गोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti

गोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti

आजच्या आर्टिकल मध्ये आपण गोकुळाष्टमी ची माहिती (gokulashtami chi mahiti) जाणून घेणार आहोत. गोकुळाष्टमी का साजरी केली जाते ह्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेणार आहोत.

संपूर्ण भारतामध्ये गोकुळाष्टमी ही धूम धडाके मध्ये साजरी केली जाते. ह्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झालेला होता त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी दहीहंडी सारखे सण साजरे केले जातात.

भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या शैलीमध्ये भगवान कृष्णाचे पूजन केले जाते काही ठिकाणी भक्ति संगित गायिली जातात काही ठिकाणी कृष्णाच्या मुर्तीला दूध-दहीचा अभिषेक घातला जातो.

या दिवशी भगवान कृष्णाला वेगवेगळ्या नावाने बोलवले जाते जसे की गोविंद, बाल गोपाल, काना, गोपाल, केशव अशा वेगवेगळ्या या नावाने संबोधले जाते.

आणखी वाचा : JioMeet काय आहे

भगवान कृष्ण बद्दल जर सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भुतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाच्या रूपामध्ये जन्म घेतला. भगवान कृष्णाचा जन्म धर्माचे रक्षण करण्यासाठी झालेला होता. त्यामुळे भारतामध्ये हजारो वर्षांपूर्वीपासून गोकुळाष्टमी हा सण खूप मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

गोकुळाष्टमी ची माहिती
गोकुळाष्टमी ची माहिती

गोकुळाष्टमी का साजरी केली जाते

चला तर जाणून घेऊया :- गोकुळाष्टमी हा प्रत्येक हिंदूंचा एक विशेष दिवस आहे. असे मानले जाते की भगवान कृष्णाला भक्तिभावाने प्रसन्न केल्याने संतान, समृद्धी आणि अधिक आयुची प्राप्ती होते. सर्व हिंदू द्वारा गोकुळाष्टमी चे पावन पर्व भगवान श्रीकृष्णाच्या जयंती मध्ये साजरी केली जाते.

गोकुळाष्टमीच्या पर्वावर सर्व हिंदू द्वारा भगवान श्रीकृष्णाला जन्म दिनानिमित्त भगवानाला प्रसन्न करण्यासाठी उपवास केले जातात. तसेच त्यांच्या मंदिरांची आकर्षक सजावट केली जाते आणि काही ठिकाणी श्रीकृष्ण रासलीला याचे आयोजन सुद्धा केले जाते.

गोकुळाष्टमी केव्हा साजरी करतात

भगवान कृष्णाचा जन्मापासून हिंदू पंचांग (कॅलेंडर) च्या अनुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या आठव्या दिवसापासून हिंदू द्वारा प्रत्येक वर्ष कृष्ण जन्माष्टमी स्वरूपात साजरी केली जाते. या वर्षी म्हणजेच 2020 मध्ये गोकुळाष्टमी मंगळवारच्या दिवशी 11 ऑगस्टला साजरी होणार आहे.

गोकुळाष्टमी का साजरी केली जाते

हिंदू धर्माच्या मान्यते अनुसार सृष्टीचे पालन करता म्हणवणारे भगवान श्री हरी विष्णू चे आठवे अवतार प्रभु श्रीकृष्ण आहे. आणि श्रीकृष्णाच्या जन्मदिवशी या मंगल दिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते.

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्ष च्या अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री मध्ये मथुरा नगरी मध्ये श्रीकृष्ण भगवान यांनी पृथ्वीवर जन्म घेतला. त्यावेळेसचे मथुरा मधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळली होती तो प्रजेवर असह्य यातना आणि जुलूम करत असे त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुखी आणि कष्टी होती. त्यामुळे ह्या लोकांचे अत्याचारी कंसाच्या राजा पासून मुक्ती देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण ने पृथ्वीवर जन्म घेतला.

गोकुळाष्टमी कशी साजरी करतात

गोकुळाष्टमी पर्वावर होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये बघितली जाते त्यासोबतच परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांमध्ये सुद्धा गोकुळाष्टमी खूप धूम धडाके मध्ये साजरी केली जाते.

हे पण वाचा : गणेश चतुर्थीची माहिती – Ganesh Chaturthi Chi Mahiti

भक्तां द्वारे गोकुळाष्टमीच्या या पर्वावर उपास ठेवले जातात. मंदिरांना सजवले जाते तसेच लड्डू गोपाळच्या मूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन कीर्तन केले जाते आणि त्यासोबतच तरुणांमध्ये दहीहंडी तोडण्याची स्पर्धा ठेवली जाते.

त्याच्यासोबत भगवान कृष्णची नगरी मथुरा मध्ये दूरवरून भक्त त्यांच्या मंदिराला भेट देण्यासाठी येतात. त्या दिवशी संपूर्ण मथुरा नगरी भगवान कृष्णाच्या नावाने दुमदुमून जाते.

दहीहंडी उत्सव

आपल्या सर्वांनाच माहिती आहे की भगवान श्रीकृष्ण लहानपणी दही माखन खाण्यासाठी आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन दही चोरण्याचा प्रयत्न करत असे. दही हे त्यांचे आवडते खाद्य होते, म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणी निमित्त साजरी केली जाते.

गोकुळाष्टमी गोष्ट (Biography of Bhagwan Shri Krishna)

भगवान श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला. भगवान कृष्णाच्या जन्माच्या वेळेस आकाशवाणी झाली होती की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करणार.

कंसाच्या अत्याचाराने संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती त्याच्या राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई एवढेच नव्हे तर त्यांनी आपली बहिण देवकी आणि तिचा पती वसुदेव यांनासुद्धा काळ कोठेरी मध्ये टाकले होते.

एवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकी चे सात पुत्र पहिलेच मारून टाकले होते.

भगवान कृष्णाच्या जन्मदिवशी आकाशा मधून घनघोर पावसाची वर्षा होण्यास सुरुवात झाली. भगवान कृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वसुदेवांनी त्याला एका टोपलीमध्ये टाकले यमुना नदी पार करत त्यांनी भगवान कृष्णाला आपल्या मित्र नंद गोप कडे नेले.

आणि त्यांनी आपल्या पुत्राला भगवान कृष्णाला यशोदा मातेच्या पाशी झोपवले अशाप्रकारे देवकी पुत्र भगवान कृष्णाचे पालन-पोषण यशोदा मातेने केले. त्यामुळे भगवान कृष्णाच्या दो आई आहेत एक देवकी माता आणि दुसरी यशोदा माता.

जन्माष्टमी 2021

जन्माष्टमी 2021: या वर्षी अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र, म्हणून 27 वर्षांनंतर जन्माष्टमी एकाच दिवशी साजरी केली जाते.

विशेष गोष्ट म्हणजे 27 वर्षांनंतर या वेळी ही पहिलीच वेळ आहे जेव्हा श्री कृष्ण जन्माष्टमीचा सण त्याच दिवशी 30 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. बाबा जानकीदास मंदिराचे मुख्य पुजारी आणि ज्योतिषी पं.राजकुमार शास्त्री यांच्या मते, भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला भगवान श्रीकृष्णाचा जन्म रोहिणी नक्षत्रात झाला. या वर्षी ही तारीख 30 ऑगस्ट रोजी पडत आहे.

जन्माष्टमी 2021: जयंती योगात 101 वर्षांनंतर कृष्णाष्टमीचा योगायोग, या योगायोगात, लोक उपवास करून 3 जन्मांच्या पापांपासून मुक्त होतात.

ही तारीख 29 ऑगस्ट रोजी रात्री 11.27 ते 30 ऑगस्ट रोजी दुपारी 1.59 पर्यंत राहील. रोहिणी नक्षत्र 30 ऑगस्ट रोजी सकाळी 6.38 ते 31 ऑगस्ट रोजी सकाळी 9.43 पर्यंत राहील. दरवर्षी स्मार्ता आणि वैष्णवांचे वेगवेगळे जन्माष्टमी होते, याचे कारण वैष्णवांनी उदयतिथी आणि स्मार्टाला आजची तारीख मानली. ज्योतिषाचार्य म्हणतात की, अष्टमी आणि रोहिणी नक्षत्र एकत्र येत आहेत, त्याला जयंती योग मानतो आणि म्हणूनच हा महासंयोग आणखी चांगला आहे. भगवान श्रीकृष्ण द्वापार युगात जन्माला आले तेव्हाही जयंती योग होता.

श्रीकृष्ण जन्माष्टमी 2021: जन्माष्टमीचा सण या अद्भुत योगायोगाने साजरा केला जाईल, उपासनेचे अभिजीत मुहूर्त जाणून घ्या
यावेळी हे सर्व योगायोग जन्माष्टमीला आहेत, या महासंयोगात व्रत केल्यास इच्छित परिणाम मिळतील. आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रासातून सुटका होईल. श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत, भगवान श्रीकृष्णाची उपासना यावेळी शाश्वत परिणाम देईल. म्हणून कोणाच्याही आत्म्याला दुखवू नका, सजीवांवर दया करा. त्यांनी असेही सांगितले की ज्या दिवशी श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या तारखेला सूर्योदय होतो, त्या दिवशी जयंती साजरी केली जाते. ज्या तारखेला अष्टमी येते त्या दिवशी जन्माष्टमीचे आयोजन केले जाते. या वर्षी अष्टमीची तारीख 30 ऑगस्ट आहे. म्हणूनच 30 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी साजरी केली जात आहे.

गोकुळाष्टमी ची माहिती हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिलीमध्ये जरूर शेअर करा…………………..(जय श्री कृष्ण)

गोकुळाष्टमी ची माहिती

8 thoughts on “गोकुळाष्टमी ची माहिती – Gokulashtami Chi Mahiti”

Leave a Comment