Tukdoji Maharaj

Tukdoji Maharaj Biography in Marathi राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 1909 मध्ये झाला.

Tukdoji Maharaj Biography in Marathi

Tukdoji Maharaj Biography in Marathi राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील यावली या गावी 1909 मध्ये झाला त्यांचे संपूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर असे होते त्यांच्या आईचे नाव मंजुळा असे होते. शालेय शिक्षणात त्यांचे मन रमेना म्हणून इयत्ता तिसरी ची परीक्षा उत्तीर्ण होत ते शाळेला रामराम ठोकून आपल्या आईसोबत आजोळच्या वरखेडे या गावी गेले तेथे त्यांना अडकोजी महाराज भेटले माणिक ने त्यांना आपले गुरु मानले तुकडोजी महाराजांची आपल्या या छोट्या शिष्यवर मर्जी बसली व त्यांनी त्याचे नाव ‘तुकड्या’ असे ठेवले. याच नावानेच पुढे तुकडोजी महाराजांनी रूपांतर झाले आडकोजी नी त्यांना ‘रामकृष्णहरी’ हा मंत्र दिला.

Tukdoji Maharaj Biography in Marathi

कार्य

  • तुकडोजी नऊ वर्षाचे असताना अडकोजी महाराज यांचे निधन झाले यामुळे तुकडोजी एकदम दुखी झाले याच वेळी ईश्वर चिंतनासाठी त्यांनी आपले घर सोडले चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट अरण्यात घोर तपश्चर्या कार्याला ते गेले होते आठ-नऊ वर्षे ते जंगलात रानावनात भटकत राहिले जे मिळेल ते खाऊन त्यांनी दिवस काढले त्यानंतर ते समाजात परत आले आणि भजन-कीर्तन करीत सर्वत्र फिरू लागले.
  • भाषणे, भजन व कीर्तन या माध्यमातून त्यांनी राष्ट्र जनजागृतीचे महान कार्य केले.
  • भारतीय समाजातील अनिष्ट रूढी व प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी अतिशय कष्ट घेतले.
  • पशुहत्या बंदी, व्यसनमुक्ती, जातिनिर्मूलन, यात्राशुद्धी, कुटुंब नियोजन, हुंडाबंदी इत्यादी कार्यांना त्यांनी चालना देऊन लोकजागृती केली.

Tukdoji Maharaj Biography in Marathi

  • जनसेवा हीच ईश्वर सेवा हा उपदेश त्यांनी लोकांना दिला
  • 1935 मध्ये त्यांनी मोझरी येथे गुरुकुल आश्रमाची स्थापना केली या ठिकाणी त्यांनी लोककल्याणाचे अनेक उपक्रम राबविले.
  • तुकडोजी महाराजांची कीर्ती एकूण महात्मा गांधींनी त्यांना सेवाग्राम मध्ये बोलविले तेथे तुकडोजी चे भजन ऐकून ते प्रभावित झाले.
  • तुकडोजींनी सेवाग्राम मधील दीड महिन्यांच्या वास्तव्यात अनेक राष्ट्रीय नेत्यांचा सहवास लाभला त्यातून तुकडोजींच्या मनातही राष्ट्रप्रेम जागे झाले आणि त्यांनी स्वतंत्र चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतला.
  • 1942 च्या चळवळीच्या काळात त्यांच्या प्रचार कार्यामुळे विदर्भातील अनेक गावात चळवळीचे लोण पोहोचले होते.
  • त्यांच्या लेखनातून ठायीठायी राष्ट्रवाद, राष्ट्रीय एकात्मता, स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या संबंधीचे त्यांचे चिंतन प्रकट होते.
  • हिंदुस्तान हा खेड्यांनी बनलेला देश आहे तेव्हा खेड्यांची सुधारणा झाली तरच देशाची प्रगती होईल हे ओळखून त्यांनी ग्राम सुधारण्याची मोहीम हाती घेतली गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजून देण्यासाठी त्यांनी ‘ग्रामगीता’ हा ग्रंथ लिहिला.

“गाव हेच देऊळ आहे आणि त्या देवळातील देव म्हणजे गावातील लोक असे त्यांचे मत होते”.

ग्रंथसंपदा

ग्रामगीता, अनुभव सागर, भजनावली, जीवन जागृती भजनावली, राष्ट्रीय भजनावली, आदेशरचना इत्यादी.

विशेषता

राष्ट्रसंत

मृत्यू

1968 मध्ये त्यांचे निधन झाले.

Also Read

Dadoba Pandurang Tarkhadkar

Gopal Hari Deshmukh

Tukdoji Maharaj Biography in Marathi

1 thought on “Tukdoji Maharaj”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon