Swami Dayanand Saraswati

Swami Dayanand Saraswati Biography in Marathi

Swami Dayanand Saraswati Biography in marathi संपूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी जन्म 1824.

संपूर्ण नाव मूळशंकर अंबाशंकर तिवारी.

जन्म 1824.

वडिलांचे नाव अंबाशंकर

आईचे नाव अमृताबाई

शिक्षण शालेय शिक्षणापासून वंचित

विवाह अविवाहित.

Swami Dayanand Saraswati यांचे कार्य

जीवनाला कलाटणी देणाऱ्या घटना (Biography in Marathi)

एकदा शिवरात्र होती, वडील म्हणाले मुलशंकर आज सर्वांनी उपवास पकडायचा आहे, रात्रभर देवळात जागायचे आणि शंकराच्या पिंडीची पूजा करायची.

हे ऐकून मूळशंकर ने उपवास सुरू केला दिवस संपत आला रात्र झाली मूळशंकर आणि वडील शंकराच्या देवळात गेले.

त्यांनी पूजा केली पिंडीवर फुले वाहिली तांदळाच्या अक्षता वाहिल्या रात्रीचे बारा वाजले.

वडिलांना झोप येऊ लागली पण मुल शंकर जागा राहिला.

आपला उपवास निष्फळ होईल या भीतीने तो झोपला नाही.

देवळातल्या बोळातून उंदीर बाहेर आले आणि शंकराच्या पिंडी भोवती फिरू लागले. ते पिंडी वरच्या अक्षता खाऊ लागले.

हे दृश्य पाहून जी मूर्ती उंदरा पासून स्वतःचे रक्षण करू शकत नाही, ती भक्तांचे संकटापासून संरक्षण कशी काय करू शकेल, मूर्तीत काहीही सामर्थ्य नसते, तेव्हा मूर्तिपूजेला काही अर्थ नाही, अशा तऱ्हेचे विचार त्यांच्या मनात येऊ लागले.

त्या दिवसापासून त्यांच्या मनात धर्माविषयी जिज्ञासा जागृत झाली.

परमेश्वराचे शास्वत स्वरूप व धर्माचा खरा अर्थ जाणून घेण्याची ओढ त्यांना लागली.

एकदा टंकारा नगरांमध्ये कॉलरची सात आली त्यामध्ये मूळशंकरची 14 वर्षाची बहीण मरण पावली.

ह्या घटनेनंतर तीन वर्षांनी मूळ शंकरच्या आवडत्या काकांचे ही कॉलरा यामुळे निधन झाले.

ह्या घटनेमुळे त्यांच्या मनावर जबरदस्त धक्का बसला.

गृहत्याग (Biography in Marathi)

कौटुंबिक बंधनाचा त्याग करावा अशी मूळशंकराच्या मनात इच्छा निर्माण झाली.

जीवन काय आहे? मृत्यू का आहे?

या प्रश्नांची उत्तरे सुयोग्य महात्मा कडून समजून घ्यावीत असे त्यांना वाटत होते.

वयाच्या एकविसाव्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला.

त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाचा विचार केला, हे त्यांच्या निर्णयास निमित्त झाले होते.

भौतिक सुखाचा आनंद लुटना पेक्षा स्वतःची अध्यात्मिक उन्नती करून घेणे त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले.

त्यासाठी घरादाराचा त्याग करून गुरूचा शोध घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

गुरुचा शोध (Biography in Marathi)

गृहत्याग केल्यानंतर मूलशंकर अहमदाबाद, बडोदा, हरिद्वार, काशी, कानपूर या ठिकाणी गुरूच्या शोधात जंगलातून व पहाडातूनसुद्धा प्रवास करीत राहिले, परंतु त्यांना योग्य गुरु मिळाला नाही.

ह्याच सुमारास त्या काळाचे प्रकांड पंडित आणि संन्यासी स्वामी पूर्णानंद यांच्याशी मूळशंकराची भेट झाली.

त्यांचे शिष्यत्व पत्करून मूळ शंकरने संन्यास धर्माचा स्वीकार केला.

संन्यास धर्माचा स्वीकार केल्यानंतर त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती हे नाव धारण केले.

पंधरा वर्षापर्यंत सर्वत्र भ्रमंती केल्या वर स्वामी पूर्णशर्मा नामक साधूच्या म्हणण्यानुसार स्वामी दयानंद मधुरेश येऊन पोहोचले त्या ठिकाणी त्यांनी स्वामी विरजानंद यांचे शिष्यत्व पत्करले त्यांच्याकडून वेद व इतर हिंदू धर्माचे ज्ञान त्यांनी घेतले.

वैदिक ज्ञानाचा प्रसार (Biography in Marathi)

स्वामी दयानंद यांना वेद सर्वश्रेष्ठ आणि पवित्र वाटत होते. teachings of swami dayanand saraswati मुख्य म्हणजे वेदामध्ये मूर्तिपूजा नव्हती किंवा उच्च-नीच हा भाव नव्हता वेदातील ज्ञान हे खरेखुरे ईश्वरीय ज्ञान आहे, पवित्र ज्ञान आहे, आणि समाजाकरिता ते अत्यंत उपयुक्त आहे, अशी आनंदाची श्रद्धा होती, म्हणूनच त्यांनी ‘वेदांकडे परत जा’ अशी भारतीयांना शिकवण दिली.

आपल्या अस्खलित प्रवचनाद्वारे ते मूर्ती पूजा जन्मजात, उच्चनीचता, जातीभेद, घातक रूढी, यज्ञ मध्ये केलेली जाणारी पशुहत्या यांच्यावर घणाघाती आघात करू लागले.

2869 मध्ये त्यांनी काशीच्या सनातनी ब्राह्मण पंडिताशी शास्त्रावर वाद-विवाद केल्यामुळे त्यांचे नाव सर्वत्र गाजले.

स्वातंत्र्य प्रेम (Biography in Marathi)

अठराशे सत्तावन च्या असफल ते पासून तर काँग्रेसच्या स्थापने पर्यंत भारतीयांच्या हृदयामध्ये स्वतंत्र प्रेम जागृत ठेवण्याचे कार्य ज्या महापुरुषांनी केले त्यापैकी दयानंद एक होते भारतातून ब्रिटिशांना ह करण्याकरिता सशस्त्र क्रांती हा एकमेव मार्ग आहे अशी स्वामी दयानंद त्यांची पक्की खात्री होती.

स्वामी श्रद्धानंद लाला लाजपत राय आणि लाला हरदयाल इत्यादी ब्रिटिशांना भारतातून हकलण्या करिता उघडपणे लढणारे नेते आर्य समाजाचे होते.

शुद्धीकरण (Biography in Marathi)

स्वामी दयानंद आणि ख्रिस्ती आणि मुसलमान धर्मात गेलेल्या लोकांचे शुद्धीकरण करून त्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणले.

समाजाच्या सर्व घटकांना एका सूत्रामध्ये बांधण्याकरिता समान भाषा आवश्यक आहे अशी त्यांची धारणा होती हिंदी भाषेला राष्ट्रभाषेचा चे स्थान मिळावे असे त्यांचे स्पष्ट मत होते.

आर्य समाजाची स्थापना (Biography in Marathi)

  • Swami Dayanand Saraswati यांनी धर्मसुधारणेच्या कार्याची प्रेरणा ब्राह्मो समाजाकडून घेतली होती प्रारंभीच्या काळात त्यांच्या सहकार्यानेच धर्म प्रचाराने व धर्म सुधारणेचे कार्य करीत.
  • तथापि पुढे त्यांनी आपला वेगळा संप्रदाय निर्माण करण्याचे ठरविले आहे त्यानुसार त्यांनी मुंबई येथे 10 एप्रिल 1875 रोजी आर्य समाजाची स्थापना केली.
  • आर्य समाजाने धार्मिक व सामाजिक सुधारणा बरोबरच शैक्षणिक सुधारणा केल्या वेदाचे शिक्षण घेणारा तरुण हा निर्भय तेजस्वी आणि काळाचे आव्हान स्वीकारणारा निर्माण होईल असे स्वामी दयानंद यांना वाटत होते.
  • उत्तर भारतात त्यांनी चालवलेले शिक्षणाच्या प्रसाराचे कार्य तर अतिशय महत्त्वपूर्ण ठरले कार्य आर्य समाजाने लाहोर येथे दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज सुरू केले.
  • तसेच गुरुकुल संस्थेची स्थापना करून राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळा व महाविद्यालय देशाच्या विविध भागात उघडली.

स्वामी दयानंद सरस्वती यांचे विचार Quotes (Biography in Marathi)

  • सर्व मानव एक, सर्वांचे देव एक, सर्वधर्म एक, पृथ्वी माता हीच एक जीवनाची चतु:सूत्री आहे.
  • स्त्रियांना शिक्षण दिले जात नाही त्यांना अज्ञानात ठेवले जाते भारताच्या अर्धपत्नाचे एक कारण आहे, ज्याप्रमाणे गाठोड्यात असलेले रत्नांचे प्रतिबिंब आरशात दिसू शकत नाही, त्याचप्रमाणे जोपर्यंत स्त्रिया पडदा पद्धती सारख्या मूर्ख रुढीचे बंधन तोडत नाही, तोपर्यंत त्यांची प्रगती होणे अशक्य आहे.
  • त्यांनी हा पडदा फेकून दिला पाहिजे असती आणि सावित्री चिरस्मरणीय झाल्यात ते त्यांच्या सतीत्त्वामुळे आणि सद्गुनामुळे त्यांच्या पडद्यामुळे नाही.
  • स्त्रियांना समाजात समानतेचे स्थान मिळाले पाहिजे.
  • स्त्री ही कुटुंबाची स्वामिनी असल्यामुळे तिला अनेक अधिकार मिळाले पाहिजे.

स्वामी दयानंद सरस्वती यांचे ग्रंथ book

सत्यार्थप्रकाश हा महान ग्रंथ म्हणजे स्वामी दयानंद यांनी आपल्या समाजाला दिलेली अनमोल देणगी होय या ग्रंथांमध्ये 15 अध्याय असून त्यामध्ये वेदाचा सत्यअर्थ दिलेला आहे म्हणून हा ग्रंथ झाला सत्यार्थप्रकाश म्हटले आहे हा ग्रंथ पूर्णपणे वेदावर आधारित आहे.

वेद भाष्य, संस्कार निधी, व्यवहार भानू इत्यादी ग्रंथ सुद्धा त्यांनी लिहिले.

स्वामी दयानंद सरस्वती यांचा मृत्यू (Biography in Marathi)

swami dayanand saraswati death reason 1883 मध्ये स्वामी दयानंद यांचा वर विषप्रयोग झाल्यामुळे त्यांचे निधन झाले.

Also Read

Swami Dayanand Saraswati Biography in marathi

2 thoughts on “Swami Dayanand Saraswati”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group