Shahrukh Khan birthday : बॉलीवूडचा “किंग खान”

Shahrukh Khan birthday : बॉलीवूडचा “किंग खान” म्हणून इंडस्ट्री मध्ये ओळख असलेला शाहरुख खान याचा आज “58 वा वाढदिवस” आहे. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आज फॅन्सने त्याच्या घराबाहेर (मन्नत) समोर रात्रीपासूनच गर्दी केलेली आहे.

बॉलीवूडमध्ये शाहरुख खानला “बॉलिवूडचा बादशाह” आणि “किंग खान” या नावाने ओळखला जाते. शाहरुख खान ने आतापर्यंत 90 होऊन अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले आहे आणि त्यांना 14 फिल्म फेअर पुरस्कार सह असंख्य प्रशंसा मिळालेली आहे. त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री, तसेच फ्रान्स सरकारकडून Ordre des Arts et des Lettres आणि Legion of Honor या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

शाहरुख खान यांचा जन्म 2 नोव्हेंबर 1965 रोजी नवी दिल्ली येथे झाला.” शाहरुख खान ने 1980 च्या दशकाच्या उत्तरार्ध टेलिव्हिजन मध्ये आपले अभिनय कारकीर्दीची सुरुवात केली आणि 1992 मध्ये त्याचा पहिला चित्रपट (बाजीगर) प्रदर्शित झाला.

शाहरुख खान आपल्या रोमँटिक तसेच विनोदी आणि ॲक्शन भूमिकांसाठी ओळखला जातो.

दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे” (1995)
कुछ कुछ होता है” (1998)
देवदास” (2002)
आणि “चक दे इंडिया” सह आतापर्यंत काही मोठ्या बॉलीवूड ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलेले आहे.

अभिनयासोबतच तो एक यशस्वी चित्रपट निर्माता देखील आहे, त्यांच्याकडे “रेड चिली एंटरटेनमेंट” नावाची कंपनी आहे. या कंपनीने आतापर्यंत “ओम शांती ओम” (2007), “चेन्नई एक्सप्रेस” (2013) आणि “हॅपी न्यू इयर” (2014) यासह अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केलेली आहे.

शाहरुख खान हा जागतिक आयकॉन आहे आणि जगातील सर्वात लोकप्रिय आणि प्रभावशाली सेलिब्रेटिंग पैकी एक आहे. जगभरातील लाखो लोकांसाठी तो एक प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्या कार्यामुळे भारतीय संस्कृती आणि सिनेमाला जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची मदत झाली आहे.

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group