Gadge Maharaj

Biography of Gadge Maharaj गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव याठिकाणी 1876 मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला

Biography of Gadge Maharaj

गाडगे महाराज

Biography of Gadge Maharaj गाडगे महाराज यांचे मूळ नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव याठिकाणी 1876 मध्ये एका सामान्य कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव झिंगराजी व आईचे नाव सखुबाई असे होते.

डेबूजीच्या वडिलांचा दारूच्या व्यसनापायी मृत्यू झाला सर्व शेतजमीन दारुमुळे सावकाराकडे गेली त्यानंतर पुढे सखुबाई नि डेबुला त्याच्या मामाकडे नेले तेथे असतानाच डेबूजीचा विवाह धनाची यांच्या कन्या कुंताबाई हिच्याशी झाला.

Biography of Gadge Maharaj

कार्य

महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र या प्रदेशातील निरनिराळ्या गावी ते भटकले त्यांच्या अंगावर फाटकी गोधडी अन्न व पाणी घेण्यासाठी हातात घाडगे असे म्हणून लोक त्यांना गोंधळी महाराज केव्हा गाडगे महाराज म्हणतात.

आपल्या समाजातील अज्ञान भोळ्या समजुती अनिष्ट रूढी-परंपरा इत्यादी दोषांवर त्यांना त्यांनी कठोर प्रहार केले त्यासाठी त्यांनी कीर्तन द्वारे, लोकजागृतीचा मार्ग अवलंबिला अनेक गावात संचार केला त्यांनी त्यासाठी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब करण्याचे कारण म्हणजे खेड्यापाड्यातील अज्ञानी देव भोळ्या जनतेला भजन-कीर्तन सारख्या गोष्टींचे विशेष आकर्षण वाटत असेल त्यामुळे जनतेपर्यंत पोहोचण्याचा तो प्रभावी मार्ग होय असा विचार त्यांनी केला.

गाडगे महाराज किर्तन तून अतिशय सोप्या व सुबोध भाषेत उपदेश देत माणसाने लबाडी करू नये, व्यसने करू नयेत, देवाच्या नावाने पशुपक्ष्यांची बळी देऊ नयेत, जात-पात मानू नये, कोणी आजारी पडले तर अंगारे-धुपारे न करता डॉक्टरकडे जावे नेहमीच शरीरकष्ट करावेत, चोरी चोरी करू नये, कर्ज काढू नये, भूतदया म्हणजे परमेश्वराची पूजा करणे असा उपदेश त्यांनी दिला.

“देवकी नंदन गोपाला हे गाडगे महाराजांचे आवडते भजन होते”.

पंढरपूर, आळंदी, नाशिक, त्रंबकेश्वर या तीर्थक्षेत्री यात्रेकरूंसाठी गाडगेबाबांनी बांधलेल्या प्रशस्त धर्मशाळा आहेत या धर्मशाळा गाडगेबाबांनी सर्वसामान्य यात्रेकरूंसाठी बांधल्या.

गाडगे बाबा यात्रांच्या ठिकाणी जात व देव दर्शन न घेता मंदिरांच्या बाहेर थांबून यात्रेकरूंची सेवा करीत व तेथील अस्वच्छ परिसर हाताने स्वच्छ करत, त्यांच्या लक्षात आले की यात्रेला येणाऱ्या गोरगरिबांचे फार हाल होतात त्यांना उन्हापावसात उघड्यावर राहावे लागते, म्हणून गाडगेबाबांनी या धर्मशाळा बांधल्या विदर्भातील ऋणमोचन येथे लक्ष्मीनारायणाचे’मंदिर उभारले व पूर्ण नदीवर घाट बांधला.

Biography of Gadge Maharaj

गाडगेबाबा कुठल्याही शाळेत कॉलेजात गेले नव्हते पण तुकाराम महाराजांचे अभंग त्यांच्या तोंडावर होते.

समाजातील अज्ञान, अनिष्ट, चालीरीती व अंधश्रद्धा दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर लोकशिक्षणाचा वसा घेतला ते तुकाराम महाराजांना आपले गुरू मानत व माझा कुणी शिष्य नाही असे ते सांगत.

  • काम केल्या शिवाय ते कोणाकडून ही भाकर घेत नसत.
  • भाकरी व भाजी हातात घेऊन खात.
  • श्रीमंतांनी दिलेली मिठाई पंचपक्वान्ने ते गरिबांना वाटून टाकत.

विशेषता

“सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगेबाबांना पाहावे कीर्तनात”.

“गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील समाजवादाचे एक प्रचंड व्यासपीठ होते आचार्य अत्रे”.

मृत्यू

20 डिसेंबर 1956 रोजी ते देवा घरी गेले.

Also Read

Hans Wilsdorf

धोंडो केशव कर्वे

Biography of Gadge Maharaj

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon