Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले?

Koffee With Karan 8: करण जोहरने दीपिका-रणवीरला काय गिफ्ट दिले?

बॉलीवूडची रोमँटिक जोडी म्हणून ओळखले जाणारे कपल “दीप वीर” म्हणजेच दीपिका रणवीर नुसते सोशल मीडियामध्ये चांगले चर्चेमध्ये आहे. काही दिवसापूर्वी कॉफी विथ करण सीजन मध्ये दीपिकाने लग्नानंतर रणवीर ला काय गिफ्ट दिले याबद्दल सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरचा कॉफी विथ करण हा शो चर्चेत आहे. या सीझनच्या पहिल्याच एपिसोड ला बॉलिवूडमधील रोमँटिक कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांनी हजेरी लावली. या शोमध्ये स्टारच्या पर्सनल लाईफ विषयी खुलासा केला जातो.

‘कॉफी विथ करण ८’मध्ये दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी उघड केल्या आहेत. यावेळी दीपिका पदुकोण हिने स्वतःच्या आयुष्यातील एक मोठं सत्य सांगितलं आहे. रणबीर कपूरशी ब्रेकअप झाल्यानंतर दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंह याची एंट्री झाली होती. त्यावेळी दीपिका नैराश्याचा सामना करत होती. या नैराश्यातून तिला बाहेर काढण्याचं काम रणवीरने केलं होतं. त्यावेळी रणवीर दीपिकाच्या प्रेमात पडला होता. मात्र, दीपिकाला पुन्हा रिलेशनशिपमध्ये अडकायचं नव्हतं. त्यामुळे ती या सगळ्याचा फार विचार करत नव्हती. तर, दुसरीकडे रणवीरसोबत असताना देखील आणखी काही लोकांना डेट करत होती. हा खुलासा ऐकून रणवीरही थक्क झाला होता. हे लोक कोण होते, असं विचारताच दीपिका म्हणाली की, आता तिला त्यांची नावं आठवत नाहीत.

Author: Shrikant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *