मोराची माहिती – Morachi Mahiti

मोराची माहिती – Morachi Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण मोराची माहिती जाणून घेणार आहोत मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे तसेच मोर हा अतिशय सुंदर पक्षी आहे.

मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे तसेच तो भारताच्या संस्कृतीचा एक हिस्सा आहे. भारतच नव्हे तर आपला शेजारी राष्ट्र म्हणजेच मॅनमार पूर्वीचा (ब्रह्मदेश) या देशाचा सुद्धा राष्ट्रीय प्राणी हा मोर आहे.

मोर खूपच सुंदर पक्षी आहे, त्याचा आवाज सुद्धा तितकाच सुंदर असतो, असे म्हणतात की जेव्हा मोर नाचू लागतो, तेव्हा पाऊस पडण्यास सुरुवात होते, मोर हा सर्वभक्षी पक्षी आहे असे म्हटले जाते तो साप, पाली, किडे खाऊन आपले पोट भरतो.

राष्ट्रीय पक्षी मोराची माहिती

मोर या पक्षाची भारत सरकारने राष्ट्रीय पक्षी म्हणून निवड केलेली आहे या पक्षाची निवड 26 जानेवारी 1963 मध्ये केली गेली.

तामिळनाडूमधील येथे नॅशनल बोर्ड सिलेक्शन मंडळामध्ये हंस सारस आणि बदक यासारख्या पक्षांचा विचार करण्यात आला होता मात्र अखेर शेवटी मोर या पक्षाची निवड करण्यात आली.

कारण की मोर हा सर्वत्र आढळणारा पक्षी आहे आणि प्रत्येकाला ह्या पक्षाबद्दल माहिती आहे त्यामुळे भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून मोराची निवड करण्यात आली.

मोर इतिहास

मोर या पक्षाचे संदर्भ प्राचीन काळापासून सापडत आलेले आपल्या मिळतात,जसे की उदाहरणार्थ अशोक सम्राट मोरया राजाच्या नाण्यांवर मोराची नक्षी कोरलेली आपल्याला आढळतात, तसेच मोगल सम्राट शहाजहान याच्या सिंहासनाचे नाव मयूर सिंहासन असे होते, हा सिंहासन असून खूपच महाग होतं, याच्यावर देशोदेशीचे बहुमुल्य रत्न जडवलेले होते, आणि हा सिंहासन संपूर्णपणे सोन्याने बनविलेला होता. त्यामुळे तुम्हाला याबद्दल अंदाज आलाच असेल, की मोर या पक्षाला किती महत्त्व देण्यात आले होते आणि आजही देण्यात येते.

मोराची माहिती
मोराची माहिती

शहाजहान चे मयूरासन

शहाजहानच्या या सिंहासनावर आम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला या बद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर खालील दिलेल्या व्हिडिओला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. व्हिडिओ आवडल्यास आमच्या चैनल ला सुद्धा सबस्क्राइब करायला विसरू नका.

अलेक्झांडर आणि मोराची माहिती

मोराचा इतिहास खूपच रंजक प्रकारचा आहे तो कसा ते आपण जाणून घेऊअसे म्हणतात कि अलेक्झांडरने भारतातून मोर त्याच्या देशांमध्ये नेले त्यानंतर त्यांनी तेथे विविध देशात विविध मोराच्या प्रजाती निर्माण केल्या. हा मोर पक्षी खूपच सुंदर आणि बहुभक्षी पक्षी आहे.

तो साप आली किडे खातो तसेच धान्यही खातो खुल्या मैदानामध्ये दऱ्याखोऱ्या मध्ये तो निवास करून राहतो मोर खूप कमी उडतो आणि रात्रीच्या वेळेस तो झाडावर झोपतो.

आणखी वाचा : कावळ्याची माहिती

जेव्हा जंगलामध्ये सिंह सारखे शिकारी प्राणी जेव्हा त्यांची शिकार करण्यासाठी येतात तेव्हा हे पक्षी मोठमोठ्याने ओरडून इतर पक्षांना सतर्क करतात.

मोर हा खूपच सुंदर प्रकारे नाचतो त्याला असताना पाहणे म्हणजे निसर्गाचा एक चमत्कारच आहे शक्यतो मोर हा पाऊस सुरू होण्याच्या आदी नाचतो तुम्हाला एक गोष्ट सांगायला आम्हाला आवडेल की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे भारतामध्ये मोराच्या शिकारीवर बंदी आहे.

मोराची माहिती – इन्फॉर्मेशन

मोर या पक्षाला इंग्रजीमध्ये (Peacock) असे म्हटले जाते. भारतामध्ये मोर पाळण्यासाठी कायद्याने परवानगी घ्यावी लागते कारण की मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असल्याने त्याची योग्य ती काळजी घ्यावी लागते.

सध्या मोर या पक्षाची प्रजाती धोक्यात येण्याच्या मार्गावर आहे कारण की याची संख्या आता खूपच कमी कमी होत चाललेली आहे वाढते शहरीकरण आणि आधुनिक कारणामुळे जंगल नष्ट होत चाललेले आहेत त्यामुळे हे वन्य जीव शहरा सारख्या ठिकाणी राहू शकत नाही त्यामुळे त्यांचे प्रजाती हळूहळू कमी होण्याच्या मार्गावर आहे.

मोराची माहिती आणि त्याचे वर्णन

मोर हा खूपच सुंदर पक्षी आहे, चोची पासून ते त्याच्या शेपटीपर्यंत त्याची लांबी 100 ते 155 सेंटिमीटर असते, हा पक्षी संपूर्ण पीसने वेढलेला असतो त्याचा पिसारा 195 ते 255 सेंटिमीटर लांबीचा असू शकतो.

मोर या पक्षाचे वजन चार ते सहा किलो पर्यंत असू शकते लांडोर म्हणजेच मादी आकाराने लहान असते तिची लांबी सर्वसाधारण 95 सेंटीमीटर आणि वजन 4 किलोपर्यंत असते लांडोरीला किंचित पिसारा नसतो

मोराची माहिती विकिपीडिया

मोर हा कुटकुट वर्गीय पक्षी आहे या आकर्षक रंगाच्या पक्षाला भारताचा राष्ट्रीय पक्षीचा दर्जा देण्यात आलेला आहे.

मोर या नराला पिसारा असतो आणि विणीचा कालावधी संपताच तो झाडून जातो.

मोर या पक्षाचा विणीचा हंगाम पावसाळ्यात सुरू होतो, पावसाळ्यामध्ये म्हणजेच मे महिन्यापासून ते जून महिन्याच्या अखेरपर्यंत पिसारा फुलवून नाचणारे मोर आपल्याला असंच जंगलांमध्ये किंवा झाडाच्या आसपास बघायला मिळते.

भारतामध्ये राजस्थान गुजरात या भागांमध्ये अनेक गावाच्या घरामध्ये किंवा अंगणामध्ये सहजतेने वावरतांना दिसतात.

महाराष्ट्र मध्ये सुद्धा काही ठिकाणी मोर हे मनुष्यवस्ती पाशी आढळून आलेले आहेत पण ते माणसा पासून दूरच राहतात.

मादी ला आकर्षित करण्यासाठी मोर पिसारा फुलवून नाचतो आणि त्याच्या आकर्षक नृत्यामुळे आणि रंगामुळे मादी त्याच्याकडे आकर्षित होती. Phoenix Bird (स्वतःच्याच राखेतून जिवंत होणारा पक्षी)

मोराच्या मादीला म्हणजेच मोरणीला लांडोर असे म्हणतात.

मोराची माहिती

महाराष्ट्रातल्या मोरांची माहिती

महाराष्ट्र मध्ये बर्‍याच गावात किंवा जंगलात मोरांचा वावर सर्वत्र आढळतो. मोर या पक्षाबद्दल अशी धारणा आहे की तो सरस्वती देवीचे वाहन आहे. असे पूर्वीचे लोक म्हणतात किंवा मानतात. त्यामुळे मोर या पक्ष्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

त्यामुळे महाराष्ट्रामधील प्रत्येक गावांमध्ये मोराला अन्नपाणी खाऊ घातले जाते जेणे करून त्यांच्यावर सरस्वती देवीची कृपादृष्टी होईल.

महाराष्ट्रामधील शिरूर जिल्ह्यातील तालुक्यात मोराची चिंचोली नावाच्या गावांमध्ये मोराच्या झुंडी आढळल्या जातात आणि ह्या गावांमध्ये मोरांची संख्या खूपच जास्त असल्याने या गावाला मोराची चिंचोली या नावाने सुद्धा ओळखले जाते.

पांढरा मोर

पांढरा मोर हा खुपच दुर्मिळ झालेला आहे. पांढरा मोर शक्यतो मोकळ्या जंगलात किंवा शेतात आढळतो. हा पक्षी बेरी आणि धान्य खाऊन आपले पोट भरतो कधीकधी तो साप मांजर उंदीर आणि खार इत्यादी गोष्टी सुद्धा खातो पावसाची चाहूल लागताच हा सुद्धा इतर मोर प्रमाणे नाचू लागतो. त्या मोरा बद्दल आम्हाला जास्त काही माहिती मिळाली नाही त्यामुळे आम्हाला क्षमस्व करा.

भारतातील मोराची माहिती

भारतामध्ये आढळणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव त्यागो पव्हो क्रिस्टेटस असे आहे, भारतामध्ये आढळणारा मोर यामध्ये नर हा मादीपेक्षा थोडासा उंच असतो त्याचे वजन मादीपेक्षा पण थोडेसे जास्त असते.

मोर या पक्षाचे डोके निळी असते त्याच्या मानेवर गडद निळ्या रंगाची पिसे असतात त्याच्या पाठीवर तांबूस रंगाचे पिसे असतात.

नर या मोराला शेपटी भोवती पिसारा नसतो. त्याच्या पिसाच्या रचनेमुळे तो अधिक आकर्षक वाटतो. लांडोरीला पिसारा नसतो तिची शेपटी दाट तपकिरी रंगाची असते, नर प्रमाणे तिच्या डोक्यावर तुरा सुद्धा असतो.

आणखी वाचा : चिमणी ची माहिती

या मोरांचे वास्तव्य सामान्यपणे दाट जुडूपामध्ये विशेष करून नदी ओढा यांच्या किनाऱ्याला असते. मोर गटागटाने राहणारा पक्षी आहे आणि गटा-गटा मध्येच वावरणारा सुद्धा आहे.

हा मनुष्यवस्तीच्या आसपास प्रामुख्याने खेड यांच्या आसपास राहणारा पक्षी आहे. दिवसभर ते अन्नाच्या शोधामध्ये प्रवास करतात आणि रात्रीच्या वेळेस ते झाडावरच राहून आराम करतात किंवा झोपतात. जमिनीवर पडलेले फळ धान्य साप उंदीर सरडे कीटक इत्यादी खाऊन मोर आपले पोट भरतो.

मोरा चा जीवन काल हा 23 वर्ष असू शकतो, पांढरा मोराची जाती विविध प्राणी संग्रहालय यातून मोरांची बनवून निर्माण झालेली आहे.

मोराचे नैसर्गिक शत्रू वाघ, कोल्हा आणि रान मांजर हे आहेत. वाघ व बिबट्या यासारखे प्राणी दिसतात समोर इतर प्राण्यांना ओरडून सूचित करताना दिसतो. आपल्यावर हल्ला होताच मोर हा पक्षी वेगाने धावू लागतो.

मोराच्या पिसाची माहिती

मोराच्या पिसा विषयी खूपच रंजक माहिती आपल्याला पाहायला व ऐकायला मिळते. जसे की घरामध्ये मोरपंख ठेवल्याने घरामध्ये पाल येत नाही, कारण पाल ही मोराचे प्रमुख अन्न आहे, त्यामुळे जर तुमच्या घरा मध्ये सुद्धा पाल यांचा सुळसुळाट झालेला असेल तर तुम्ही घरामध्ये मोरपंख ठेवू शकतो, मोर पंखा मध्ये एक वेगळाच वास असतो, त्यामुळे पाल घरांमध्ये येण्याचे टाळते.

मोर पिसाचे महत्व आहे महाभारत काळामध्ये सुद्धा पाहायला मिळते. जसे की भगवान श्रीकृष्ण यांच्या मुकुटावर मोर पीस होते.

मोर पिसाचे महत्व आणि त्याचे उपयोग आणि हिंदू धर्मामध्ये त्याला एवढे का महत्त्व आहे हे आम्ही तुम्हाला डिटेल मध्ये खालील दिलेल्या व्हिडीओ मध्ये सांगितलेले आहे.

जर तुम्हाला हा व्हिडिओ पाहायचं असेल तर खालील दिलेल्या व्हिडिओ वर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, व्हिडिओ आवडल्यावर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबतच चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा.

सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, जेणे करणे आम्हाला माहिती होईल की तुम्हाला हा व्हिडीओ आवडला आहे.

मोर पीस हे आपल्या अवतीभवती असलेली नकारात्मक उर्जला संपवण्याचे काम करते.

तुम्ही जर का टीव्ही सिरीयल मध्ये पहिले असेल चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळामध्ये तसेच पौराणिक कालामध्ये मोरपिसाचा वापर लेखणी म्हणून केला जात होता. आचार्य चाणक्य सुद्धा मोराच्या पिसानेच त्यांचे ग्रंथ लिहीत होते.

वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मोराच्या पंखांना खूपच महत्त्व दिलेले आहे. तुम्हाला इंटरनेट वर असे खूप आर्टिकल सर्च केल्यावर मिळून जातील.

पण जर तुम्हाला वास्तुशास्त्र रिलेटेड एकदम योग्य माहिती हवी असल्यास आमच्या यूट्यूब चैनल Wisdom 365 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.

मोराची माहिती मराठी

आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मोर या पक्षाची माहिती मराठीमध्ये सांगितलेली आहे,जर याच्या मध्ये काही कमी असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही निश्चित तुमच्या प्रश्नाला योग्य उत्तरे देऊ

कन्क्लूजन

मोराची माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा, आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.

मोराची माहिती

Please follow and like us:
error

Enjoy this blog? Please spread the word :)

error: Content is protected !!