Anna Hazare

Anna Hazare Biography in Marathi अण्णा हजारे यांचे संपूर्ण नाव किसन बाबुराव हजारे आहे. त्यांचा जन्म भिंगार येथे 1940 मध्ये झाला.

Anna Hazare Biography in Marathi

Anna Hazare Biography in Marathi अण्णा हजारे यांचे संपूर्ण नाव किसन बाबुराव हजारे आहे. त्यांचा जन्म भिंगार येथे 1940 मध्ये झाला. अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी हे त्यांचे मूळ गाव. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी पाचवी पर्यंतचे शिक्षण राहणे राळेगणसिद्धीत व सातवीपर्यंतचे शिक्षण मुंबईमध्ये घेतले. गरीबी परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडून त्यांनी काही काळ फुलांच्या विक्रीचा व्यवसाय केला. पुढे 1960 मध्ये ते भारतीय सैन्यदलात भरती झाले. 1962 मध्ये चीनची झालेल्या युद्धात तसेच 1965 मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धात त्यांनी भाग घेतला होता. 1975 मध्ये अण्णा हजारे सैन्यातून निवृत्त झाले.

Anna Hazare Biography in Marathi

कार्य

अण्णा हजारे निवृत्त झाल्यानंतर आपल्या राळेगणसिद्धी या गावी परत आले. गावातील दैन्यावस्था पाहून त्यांच्यातील समाजसेवक जागा झाला त्यांनी गावाचा सामाजिक, कृषी, शैक्षणिक विकास करून गावाचा चेहरामोहरा बदलण्याचे ठरविले गावाचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी अण्णांनी अनेक विधायक उपक्रम हाती घेतले आणि त्यामध्ये त्यांना यश मिळाले.

अण्णा हजारे यांनी सामाजिक शैक्षणिक व शेती विषयी उपक्रम राळेगणसिद्धीत राबविले.

एक आदर्श ग्राम बनवण्यात अण्णांचा महत्त्वाचा वाटा आहे त्यांनी राळेगणसिद्धीत खालील उपक्रम राबवले.

Anna Hazare Biography in Marathi

सामाजिक उपक्रम

ग्रामविकास म्हणजे केवळ भौतिक सुधारणा करणे नव्हे तर गावातील माणसाला आचार शील विचारशील बनविणे होय असे त्यांचे ग्रामविकास संबंधी मत आहे म्हणून त्यांनी प्रथम खालील उपक्रमांना प्राधान्य दिले दारूबंदी, अस्पृश्यतानिवारण, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबंदी, सामुदायिक विवाह, ग्रामसफाई, व्यसनमुक्ती अशा विधायक उपक्रमात लोकांनी सहभागी करून घेण्यासाठी आण्णांनी पुष्कळ प्रयत्न केले.

कृषिविकास

अण्णांनी पुढाकार घेऊन श्रमदानाने सामुदायिक विहिरी खोदल्या “पाणी आडवा पाणी जिरवा” ही मोहिम राबवली त्यामुळे गावातील शेत जमीन व ओलिताखाली आलेल्या अण्णांनी पुढाकार घेऊन वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन केले याशिवाय शेतमाल विक्रीचा व्यवस्था, धान्य बँक, पर्यावरण रक्षण यासारखी अनेक विधायक कामे अण्णांनी आपल्या गावात केली आहेत.

शैक्षणिक व आरोग्य विकास लोकांनी आपल्या मुलांना शाळेत घातले पाहिजे असेच सक्ती त्यांच्यावर करण्यात आली गावात बालवाडी, प्राथमिक, शाळा, माध्यमिक शाळा, वसतिगृह, वाचनालय यांच्यासाठी सार्वजनिक इमारती अण्णांच्या पुढाकाराने उभ्या राहिला गावात आरोग्य केंद्र सुरू करून कुटुंबनियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी केली.

सूर्यशक्‍तीचा वापर करणारा सोलर हिटर गोबर गॅस प्लांट या सोय केल्यामुळे इंधनाची समस्या सुटण्यास मदत झाली अशा प्रकारे अण्णा हजारे यांनी गावाचा सामाजिक, कृषी, आरोग्य व शैक्षणिक विकास केला त्यामुळे गावात आर्थिक सुबत्ता आली.

Anna Hazare Biography in Marathi

पुरस्कार

  • 1978 मध्ये प्रियदर्शनी इंदिरा गांधी वृक्षमित्र पुरस्कार.
  • महाराष्ट्र शासन तर्फे कृषिभूषण पुरस्कार.
  • भारत सरकारतर्फे पद्मश्री व पद्मविभूषण हे किताब त्यांना देण्यात आले.
  • भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाचे अध्यक्ष म्हणून सत्ता सक्रिय राहिल्याबद्दल ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या जर्मनी संस्थेच्यावतीने इंटग्रिटी पुरस्काराने सन्मानित.

Also Read

Anna Hazare Biography in Marathi

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group