कावळ्याची माहिती

कावळ्याची माहिती

आजच्या आर्टिकल मध्ये आपण कावळ्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत, कावळा हा खूपच हुशार पक्षी आहे, तो कधीही माणसांसोबत मैत्री करत नाही. कावळा हा इतर पक्षांपेक्षा सर्वात बुद्धिमान आणि चपळ पक्षी आहे. चला तर जाणून घेऊया कावळ्या विषयी रंजक माहिती.

Kavlyachi Mahiti

Kavlyachi Mahiti कावळा हा काळ्या रंगाचा असणारा पक्षी आहे, हा माणसाच्या वस्तीजवळ राहणारा पक्षी आहे. पण तो कधीही माणसांशी मैत्री करत नाही. कारण हा पक्षी फक्त त्याच्याच प्रजाती बरोबर आपले संबंध बनवतो.

कावळा हा सुमारे 17 इंच आकाराएवढा असतो त्याचा अर्धा भाग राखाडी रंगाचा असतो नर आणि मादी दिसायला सारखीच असतात संपूर्ण काळ्या रंगाच्या कावळ्याला डोमकावळा म्हणतात.

कावळा हा संपूर्ण भारतभर आढळणारा पक्षी असून भारताशिवाय तो मालदीव, म्यानमार, श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश अशा देशांमध्ये सपाट भूप्रदेश असणाऱ्या भागांमध्ये सर्वत्र आढळतो.

राखाडी रंगाच्या कावळ्याच्या किमान चार उपजाती भारतामध्ये आढळतात.

नर आणि मादी

कावळ्यांचा प्रजनन काळ साधारणपणे एप्रिल ते जून दरम्यान असतो. कावळा आपले घरटे स्वतः बांधतो. मादी हे एकाच वेळी चार ते पाच निळे-हिरवे अशी अंडी देते. नर आणि मादी त्यांच्या मुलाचे संगोपन एकत्र करतात.

कावळा सारखा बुद्धिमान प्राणी कुठलाच नाहीये कावळ्या बद्दल असे म्हटले जाते की तो एकाच डोळ्याने पाहू शकतो त्यामुळे त्याला एकाक्ष असे म्हटले जाते.

हिंदू धर्मामध्ये कावळ्या बद्दल खूप विविध समजुती आहेत त्यामध्ये प्रामुख्याने असे म्हणतात की जर कावळा घरांमध्ये खिडकीमध्ये येऊन ओरडला की घरामध्ये पाहुणे येतात, अनेक लोक यावर विश्वास पण ठेवतात. काही लोक याला अंधश्रद्धा मानतात तर काही लोक याला शुभ व अशुभ घडणारा संकेत मानतात.

कावळ्या बद्दल गृहीत धरलेल्या काही समजुती

  • कावळ्याच्या अंड्यांच्या संख्येनुसार शुभ, अशुभची भविष्यवाणी ठरवली जाते.
  • जेव्हा कावळा तीन अंडी देतो त्याला वायू म्हटले जाते जेव्हा कावळा तीन अंडे देतो तेव्हा त्याला अशुभ म्हटले जाते कारण की तीन संख्या अपशकुन दर्शवते.
  • तसेच कावळ्याने चार अंडे दिल्यास याला इंद्र म्हटले जाते हे अतिशय शुभ मानले जाते.

कावळ्या बद्दल माहिती

कावळ्या बद्दल असे म्हटले जाते की त्याची स्मरणशक्ती खूपच चांगली असते कारण की तुम्ही त्यांना एक दिवस खिडकीच्या बाहेर चपाती टाकल्यास तो दुसऱ्या दिवशी त्याच वेळेस घेऊन तुमच्याकडे चपाती ची मागणी करतो.

जगामध्ये कावळ्याच्या 40 पेक्षा जास्त चार प्रजाती आहेत त्यामध्ये भारतामध्ये दोन जाती प्रामुख्याने आढळल्या जातात. मेक्सिको मधला Dwarf Jay हा कावळा आकाराने सर्वात लहान असतो. कावळा हा प्रामुख्याने माणसांच्या वस्तीमध्ये आढळणारा पक्षी आहे कारण की माणसाच्या वस्तीमध्ये त्याला खाण्यासाठी स्ट्रगल करावे लागत नाही.

कावळ्याचे हिंदू धर्मातील महत्त्व

हिंदू धर्मामध्ये माणसाच्या मृत्यूनंतर तेराव्या दिवशी श्राद्धाच्या दिवशी कावळ्याला केळ्याच्या पानामध्ये जेवण देतात त्यामुळे कावळ्याचे महत्व हे भारतामध्ये खूप मोठे आहे.

  • कावळ्याला संस्कृत मध्ये काक किंवा गृहकाक अशी नावे आहेत.
  • महाराष्ट्रामध्ये कावळ्याला ढवळा कावळा, गाव कावळा आणि सोम कावळा अशा नावाने संबोधले जाते.
  • कोकिळा ही आपले अंडे कावळ्याच्या घरांमध्ये घालते.
  • कावळ्या मधील डोम कावळा ही जात खूप मजोरडी असते.

डोम कावळ्याची चोच हे सोम कावळ्या पेक्षा मोठी असते. डोमकावळे हे पूर्णपणे काळ्या रंगाचे असतात हे प्रामुख्याने माळरानात किंवा जंगलात आढळतात. डोम कावळ्याच्या घरांमध्ये कोकिळा अंडी घालत नाही.

ह्या प्रजाती भारतात बरोबर पाकिस्तान बांगलादेश नेपाळ भूतान आणि श्रीलंका या देशांमध्ये आढळतात काही कावळे हे परदेशी नागरिकांसोबत परदेशातही गेलेले आहे.

कावळ्याचा आवाज खूपच कर्कश्य असतो त्यासोबतच तो कितीतरी निरनिराळ्या प्रकारचे आवाज सुद्धा काढतो.

जुन्या विचारांच्या लोकांच्या अनुसार कावळ्याने त्याचे घरटे कुठे बांधले आहे यावरून पावसाचा अंदाज ठरवता येतो.

आणखी वाचा : किंगफिशर पक्षी

नर आणि मादी हे दोघे मिळून घरटे बांधतात जर आपले घरटे एखाद्या काटेरी झाडावर केले असेल तर त्या वर्षी पाऊस कमी पडतो असा अंदाज बांधला जातो. तसेच कावळ्याने बांधलेले घरटे झाडाच्या कोणत्या दिशेला मांडलेले आहे याच्यावरून हे पावसाचा अंदाज ठरवला जातो.

कावळ्याचे सरासरी आयुष्य हे 12 ते 15 वर्षे असते

कावळ्याचे मुख्य अन्य फळे बिया शिळे अन्न आणि पीक यांच्यावर तो आपले आयुष्य जगतो. त्यासोबत तो उंदीर चिचुंद्री बेडूक यासारखे प्राण्यांची शिकार ही करतो.

शेतातील किड, अळ्या शोधणे, जनावरांच्या जखमेतील सूक्ष्म कीटक काढणे यासारख्या गोष्टी सुद्धा त्याला खायाला खूप आवडतात.

मेक्सिको मधली Drawf Jay हे कावळ्याची जात सर्वात लहान आहे ह्या कावळ्याची लांबे 21 सेंटीमीटर असते त्याचे वजन 40 ग्राम असते आणि सर्वात मोठी कावळ्याची जात ही बिल्ड रेवन आहे ज्याची लांबी 65 सेंटीमीटर पर्यंत असते आणि त्याचे वजन जवळपास 1500 ग्राम असते.

कावळ्या मधील नर आणि मादी दिसायला सारखेच असतात त्यामुळे त्या दोघांमधला फरक लवकर ओळखता येत नाही.

कावळ्याचा मेंदू हा शरीराचा तुलनेमध्ये मोठा आणि विकसित असतो कावळ्याच्या मेंदूची रचना ही माणसाच्या मेंदूशी मिळतीजुळती असते त्यामुळे त्याला खूपच हुशार आणि चालाख असा पक्षी म्हटले जाते.

कावळा हा सर्व प्रकारचे अन्न खातो धान्य, शिजलेले अन्न, मृत प्राणी, अंडी त्यामुळे कावळ्याला सर्वभक्षी पक्षी असे म्हटले जाते.

कधीकधी कोकिळा आहे कावळ्याच्या घरांमध्ये अंडे देते, त्यामुळे कावळ्याला त्यांचेही पालन-पोषण करावे लागते, तसेच अंडी असलेल्या घरट्यांची रक्षा इतर कावळे एकत्र येऊन करतात.

आणखी वाचा : किवी पक्षी

कावळ्याच्या प्रत्येक थव्यांची स्वतंत्र भाषा असते असे म्हटले जाते आणि त्यांची स्मरणशक्ती सुद्धा खूप चांगले असते कावळ्यावर जो कोणी हल्ला करतो त्या व्यक्तीचा चेहरा कावळे कधीच विसरत नाही आणि आपल्या साथीदारांना नाही याबाबत ते माहिती देत असतात.

कावळे हे सर्वच गोष्टी लक्षात ठेवतात तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अशी एक गोष्ट आहे ओंतरिओ मधील चथम या भागात सुमारे 50 दशलक्ष कावळे त्यांच्या स्थलांतराच्या वेळी या मार्गावरून जाताना चथम मध्ये थांबत असतात. त्यामुळे तेथील शेतकरी समुदायाच्या पिकांना नुकसान झाले त्यामुळे तिथल्या नगरपालिकेच्या महापौरांनी कावळ्यांना शोधून ठार मारण्याचा आदेश दिला तेव्हापासून कावळ्यांनी चथम ला सोडून दिले.

कावळ्या बद्दल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

Join Information Marathi Group Join Group