Dodo Bird Information in Marathi
Dodo Bird Information in Marathi : “Dodo” हा पक्षी मुख्यतः हिंदी महासागरातील मॉरिशियस बेटावर अस्तित्वात होता. या पक्षाला मूर्ख पक्षी असे म्हटले जात असे. कारण की या पक्षाला पकडणे सहज सोपे होते म्हणून त्याला (stupid bird) असे म्हटले जात असे. डोडो हा पक्षी कबुतरांच्या प्रजाती पासून उत्पन्न झालेला एक पक्षी आहे.
हवेत उडण्यास असमर्थ व बोजड शरीराचा विलुप्त झालेला एक पक्षी. कोलंबिफॉर्मिस गणातील रॅफिडी कुलात या पक्ष्यांचा समावेश होत असे.
डोडो पक्षाच्या प्रजाती | Dodo Bird Species
प्रामुख्याने डोडो पक्षाच्या तीन प्रजाती पडल्या जातात.
- फस क्युक्युलेटस
- रॅफस सॉलिटेरस
- पेझोफॅप्स सॉलिटेरिया
या प्रजाती प्रामुख्याने हिंदू महासागरातील मॉरिशियस, रीयुनियन आणि रॉड्रिगेस या बेटावर आढळल्या जात असे. पोर्तुगीजांनी या पक्षाला 1507 मध्ये पहिल्यांदा पाहिले होते. या काळामध्ये त्याला कोणताही नैसर्गिक शत्रू नव्हता त्यामुळे या पक्षाचा आकार वाढत गेला आणि त्यांनी आपल्या उडण्याची क्षमता हरवली असा अंदाज बांधण्यात येतो.
डोडो पक्षाची शरीररचना | The anatomy of the dodo bird
The anatomy of the dodo bird : या पक्षाचे शरीर एकदम आवडावी होते त्याची उंची सुमारे एक मीटर होती आणि त्याचे वजन 20 ते 23 किलोग्राम इतके होते. या पक्षाचे डोके मोठे असून त्याची चव सुमारे ते बी सेंटीमीटर इतकी लांब होती. त्याची चोच लांब काळी भक्कम आणि टोकाला वळलेली होती.
या पक्षाच्या शरीराचा भाग फिकट राखाडी रंगाचा किंवा निळसर राखाडी रंगाचा होता त्याच्या गळ्याभोवती आणि पोटाभोवती पांढऱ्या रंगाचा भाग होता. या पक्षाची शेपूट लहान आकाराची होती. या पक्षाचे पाय आखूड पण दणकट होते. या पक्षाचे मुख्य अन्न हे फळे बिया तसेच मासेही होते.
Dodo Bird Facts
Dodo Bird Facts : डोडो’ पक्षी हा हिंदी महासागरातील मॉरिशस बेटावर अस्तित्त्वात होता. त्याला ‘मूर्ख पक्षी’ (stupid) असे संबोधले जाते, ह्याचे कारण म्हणजे त्याला पकडणे अतिशय सोपे असायचे. पण त्यामागचे खरे कारण असे आहे की डोडो ह्या पक्ष्याने १६ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत माणसांना पाहिलेच नव्हते. जेव्हा १६ व्या शतकाच्या उत्तरार्धात मॉरिशस ह्या बेटाचा शोध लागला, त्यानंतर तेथे माणसांची वर्दळ सुरु झाली. डोडो पक्ष्यांच्या ह्या वागण्यामुळेच १६६२ साली हा पक्षी नामशेष झाला.
Dodo Bird Image
Dodo Bird Facts National Geographic
Dodo Bird Facts National Geographic :रॅफस सॉलिटेरस हा पक्षी मॉरिशस बेटावरील डोडोसारखा होता. परंतु तो रंगाने पूर्णपणे पांढरा होता. १७५० सालच्या सुमारास तो विलुप्त झाला. पेझोफॅप्स सॉलिटेरिया ही जाती आकाराने दोन्ही डोडोंएवढीच होती. परंतु त्यांचा रंग करडा होता आणि चोच लहान व वळलेली नव्हती. ही जाती सतराव्या शतकाच्या अखेरपर्यंत अस्तित्वात होती.
Also Read
“Dodo” या पक्ष्याला प्रथम पोर्तुगीजांनी 1507 मध्ये सर्वात प्रथम पाहिले. मॉरिशियस या बेटावर या पक्षांची लाखोंमध्ये संख्या होती. नंतर मानवी वस्ती पर्यटन स्थळ या सर्वांमुळे या पक्षाच्या प्रजातीला धोका निर्माण झाला. त्यामध्ये माणसांनी पाळलेली कुत्रा मांजर कुंदे डुकरे आणि माकडे यासारख्या प्राण्यांचा या पक्षाला त्रास होऊ लागला. माणसाने आपल्या हव्यासापोटी या पक्ष्यांची शिकार लाखो प्रमाणामध्ये केली. त्यामुळे साज डोडो हा पक्षी नामशेष झालेला आहे.
भारतामध्ये इसवी सन सोळाशे मध्ये दोन जिवंत “Dodo” पक्षी आणले गेले होते. मोगल राजवटीत मधील कलाकारांनी या पक्षाचे हुबेहुब चित्र काढून त्याचे जतन करून ठेवलेले आहे. युरोपी परदेशी नागरिकांनीही काही “Dodo” आपल्या राज्यामध्ये नेले पण तेथे जगू शकले नाही कारण की तेथील वातावरण त्यांच्यासाठी प्रतिकूल होते. मॉरिशियस या बेटामध्ये दलदलीच्या ठिकाणी “Dodo” या पक्षाच्या अनेक हाडे मिळालेली आहेत ती त्यांनी त्यांच्या म्युझियम मध्ये जपून ठेवलेली आहेत.
2 thoughts on “Dodo Bird Information in Marathi”