Maharaj Sayajirao Gaekwad

Biography of Maharaj Sayajirao Gaekwad 11 मार्च 1863 रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी झाला.

Biography of Maharaj Sayajirao Gaekwad

महाराज सयाजीराव गायकवाड

Biography of Maharaj Sayajirao Gaekwad महाराज सयाजीराव गायकवाड यांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी नाशिक जिल्ह्यातील कवळाणे या गावी झाला.

त्यांचे वडील काशिनाथ गायकवाड हे आपल्या कवळाणे या गावी शेतीचा व्यवसाय करीत होते त्यांच्या घराण्याचा बडोद्याच्या गायकवाड घराण्याच्या दूरचा संबंध होता बडोदा संस्थानाचे राजे खंडेराव गायकवाड यांचे 1870 मध्ये निधन झाले त्यांना औरस पुत्र नव्हता त्यामुळे त्यांची पत्नी जमनाबाई यांनी इंग्रजांकडून दत्तक घेण्याचा अधिकार मिळवला त्यानुसार जमनाबाई काशिनाथ गायकवाड यांच्या यांचा मुलगा गोपाळराव यास 1875 मध्ये दत्तक घेतले आणि त्याचे नाव सयाजीराव असे ठेवले अशाप्रकारे सयाजीराव बडोदा संस्थानाचे राजे बनले.

बडोद्याला आल्यावर त्यांच्या शिक्षणाला सुरुवात झाली सयाजीराव अतिशय हुशार होते अभ्यासाबरोबरच व्यायाम आणि खेळ इकडेही सयाजीरावांचे लक्ष होते तलवार व दांडपट्टा फिरवणे कवायत करणे, व्यायाम ते करत त्यामुळे त्यांची प्रकृती चांगली सुधारली बडोदा संस्थानाचे त्यावेळेचे दिवान सर टी माधवरावयांच्याकडून त्यांना राजकारणाचे शिक्षण मिळाल्यास सुमारे सहा वर्षात शिक्षण संपवून ते बडोदा संस्थानाचा कारभार पाहू लागले त्यापूर्वी त्यांचा चिमणाबाईशी विवाह झाला होता.

कार्य Biography of Maharaj Sayajirao Gaekwad

 • 1881 मध्ये सयाजीराव गायकवाड यांचा राज्य रोहण  समारंभ झाला.
 • 1890 मध्ये त्यांनी कलानुभव अशी संस्था स्थापन करून तंत्र शिक्षणाला चालना दिली.
 • 1893 मध्ये त्यांनी बडोदा संस्थानात सक्तिच्या प्राथमिक शिक्षण योजनेची सुरुवात केली योजनाची व्याप्ति वाढवीत  नेऊन 1906 मध्ये तील संपूर्ण संस्थानात ती अमलात आणली प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करणारे बडोदा हे भारतातील पहिले राज्य होते.
 • सयाजीरावनी आपल्या संस्थानात अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या होत्या राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळवून देण्यासाठी वसतिगृहे उघडली ज्ञानाचा प्रसार घडवून आणण्यासाठी त्यांनी आपल्या संस्थानात गावोगावी वाचनालये उघडली त्यांच्या जोडीला फिरती वाचनालयही सुरू केली त्यांनी संगीत, नृत्य, नाट्य यांसारख्या कलांचे शिक्षण देणाऱ्या शाळा ही संस्थानात उघडले त्यांनी ग्रंथ प्रकाशनाच्या कार्याला चालना दिली अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या त्याच त्याचा लाभ महर्षी शिंदे, डॉक्टर आंबेडकर यांच्यासारख्या मान्यवर व्यक्तींना ही  झाला.
 • सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात घटस्फोटाचा कायदा लागू केला असा कायदा करणारे व तो अमलात आणणारे बडोदा संस्थान हे भारतातील पहिले राज्य ठरले.

Biography of Maharaj Sayajirao Gaekwad

 • मिश्रविवाहाला मान्यता, विधवा विवाहाला मान्यता, अस्पृश्यता बंदी, कन्याविक्रीय बंदी, पडदा पद्धती, बालविवाह बंदी असे अनेक लोक कल्याणकारी कायदे करून त्यांनी संस्थानात अंमलबजावणी केली होती.
 • हिंदू मधील विषमता दूर व्हावी म्हणून कुठल्याही जातीच्या माणसाला पौरोहीत्य शिकण्याची व परीक्षा देऊ ते व्यवसाय करण्याकरिता सनद मिळवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती.
 • आपल्या राज्यातील जमिनीची योग्य प्रतवारी करण्यासाठी त्यांनी लँड सर्वे सेटलमेंट हे खाते सुरू केले.
 • सारावसुलीच्या पूर्वीच्या वेगवेगळ्या पद्धतीत सुधारणा करून सारावसुलीची समान पद्धत राज्यात लागू केली.
 • राज्यातील पंचायतीचे पुनर्जीवन त्यांनी करून आणले ग्रामपंचायती तालुका पंचायत व नगरपालिका त्यांनी आपल्या संस्थानात स्थापन केल्या.
 • प्रगत अशा परदेशात प्रवास करून ज्या ज्या देशात त्यांना विशेष चांगले असे दिसले तेथे आपल्या राज्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
 • 1904 च्या राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या अध्यक्ष पदाचा मान त्यांना देण्यात आला होता.

विशेषता 

पंडित मदन मोहन मालवीय यानी हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा या शब्दांचा त्यांचा यथार्थ गौरव केला होता.

मृत्यू

6 फेब्रुवारी 1939 रोजी त्यांचे निधन झाले.

Biography of Maharaj Sayajirao Gaekwad

Also Read

पंडित जवाहरलाल नेहरू

डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन

Biography of Maharaj Sayajirao Gaekwad

4 thoughts on “Maharaj Sayajirao Gaekwad”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group