Sumit Ghosh Biography

Sumit Ghosh Biography

भारत सरकारने चीनच्या ५९ अप्सवर बंदी आणली व त्यामध्ये ‘टिक टॉक’चा ही समावेश होता.
या अॅपला भारतीय पर्याय म्हणून सध्या ‘चिंगारी’ची लोकप्रियता वाढली आहे. सुमित घोष हे या अॅपचे सहसंस्थापक आहेत. विश्वात्मा नायक यांच्यासह त्यांनी या अॅपची सुरुवात केली.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Chingari App

‘टिक टॉक’वर बंदी आणण्यापूर्वीच हे अॅप लाँच झाले होते व हळूहळू त्याची लोकप्रियता वाढत होती. ‘टिक टॉक’वर बंदी आणल्यावर त्यामध्ये झपाट्याने वाढ झाली. सुमित हे छत्तीसगढच्या भिलाई येथील रहिवासी आहेत.

इंजिनिअरिंग केल्यानंतर ते सर्वात आधी टीसीएसशी निगडीत होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले, अमेरिकन कंपनीचे एक अॅप संगीतामुळे अतिशय लोकप्रिय होत होते. त्याला ‘टियर 2’ आणि ‘3’च्या लोकांचीही पसंती मिळत होती.

तेथूनच आम्हाला शॉर्ट व्हिडीओचे अॅप बनवण्याची प्रेरणा मिळाली. त्यानंतर आम्ही ‘चिंगारी’ लाँच केले. विश्वात्मा प्रोग्रामर आहेत व मी प्रॉडक्ट-ग्रोथशी निगडीत आहे. आम्ही देशासाठी असे अॅप बनवू इच्छित होतो जे टियर 2 आणि टियर 3 मध्ये राहणारे लोकही वापरू शकतील. सध्याचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसारखे सोशल मीडिया बहुतांशी टियर – वन म्हणजेच शहरात राहणारे लोकच वापरतात.

आम्हाला आमचे अॅप खेड्या-पाड्यापर्यंत नेण्याची इच्छा होती. ‘टिक टॉक’वर बंदी येण्यापूर्वीच आमच्याकडे ट्रॅक्सन होते. १० जूनला आम्ही अॅपचे मार्केटिंग सुरू केले होते व ‘टिक टॉक’वर बंदी येईपर्यंत साडेतीन दशलक्ष डाऊनलोड झाले होते.

‘टिक टॉक’वर बंदी आल्यावर यामध्ये अभूतपूर्व व अविश्वसनीय अशी वाढ झाली. आम्ही साडेतीनवरून थेट अकरा दशलक्ष डाऊनलोडपर्यंत पोहोचलो. आताही अॅपवर तीन ते चार लाख डाऊनलोड रोज होत आहेत. ज्यावेळी डाऊनलोड एकदम वाढले त्यावेळी मी आणि माझी टीम ४८ तास झोपू शकलो नाही. १ कोटी डाऊनलोड आमच्यासाठी स्वप्नवतच होते !

Download Click Chingari App

https://youtu.be/LL16EF4IDA8

Sumit Ghosh Biography

Leave a Comment