Biography of Nana Patil क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील बहे-बोरगाव या गावी झाला.

Biography of Nana Patil

Biography of Nana Patil ‘क्रांतिसिंह’ नाना पाटील यांचा जन्म 1900 मध्ये सांगली जिल्ह्यातील बहे बोरगाव या गावी झाला त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातच येडेमच्छिंद्र हे होय. त्यांच्या वडिलांचे नाव रामचंद्रआईचे नाव गोजराबाई असे होते. नानांनी मराठी सातवी पर्यंतचे शिक्षण प्रतिकूल परिस्थितीत कसेबसे पूर्ण केले त्यानंतर त्यांनी त्या काळात मुलकी परीक्षा उत्तीर्ण झाले व तलाठ्यांची काही काळ नोकरी केली.

Biography of Nana Patil

कार्य

 • नाना पाटील यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचा  विचारसरणीचा प्रभाव होता त्यांनी सत्यशोधक समाजाचे प्रचारक म्हणून खेडोपाडी फिरून सत्यशोधक समाजाच्या तत्त्वांचा प्रचार केला.
 • समाजातील अंधश्रद्धा, भोळ्या समजुती जातिभेद, हुंडापद्धती याविरुद्ध त्यांनी कठोर प्रहार केले.
 • 1926 मध्ये नाना पाटील स्वातंत्र्य चळवळीकडे आकृष्ट झाले काँग्रेसमध्ये सामील होऊन परकीय सत्तेविरूद्ध संघर्ष करण्याचा निर्णय त्यांनी घेतला त्यासाठी नोकरीला त्यांनी राम राम ठोकला.
 • सामान्य लोकांनी सावकारशाही च्या पाशात अडकून नये म्हणून त्यांनी सावकारशाही विरुद्ध प्रचाराची आघाडी उघडली.
 • समाजातील स्वार्थी भट भिक्षुक विरोधी ही त्यांनी जोरदार प्रचार करून जनजागृती केली.
 • 1930 मध्ये महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली या चळवळीचा एक भाग म्हणून जंगल सत्याग्रह करण्यात आले नानांनी सांगली जिल्ह्यात जंगल सत्याग्रहात भाग घेतला त्यामुळे त्यांनी दोन वेळा कारावासाची शिक्षा भोगावी लागली.
 • 1940 मध्ये महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम उघडली नाना पाटलांनी या मोहिमेत दोन वेळा सत्याग्रह केला व दोन्ही वेळा त्यांना तुरुंगवासाची शिक्षा झाली.

Also Read 

Biography of Mahatma Jyotiba Phule

धोंडो केशव कर्वे

Biography of Nana Patil

 • 1942 च्या चले जाव आंदोलनातील त्यांचे कार्य अतिशय महत्त्वाचे व चिरस्मरणीय आहे या आंदोलन काळात त्यांनी सातारा जिल्ह्यातील ब्रिटिश शक्तीच्या विरोधात प्रतिसरकार स्थापन केले
 • नाना पाटील हे जनसमुदायाच्या पातळीवर प्रती सरकारचे प्रमुख मानले जात होते प्रति सरकारने तुफान सेना नावाची स्वतःची सेना उभारली आपली स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून गोरगरीब जनतेला त्वरित न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली याशिवाय अस्पृश्यतानिवारण, ग्रामसफाई, साक्षरता प्रसार, दारूबंदी, हुंडाबंदी, स्वदेशी पुरस्कार यांच्यासारखी अनेक विधायक कामे ही प्रती सरकारने हाती घेतली होती यावेळी नाना पाटील व त्यांचे सहकारी 44 महिने भूमिगत राहिले व सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागात त्यांनी आपली स्वतंत्र शासन यंत्रणा निर्माण केली.
 • नाना पाटील हे या प्रतिसरकार नेते होते व नेते या नात्याने त्यांनी केलेल्या कार्यामुळे त्यांना क्रांतिसिंह’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
 • स्वातंत्र्यप्राप्तीनंतर नाना पाटलांनी प्रथम शेतकरी कामगार पक्षात व पुढे कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना संघटित करून त्यांनी अनेक लढे उभारले.
 • शेतकरीवर्गाला त्यांनी केलेल्या या कार्याची दखल घेऊन 1955 मध्ये अखिल भारतीय किसान सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली होती.
 • कोल्हापूरच्या संस्थानातील प्रजेची परिषदेच्या चळवळीसमराठवाड्यातील रजाकार विरोधी चळवळ त्यांनी मराठी भाषेत प्रदेशाचे महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे म्हणून जो लढा उभारण्यात आला होता त्यामध्ये ‘क्रांतिसिंह’ नाना पाटील यांचा सहभाग होता त्यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला होता त्यांचे वक्तृत्व अत्यंत प्रभावी होते.
 • ग्रामीण समाजात लोकजागृतीचे कार्य त्यांनी अतिशय प्रभावीपणे केले अनेक आंदोलनात भाग घेऊन कारावासही भोगला होता.
 • भारताच्या लोकसभेवर त्यांचे 1957 1967 मध्ये अशी दोन वेळा निवड झाली होती.

मृत्यू

1976 मध्ये निधन झाले

Biography of Nana Patil

Spread the love

Related Posts

2 thoughts on “Nana Patil

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Ad