मोठे आहे. त्यांचे वडील मैसूर रेल्वे हॉस्पिटलमध्ये नेत्र-विशेषज्ञ होते.

Birth date: 3rd September 1957
Age: 66 years (2024)
Father Name: B.V Vasudev
Mother Name: Sushila Vasudev
Wife Name: Vijayakumari (died 1997)
Doughter Name: Radhe (born 1990)

सद्गुरु वाइफ (Sadhguru wife name)

सद्गुरु यांचं विवाह विजयाकुमारी (wife) यांच्याशी 1984 मध्ये झाला. पण 1997 रोजी त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. त्यांना राधे (doughter) नावाची एक मुलगी आहे.

सद्गुरु यांचे शिक्षण (Sadhguru Education)

प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी “University of Mysore” मधून आपल्या अभ्यासक्रमाची सुरुवात केली तेथे त्यांनी English literature मध्ये अभ्यास करण्यास सुरुवात केली त्यांनी (BA) मधून पदवी संपन्न केलेली आहे.

Graduation: B.A (English literature)

Sadhguru Career

कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर वासुदेव यांनी पोल्ट्री फार्म बिझनेस व्यवसाय करण्यास सुरुवात केली. वासुदेव यांना अभ्यासाची खूप आवड होते त्यामुळेच काम करत असताना त्यांना कविता करण्याचा छंद लागला. हा व्यवसाय फायदेशीर होता पण घरातून या व्यवसायाला विरोध होता. त्यामुळे वासुदेव यांनी बिल्डर्स नावाच्या कंपनीसह बांधकाम उद्योगात प्रवेश केला सिबिल इंजिनिअर असलेल्या मित्रासोबत भागीदारी करून त्यांनी ही कंपनी सुरू केली. कोणतीही औपचारिक अभियांत्रिकी प्रशिक्षण नसले तरी त्यांनी त्यांच्या पोल्ट्री फार्म च्या निर्मितीतून मिळालेला अनुभवाचा उपयोग करून त्यांनी हा बिजनेस यशस्वीरित्या सुरू केला.

वय वर्ष 25 असताना त्यांच्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळाली आणि ते अध्यात्माच्या मार्गावर चालू लागले. त्यांनी आपला संपूर्ण व्यवसाय बंद करून योग साधनेच्या दिशेने प्रवास सुरू केला.

1983 मध्ये त्यांनी म्हैसूर मध्ये त्यांचा पहिला योग वर्ग शिकवला. तसेच सद्गुरु यांना प्रवासाचे देखील खूप आवड होती म्हणूनच त्यांनी मोटरसायकल वरून कर्नाटक ते हैदराबाद प्रवास केला. प्रवास करता करता त्यांनी योगाचा वर्ग चालू ठेवला ज्याला सहज स्थिती योग म्हणून ओळखले जाऊ लागले.

घरामध्ये कोणतेही आध्यात्मिक वातावरण नसताना वय वर्ष 25 असताना 23 सप्टेंबर 1982 रोजी चामुंडी टेकडीवर चढाई केली आणि दगडावर बसले असताना त्यांना पहिला अध्यात्मिक अनुभव झाला. असंच एक अनुभव घरी बसल्या असताना त्यांना झाला आणि ह्या अनुभवानंतर त्यांनी आपला चालू असलेला व्यवसाय बंद केला. सुमारे एक वर्ष ध्यान आणि प्रवास केल्यानंतर त्यांनी आपले आंतरिक अनुभव सांगण्यासाठी योग शिकवण्याचा निर्णय घेतला.

ईशा फाउंडेशनची स्थापना (Establishment of Isha Foundation)

1992 मध्ये सद्गुरु यांनी आपल्या अध्यात्मिक पर्यावरणीय आणि शैक्षणिक कामासाठी एक व्यासपीठ असायला हवे म्हणून त्यांनी “ईशा फाउंडेशन” ची स्थापना केली. पुढे त्यांनी 1993 मध्ये योग वर्गातील वाढती आवड पूर्ण करण्यासाठी आश्रमाची स्थापना केली. आश्रम स्थापन करण्यासाठी त्यांनी कोइंबतूर तामिळनाडू येथील वेलीयनगिरी पर्वताजवळ जमीन खरेदी केली आणि येथेच त्यांनी ईशा योग केंद्राचे उद्घाटन केले.

ईशा फाउंडेशन बद्दल प्रमुख गोष्टी:

  • ईशा फाउंडेशन हे स्वयंसेवकाद्वारे चालवले जाते.
  • ईशा फाउंडेशन मध्ये योग साधना शिकवली जाते.
  • इशा फाउंडेशन चा मुख्य उद्देश ग्रामीण भारतातील शिक्षणाचा दर्जा सुधारवणे आहे.

ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून सद्गुरु यांनी अनेक पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण यावर लक्ष केंद्रित करणारे प्रकल्प आणि मोहिमा सुरू केल्या. ज्यामध्ये प्रमुख प्रोजेक्ट ग्रीनहँड्स (PGH), रॅली फोर रिव्हर, कावेरी कॉलिंग आणि सेव सॉईल यांचा समावेश आहे.

  • Project Greenhands (PGH)
  • Rally Four Rivers
  • Cauvery Calling and Save Soil

कावेरी कॉलिंग ही मोहीम कावेरी नदीच्या 0.65 मैल रुंद शेत्राजवळ नदीतील पाण्याची पातळी आणि भूजल पातळी पुन्हा भरण्यासाठी वृक्षरोपण करण्यावर लक्ष केंद्रित करते आणि यामुळे ते प्रामुख्याने मीडियाच्या दृष्टीस आले.

2022 मध्ये सद्गुरु यांनी ‘जर्नी टू सेव्ह सॉईल‘ (Journey to Save Soil) या मोहिमेकडे लक्ष वेधण्यासाठी लंडन ते भारत असा 100 दिवसाचा मोटरसायकल प्रवास पूर्ण केला ज्यामध्ये मातीची झीज होण्याच्या समस्याबद्दल आणि शेतीमध्ये सेंद्रिय पदार्थ वापरण्याचे फायदे याबद्दल जागुप्त निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले.

सद्गुरु यांना मिळालेले काही पुरस्कार (Sadhguru awards)

2017 मध्ये सद्गुरु यांना ‘अध्यात्म‘ आणि ‘मानवतावादी‘ सेवांच्या क्षेत्रातील योगदानासाठी भारत सरकारकडून ‘पद्मविभूषण‘ (Padma Vibhushan) हा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
इंडियन एक्सप्रेसच्या 2012 मधील 100 सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या यादीत ते 92 व्या स्थानावर होते.
इंडिया टुडे च्या 2019 मधील 50 सर्वात शक्तिशाली भारतीयांच्या याद्या त्यांचा 40 व्या स्थानावर होते.

सद्गुरु आणि आदियोगी शिवाचा पुतळा (Sadhguru and Adiyogi)

2017 मध्ये सद्गुरु यांनी कोइमतूर येथे ईशा फौंडेशनने बांधलेल्या आदियोगी (Adiyogi) शिवाच्या पुतळ्याचे अनावरण केले. ही मूर्ती 34 मीटर (112 फूट) उंच आहे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने ही सर्वात मोठी (world largest bust) म्हणून घोषित केलेली आहे.

सद्गुरु यांचे काही अनमोल विचार (Sadhguru Quotes)

“आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण हे असे क्षण असतात, जेव्हा तुम्ही तुमचा आनंद व्यक्त करताना तुम्ही तो शोधत नसता.”

“बुद्धिमत्तेचे लक्षण हे आहे की तुम्ही सतत आश्चर्यचकित आहात, मूर्ख लोक त्यांच्या आयुष्यात करत असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीबद्दल नेहमीच मृत असतात.”

“जर तुम्ही बदलाला विरोध केला तर तुम्ही जीवनाचा प्रतिकार करता.”

“जेव्हा वेदना, दुःख किंवा राग येतो, तेव्हा आपल्या आजूबाजूला नव्हे तर आपल्या आत पाहण्याची वेळ आहे.”

“सर्व टिकाऊ शक्ती म्हणजे आपल्या शक्तीची जाणीव करणे.”

सद्गुरु नेटवर्थ (Sadhguru net worth)

सद्गुरु यांच्या आर्थिक मालमत्तेविषयी काहीही माहिती नाही.

सद्गुरु यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावे (Sadhguru books name)

  • Inner Engineering: A Yogi’s Guide to Joy
  • Karma: A Yogi’s Guide to crafting your Destiny
  • Death: An Inside Story
  • Mind is Your Business and Body the Greatest Gadget

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group