Biography of Vinoba Bhave

Biography of Vinoba Bhave आचार्य विनोबा भावे हे गांधीवादी व सर्वोदायी नेते होते. त्यांचे संपूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते.

Biography of Vinoba Bhave

Biography of Vinoba Bhave आचार्य विनोबा भावे हे गांधीवादी व सर्वोदायी नेते होते. त्यांचे संपूर्ण नाव विनायक नरहरी भावे असे होते.

विनोबांचा जन्म रायगड जिल्ह्यातील गागोदे या गावी 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई असे होते.

वडील नोकरीनिमित्त बडोद्यास राहू लागल्याने विनोबांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण व काही काळ उच्च शिक्षण तेथेच झाले.

इंटरची परीक्षा देण्यासाठी ते मुंबईस मुंबई यायला निघाले असताना मध्येच सुरू स्टेशनवर उतरून ते संस्कृतचे अध्ययन करता बनारसला गेले व तेथे त्या भाषेचा अभ्यास करू लागले.

तेथील वास्तव्यात त्यांनी हिंदू विद्यापीठातील एका समारंभात महात्मा गांधीजींचे भाषण ऐकले व भारताचे पुनरूत्थान गांधींच्या मार्गानेच होईल असे वाटल्याने त्यांनी त्यांच्याशी पत्रव्यवहार केला पत्रव्यवहारात गांधीजींनी विनायक भावांना विनोबा असे संबोधिले त्यामुळे विनायक भावे हे त्यापुढे ‘विनोबा’ भावे या नावाने संबोधले जाऊ लागले.

पण लवकरच ते महात्मा गांधीजींच्या सहवासात आले महात्मा गांधीजींच्या तत्त्वज्ञाना ने प्रभावित होऊन विनोबांनी त्यांचे शिष्यत्व पत्करले आणि गांधीजींच्या अहमदाबाद येथील साबरमती आश्रमात येऊन ते दाखल झाले या आश्रमात विनोबांनी काही काळ अध्यापनाचे कार्य केले.

Biography of Vinoba Bhave

कार्य

 • 1921 मध्ये गांधीजींचे परमभक्त शंकर शेठ जमनालाल बजाज यांनी साबरमतीच्या सत्याग्रह श्रमाची एक शाखा वर्ध्याला काढलेल्या शाखेचे संचालक म्हणून गांधीनी विनोबांची नेमणूक केली.
 • 1923 मध्ये नागपूरच्या झेंडा सत्याग्रहात सहभागी झाले त्यामुळे त्यांनी तुरुंगवासही भोगला.
 • 1924 मध्ये विनोबांनी महाराष्ट्रधर्म नामक वृत्तपत्र सुरू केले.
 • विनोबांची आई गीतेचा अर्थ कळावा म्हणून अतिशय तळमळत होते आईच्या इच्छापूर्तीसाठी विनोबांनी गीता अभ्यास करायला सुरुवात केली त्यांनी भगवद्गीतेचे गीताई  समश्लोकी मराठीत भाषांतर केले 1931 मध्ये.
 • सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल विनोबांना कारावासाची शिक्षा झाली तेव्हा धुळे येथील कारागृहात त्यांनी गीतेवर जी प्रवचने दिली ती साने गुरुजींनी लिहून घेतली त्यातच पुढे गीता प्रवचने हे पुस्तक तयार झाले.
 • 1940 मध्ये महत्त्वाचा गांधींनी सरकारच्या धोरणाविरुद्ध वैयक्तिक सत्याग्रहाची मोहीम सुरू केली या सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही म्हणून महात्मा गांधींनी विनोबा भावे यांची निवड केली.

Also Read

Helen Keller

Biography of Vinoba Bhave

 • 30 जानेवारी 1948 रोजी गांधीजींची हत्या झाली त्यांचे अपूर्ण संकल्प पूर्ण करण्याचा त्यांनी संकल्प केला.
 • पैशांची प्रतिष्ठान करू नका श्रमाला प्रतिष्ठा द्या म्हणून कांचन मुक्तीचा प्रयोग त्यांनी सुरू केला.
 • स्वातंत्र्यानंतरच्या काळात विनोबांनी राष्ट्रउभारणीच्या विधेयक कार्याला वाहून घेण्याचा निश्चय केला त्यासाठी त्यांनी सेवाग्राम येथे गांधीवादी कार्यकर्त्यांचे एक संमेलन भरविले या संमेलनात त्यांनी सर्वोदय समाजाची स्थापना केली त्याद्वारे गांधीजींचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्याला ते लागले.
 • 1951 पासून विनोबांनी भूदान चळवळीला प्रारंभ केला या चळवळीची सुरुवात तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील पोचमपल्ली या गावी झाली विनोबा भावे तेलंगणाच्या दौऱ्यावर गेले असताना पोचमपल्ली येथे आले तेथील भूमिहीन हरिजन बांधवांनी आपली कर्मकहाणी त्यांना निवेदन केली त्यावर विनोबांनी गावातील श्रीमंत जमीनदारांना आपल्या जमिनीचा काही हिस्सा हरिजनांना दान करण्याचे आव्हान केले त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन रामचंद्र रेड्डी नावाच्या एका जमीनदाराने आपली शंभर एकर जमीन दान केली.
 • आधुनिक भारताचा इतिहास एक नवीन युग सुरू झाले अशा प्रकारे चळवळीद्वारे विनोबांनी सुमारे 80 लाख एकर जमीन देशातील भूमिहीनांना मिळवून दिली.

Biography of Vinoba Bhave

 • मध्य प्रदेशात चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांचे त्यांनी शांततेच्या मार्गाने हृदयपरिवर्तन घडून आणले आणि हिंसेच्या मार्गापासून परावृत्त केले.
 • 1975 मध्ये इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीमुळे भारतातील जनता रुष्ट झाली असता विनोबांनी त्या कृतीचे अनुशासन पर्व असे समर्थन केले म्हणून लोक त्यांचे सहकारी संत म्हणून अवहेलना करू लागले.
 • विनोबा बहुभाषिक होते संस्कृत, मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, कन्नड, तमिळ, तेलुगू, मल्याळम, इंग्रजी इतक्या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते
 • वर्धा येथील ग्रामसेवक मंडळ ग्रामसेवा, वृत्तमासिक, अहिंसा, धर्मालय, रुग्णालये इत्यादि गांधीवादी संस्थेशी त्यांचा संबंध होता.
 • महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार नावाच्या एका छोट्याशा गावात धाम नदीच्या किनारी त्यांनी आपला परमधाम आश्रम स्थापन केला होता जीवनाची शेवटची वर्षे त्यांनी तेथेच घालवली.

Vasudev Balwant Phadke – वासुदेव बळवंत फडके

ग्रंथसंपादन

गीताई, गीता-प्रवचने, मधुरकर, स्थित प्रज्ञदर्शन, कुराणसार, ख्रिस्तधर्मसार, संतांचा प्रसाद, विचार पोथी, उपनिषदांचा अभ्यास इत्यादी.

पुरस्कार

1958 मध्ये आंतरराष्ट्रीय मगसेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

1983 मध्ये मरणोत्तर भारतरत्न.

विशेषता

 • भारतीय भूदान चळवळीचे जनक आधुनिक.
 • जगातील अध्यात्मिक संत.

मृत्यू

15 नोव्हेंबर 1892 जिथे स्वर्गवासी झाले.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group