You are currently viewing शशी थरुर यांचे जीवन चरित्र – Shashi Tharoor Biography in Marathi
Shashi Tharoor Biography in Marathi

शशी थरुर यांचे जीवन चरित्र – Shashi Tharoor Biography in Marathi

शशी थरुर यांचे जीवन चरित्र (Shashi Tharoor Biography in Marathi, Information, Controversy, Congress Career, New York Times, The Guardian, Wife, Children)

Shashi Tharoor Biography in Marathi: आजच्या आर्टिकलमध्ये आपण काँग्रेसचे खासदार ‘शशी थरुर’ यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत. शशी थरूर हे काँग्रेसचे खासदार आणि भारतातील मोठे नेते आहे. शशी थरूर हे नेहमीच वादाच्या भोवर्‍यात अडकलेले आपल्याला दिसतात चला तर जाणून घेऊया नक्की शशी थरूर आहेत तरी कोण यांच्या बद्दल थोडीशी रंजक माहिती.

शशी थरूर हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसमध्ये ते खासदार म्हणून काम करत आहेत काँग्रेसचे सदस्य म्हणून त्यांनी या प्रदेशात सलग दोन वर्ष निवडणुका जिंकलेले आहेत. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला होता.

शशी थरुर यांचे जीवन चरित्र – Shashi Tharoor Biography in Marathi

पूर्ण नावडॉक्टर शशी थरूर
जन्मतारीख9 मार्च 1956
जन्मठिकाणलंडन, इंग्लंड
पक्षाचे नावभारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिक्षणडॉक्टरेट
व्यवसायलेखक आंतरराष्ट्रीय नागरी सेवक
वडिलांचे नावश्रीचंद्रन थरूर
पत्नीचे नावसुनंदा पुष्कर
मुले2

शशी थरुर कुटुंब (Family)

शशी थरूर यांचा जन्म 9 मार्च 1956 ला लंडन, इंग्लंड येथे एक मल्याळी कुटुंबामध्ये झाला. शशी थरुर यांच्या वडिलांचे नाव श्री चंद्रन थरूर आहे. शशी थरूर यांच्या आईचे नाव श्रीमती लीली थरूर आहे. शशी थरुर च्या वडिलांनी लंडन, दिल्ली, मुंबई, कोलकत्ता यासारखं अनेक ठिकाणी काम केले आहे. 

शशी थरुर यांचे शिक्षण (Education)

शशी थरुर यांनी त्यांचे शालेय शिक्षण मुंबईतील कॅम्म्पियन स्कूल आणि कोलकत्ता येथील कॉलेजएट स्कूलमधून पूर्ण केलेले आहे. यानंतर त्यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. शशि थरुर यांनी 1978 मध्ये फ्लेचर स्कूल ऑफ लॉ अंड दिपलोमॅसी मधून पीएचडी केली शशी थरुर यांना सर्वोत्कृष्ट विद्यार्थी म्हणून रॉबट बी स्टिवर्ड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

युनायटेड नेशन मधील पूर्वीच्या कारकिर्दीत त्यांना सरचिटणीस, निर्वासित कार्यकर्ते आणि प्रशासक म्हणून काम केले.

शशी थरूर यांचे कार्य (Social Work)

शशी थरुर यांनी जवळपास 29 वर्ष संयुक्त राष्ट्र काम केले आहे. शशी थरुर यांनी सर्वप्रथम 1958 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या निर्वासितांच्या उच्चायुक्त कर्माचारी सदस्य म्हणून काम करण्यास सुरुवात केली आहे यानंतर 1989 मध्ये शशी थरूर यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासचिवचे विशेष सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर ते 1996 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासचिवचे कार्यकारी संचालक बनले. 1996 मध्ये शशी थरुर यांची कम्युनिकेशन आणि पब्लिक इन्फोर्मेशन सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2006 मध्ये भारत सरकारने शशी थरूर यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पदासाठी नामांकन दिले परंतु नंतर दक्षिण कोरियाचे बांकी मोनी यांचा विजय निश्‍चित झाल्यानंतर शशी थरूर यांची उमेदवारी मागे घेतली. 

2009 मध्ये शशी थरुर यांनी केरळमधील तिरुवनंतपुरम मधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी होऊन खासदार झाले, त्यानंतर ते मनमोहन सिंग सरकारमध्ये मंत्री झाले. प्रथम शशी थरूर यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. 2012 मध्ये शशी थरूर यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री बनवण्यात आले, त्यानंतर शशी थरुर यांनी 2014 सली तिरुअनंतपुरम मधून लोकसभा निवडणूक लढवली आणि विजयी झाले. यानंतर 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शशी थरूर पुन्हा एकदा विजयी झाले आणि खासदार बनले.

शशी थरूर यांना किती भाषा अवगत आहेत? (Speaking Language)

इंग्रजी, हिंदी शिवाय फ्रेंच आणि मल्यालम भाषेवर शशी थरूर यांचे चांगली पकड आहे राजकारणात आल्यानंतर शशी थरूर यांनी राजकीय संवादासाठी सोशल मीडियाचा चांगला वापर केला 2013मध्ये शशी थरूर हे ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केले गेलेले भारतीय नेते होते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा विक्रम मोडला.

शशी थरुर यांचा विवाह आणि पत्नी (Wife, Marriage, Affair)

शशी थरुर यांनी आपल्या आयुष्यात तीन लग्न केलेले आहेत शशी थरूर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव तिलोत्तम मुखर्जी आहे शशी थरुर यांना तिलोत्तम मुखर्जी यांना कनिष्क आणि ईशान ही दोन मुले आहेत. त्यानंतर शशी थरुर यांनी कॅनेडियन Christa Gilesयांच्याशी विवाह केला नंतर ते दोघे वेगळे झाले.

शशी थरुर यांनी 2010 मध्ये सुनंदा पुष्कर यांच्याशी केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील  इलावाचेरी गावात वडीलोपर्जित घरी लग्न केले. 2014 मध्ये सुनंदा पुष्कर दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळल्या होत्या आधी हे प्रकरण आत्महत्येचे मानले जात होते मात्र नंतर संशयाची सुई शशी थरुर यांच्या कडे वळली शशी थरुर यांना ईशान आणि कनिष्क आणि शिव अशी तीन मुले आहेत. 

शशी थरूर वाद (Controversy)

शशी थरूर यांच्या पत्नीचा मृत्यू म्हणजे सुनंदा पुष्कर यांच्या निधनावर ऊन वादाला तोंड द्यावे लागले आहे याप्रकरणी शशी थरूर यांच्यावर संशयाची सुई फिरली आहे.

पाकिस्तानी पत्रकार मेहर तरारसोबत अफेरमुळे शशी थरूर चर्चेत आले आहेत दोघांनी अफेराला नकार दिला होता.

शशी थरुर यांनी राम मंदिराच्या उभारणीस संदर्भात वादग्रस्त विधान केले होते कोणत्याही चांगल्या व्यक्तीला दुसऱ्यांनी पाडलेल्या प्रार्थना स्थळावर राम मंदिर बांधावेसे वाटणार नाही.

शशी थरुर यांनी एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी वर टीका करताना म्हटले होते की ‘नरेंद्र मोदी हे शिवलिंगावर बसलेल्या विंचूसारखे आहेत ज्याला त्याला हाताने काढता येत नाही आणि चपलाने मारता येत नाही.

2014 मध्ये शशी थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते त्यानंतर काँग्रेस शशी थरूर यांना पक्षाच्या प्रवक्ते पदावरून हटवले होते.

शशी थरूर हे न्यू योरक टाइम्स, द वॉशिंग्टन पोस्ट, द गार्डियन इत्यादी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनाचे स्तंभलेखक आणि लेखक आहेत त्यांनी न्यूजवीक इंटरनॅशनल मध्ये योगदान देणारे संपादक आणि वर्तमान स्तंभलेख म्हणून काम केले. 2006 मध्ये भारत सरकारने थरूर यांना संयुक्त राष्ट्र महासचिव पदासाठी नामनिर्देशित केलेले शशी थरूर दक्षिण कोरियाचे बान की मून यांच्या नंतर दुसऱ्या क्रमांकाचे आहेत.

शशी थरुर यांची राजकीय घडामोडी (Politics Career)

  • 1978 मध्ये ते जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या   निर्वासितकांसाठी उच्चायुक्त (UNHCR) चे कर्मचारी सदस्य होते. 
  • 1989 मध्ये त्यांचे विशेष राजकीय घडामोडी साठी अंडर सेक्रेटरी जनरल याचे विशेष सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली एक युनिट तिची नंतर नियुक्त पीसस्किपिंग ऑपरेशन विभाग बनली.
  • वर्ष 2009 मध्ये मनमोहन सिंग प्रशासनात त्यांचे केंद्रीय राज्यमंत्री परराष्ट्र मंत्रालयात नियुक्ती झाली होती.
  • वर्ष 2009मध्ये थरूर हे तिरुअनंतपुरम केरल येथून पंधराव्या लोकसभेत साठी निवडून आले होते जिथे त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पी रामचंद्रन नायर यांचा पराभव केला होता.
  • वर्ष 2010 मध्ये परराष्ट्र व्यवहार समितीचे सदस्य म्हणून त्यांनी शपथ घेतली.
  • वर्ष 2012 मध्ये थरूर यांचा केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री म्हणून पुन्हा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला.
  • वर्ष 2014 मध्ये तिरुअनंतपुरम मधून ते पुन्हा निवडून आले त्यांनी भारतीय जनता पक्षाचे ओ यांचा पराभव केला राजगोपाल यांना 15,700 मतांनी पराभव केला.

सुंदर पिचाई माहिती (Sundar Pichai Biography in Marathi)

शशी थरुर यांना किती भाषेचे ज्ञान आहे?

शशी थरुर यांना 4 भाषेचे ज्ञान आहे. (हिंदी, इंग्लिश, फ्रेंच आणि मल्याळम)

शशी थरूर एवढे लोकप्रिय नेते का आहेत?

वर्ष 2013 मध्ये शशी थरुर यांनी सोशल मीडियाचा खूप चांगला उपयोग केला होता सोशल मीडियावर त्यांचे खूप फोलोवर होते त्यानंतर शशी थरुर यांचा विक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तोडला.

शशि थरूर यांचे वाद काय आहेत?

शशी थरुर यांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये तीन विवाह केले आहेत पण सर्वात वादाचे कारण म्हणजे त्यांची तिसरी पत्नी सुनंदा पुष्कर यांचा मृतदेह एका हॉटेलमध्ये संशयास्पद आढळून आला.

शशी थरुर यांनी लिहिलेली पुस्तके कोणती आहेत?

Pride, Prejudice and Punditry: The Essential, An Era of Darkness: The British Empire in India, Penguin Random House Pax Indica,The Battle Of Belonging: On Nationalism, Patristism, And What it Means To Be Indian

शशी थरुर यांचे वय?

65 Years (2021)

शशी थरुर यांचा जन्म दिनांक काय आहे?

9 March 1959

Shashi Tharoor Instagram Id

@shashitharoor (Click Here)

Final Word:-
शशी थरुर यांचे जीवन चरित्र – Shashi Tharoor Biography in Marathi
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

शशी थरुर यांचे जीवन चरित्र – Shashi Tharoor Biography in Marathi

Spread the love

This Post Has 2 Comments

Leave a Reply