Madhavrao Bagal

Madhavrao Bagal Biography in Marathi संपूर्ण नाव माधवराव खंडेराव बागल यांचा जन्म 1896 मध्ये झाला.

Madhavrao Bagal Biography in Marathi

भाई माधवराव बागल

Madhavrao Bagal Biography in Marathi संपूर्ण नाव माधवराव खंडेराव बागल यांचा जन्म 1896 मध्ये झाला. माधवराव बागल यांच्यावर महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रभाव होता. भाई माधवराव सत्यशोधक समाजाचे एक प्रमुख नेते होते सत्यशोधक समाजाच्या प्रचाराचे कार्य त्यांनी अनेक वर्ष केले सत्यशोधक कार्यकर्ते या नात्याने त्यांनी धार्मिक कर्मकांडाला विरोध केला आणि पुरोहित वर्गाचा समाजातील प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

Madhavrao Bagal Biography in Marathi

कार्य

  • अस्पृश्यता निवारणाच्या कार्यात त्यांचा महत्वाचा सहभाग होता अस्पृश्यांना मंदिराचा प्रवेश मिळवून देण्यासाठी त्यांनी सत्याग्रह केला ते स्वतः नास्तिक होते परंतु अस्पृश्यांना समाजातील इतर वर्गाच्या बरोबरीचे हक्क मिळाले पाहिजे या भूमिकेतून त्यांनी अस्पृश्यांच्या मंदिरात प्रवेश आग्रह धरला.
  • जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला होता असा विवाह घडवून आणण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला होता.
  • स्वातंत्र्यपूर्व काळात संस्थानात प्रजेवरहोत असलेल्या अन्याय व अन्याय अत्याचाराविरुद्ध त्यांनी आवाज उठविला त्याकरता त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्रजा परिषदेची स्थापना केली होती आणि तिच्या माध्यमातून संस्थानाच्या अन्याय विरुद्ध संघर्ष केला होता.
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता कर्नाटक राज्यातील बेळगाव कारवार या मराठी भाषिक प्रदेशात महाराष्ट्रात समावेश व्हावा म्हणून सीमालढा उभारण्यात आला होता त्याचे नेतृत्व भाई माधवरावनी केले होते.

Madhavrao Bagal Biography in Marathi

  • स्वातंत्र्यप्राप्तीनंतर माधवराव बागल यांनी काही काळ शेतकरी कामगार  पक्षाचे कार्य केले पण पुढील काळात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
  • भाई माधवराव यांच्यावर काही प्रमाणात मार्क्सवादाचा प्रभाव होता न्याय हक्कासाठी त्यांनी संघर्ष केला होता त्याचे उदाहरण म्हणजे कोल्हापुरातील शाहू मिल कामगार  संघाची स्थापना करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.
  • एक कुशल लेखक, झुंजार पत्रकार, व प्रतिभासंपन्न चित्रकार म्हणून ते प्रसिद्ध होते.
  • हंटर व अखंड भारत या नियतकालिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले होते.

ग्रंथसंपदा

स्वराज्याचा शत्रू, बहुजन समाजाचे शिल्पकार, जीवनप्रवाह, मार्क्सवाद, कला आणि कलावंत, शाहू महाराजांच्या आठवणी, समाज सत्ता की भांडवलशाही इत्यादी.

पुरस्कार

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने भाई माधवराव यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरवार्थ त्यांना डि.लीट ही सन्मानदर्शक पदवी प्रदान केली.

मृत्यू

1981 मध्ये त्यांचे निधन झाले.

Also Read

Madhavrao Bagal Biography in Marathi

Spread the love

This Post Has One Comment

Leave a Reply