Panjabrao Deshmukh

Biography of Panjabrao Deshmukh डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 27 डिसेंबर 1898 रोजी शेतकरी कुटुंबात झाला.

Biography of Panjabrao Deshmukh

Biography of Panjabrao Deshmukh डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ या गावी 27 डिसेंबर 1898 रोजी शेतकरी कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव राधाबाई असे होते. त्यांच्या वडिलांनी त्यांचे मूळ आडनाव ‘कदम’ असे होते, पण त्यांच्या घराण्यात असलेल्या वतनदारी मुळे त्यांना ‘देशमुख’ हे आडनाव प्राप्त झाले.

पंजाबरावांचे प्राथमिक शिक्षणत्यांच्या जन्मगावी व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले अमरावतीच्या हिंदू हायस्कूल मधून 1918 मध्ये ते मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाले मॅट्रिक झाल्यावर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले पण पदवी संपादन करण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले तेथे त्यांनी एडिंबरो विद्यापीठाची M.Aऑक्सफर्ड विद्यापीठाची डि.लिट या पदव्या मिळवल्या. त्यांनी लिहिलेल्या वैद्यकीय वाङ्मयातील धर्माचा उगम व विकास या प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट बहाल करण्यात आली.

इंग्लंडमध्ये असताना त्यांनी लॉ ची पदवी संपादन केली तेथील शिक्षण संपल्यानंतर ते 1926 मध्ये भारतात परतले.

भारतात आल्यावर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे वकिली प्रारंभ केला पुढे त्यांनी त्या काळातही मुंबईतील सोनार जातीतील विमलाबाई सोबत विवाह केला.

Biography of Panjabrao Deshmukh

कार्य

 • 1926 मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी अमरावती येथे श्रद्धानंद छात्रालय सुरू करून त्या ठिकाणी सर्व जाती-धर्माच्या विद्यार्थ्यांची राहण्याची सोय केली.
 • 1927 मध्ये पंजाबराव आणि शेतकरी वर्गाची स्थिती सुधारण्यासाठी शेतकरी संघची स्थापना केली या संघाच्या प्रचारासाठी आणि शेतकऱ्यांत जनजागृती घडवून आणण्यासाठी त्यांनी महाराष्ट्र केसरी हे वृत्तपत्र चालविले.
 • 1928 मध्ये अमरावती जिल्ह्यात जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी सक्तीचे केले तसेच त्यांनी सार्वजनिक विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या होत्या.
 • 1928 मध्ये अमरावतीचे अंबाबाई मंदिर अस्पृश्यांना खुले करावे म्हणून त्यांनी सत्याग्रह केला होता.
 • 1930 मध्ये प्रांतिक कायदेमंडळांना व त्यांची निवड झाली त्याच वेळी ते प्रांताच्या मंत्रिमंडळात शिक्षण कृषी व सहकार खात्याचे मंत्री बनले त्यावेळी त्यांनी ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे म्हणून अनेक सवलती उपलब्ध करून दिले.
 • 1932 मध्ये पंजाब राव आणि अमरावती येथे श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली.

Biography of Panjabrao Deshmukh

 • प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी व याचा विचार करण्यासाठी पंजाबराव आणि भारतीय प्राथमिक शिक्षण संघ या संघटनेची स्थापना केली होती.
 • 1933 मध्ये क्रांती कायदेमंडळाच्या सदस्यत्वाचा व पदाचा त्यांनी राजीनामा दिला.
 • 1946 मध्ये भारताची घटना समिती अस्तित्वात आली या घटना समितीचे सभासद म्हणून पंजाबरावांनी काम केले.
 • भारताच्या लोकसभेवर त्यांनी 1952, 1957, 1962 अशी तीन वेळा निवड झाली. या काळात ते केंद्रीय मंत्रिमंडळात कृषिमंत्री होते.
 • कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना  अमलात आणल्या भारतीय शेतकऱ्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करावा म्हणून त्यांनी भरपूर प्रयत्न केले या काळात भारतातील शेतकऱ्यांनी जपानी भातशेतीच्या प्रयोगाचा अवलंबन करून आपले उत्पादन वाढवावे यासाठी त्यांनी देशव्यापी व्यापक मोहीम उघडली.
 • 1955 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भारतात कृषी समाजाची स्थापना केली त्यांच्या विद्यमाने राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी-विक्री संघाचे स्थापना झाली.
 • कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात पश्चिम महाराष्ट्रात मध्ये ज्या प्रकारे कार्य केले तसेच डॉक्टर पंजाबराव देशमुखानी विदर्भात केले त्यांनी बहुजन समाजाच्या व शेतकरी वर्गाच्या उन्नतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे कार्य केले.

मृत्यू

10 एप्रिल 1965 रोजी त्यांनी त्यांचे दिल्ली येथे हे विलिग्डन हॉस्पिटल मध्ये निधन झाले.

Also Read

Pandurang Mahadev Bapat

Raghunath Dhondo Karve

Biography of Panjabrao Deshmukh

1 thought on “Panjabrao Deshmukh”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group