Savitribai Phule

Savitribai Phule Biography in Marathi सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला त्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

Savitribai Phule Biography in Marathi

  • सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला त्या नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या होत्या.
  • 1840 मध्ये ज्योतिबा फुले यांच्याशी त्यांचे लग्न झाले त्यावेळी जोतिबांचे वय तेरा वर्षाचे तर सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षाचे होते लग्न झाले तेव्हा त्या पूर्ण निरक्षर होत्या.
  • 1848 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे येथे महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा सुरू केली जोतिबांनी आपल्या अशिक्षित पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः घरी शिक्षण दिले व नंतर त्यांची ची शिक्षिका म्हणून शाळेत नेमणूक केली तेव्हा सावित्रीबाई शाळेत जाऊ मुलींना शिकवू लागल्या.
  • बायकांनी शिकणे हे महापाप आणि त्यांना शिकवणे हे तर महाभयंकर पाप असे त्याकाळी सर्व समाज समजत होता पुण्यातील उच्चवर्णीयांना व सनातनी लोकांना याचा अतिशय संताप आला त्यांनी सावित्रीबाईंना विविध प्रकारे त्रास द्यायला सुरुवात केली.
  • सावित्रीबाईंनी शाळेत जाता-येता असताना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरत आणि निंदा करीत. काही कर्मठ लोकांना लोक त्यांच्या अंगावर चिखल फेकत त्यांना दगडी मारीत पण सावित्रीबाईंनी आपले काम निष्ठेने चालू ठेवले.
  • सनातनी लोकांनी ज्योतिरावांनी जोतिबांच्या वडिलांचे कान भरले त्यामुळे आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे त्यांना मानवले नाही.
  • 1849 मध्ये गोविंदरावांनी ज्योतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले.

Savitribai Phule Biography in Marathi

  • 1863 मध्ये महात्मा फुले यांनी विधवा स्त्रियांच्या निराधार मुलांसाठी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले या ग्रहातील अनाथ मुलांची काळजी घेणे का घेण्याचे काम सावित्रीबाई स्वतः करीत या अनाथ मुलांवर त्या मातेच्या वात्सल्याने प्रेम करीत व त्यांची सर्व प्रकारची सेवा करीत त्यांना स्वतःला अपत्य नव्हते पुढे अशाच एका अनाथ मुलाला यशवंतला त्यांनी दत्तक घेतले.
  • 1890 मध्ये महात्मा फुले यांचे निधन झाले पुढे सत्यशोधक समाजाच्या आंदोलनाची धुरा सावित्रीबाईंनी वाहिली.
  • 1893 मध्ये सासवड येथील सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषवले.

ग्रंथसंपदा

काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर, मातोश्री, सावित्रीबाईंची भाषणे व गाणी इत्यादी.

विशेषतः

  • महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती आंदोलनाची पहिले अग्रणी
  • पहिली स्त्री शिक्षिका व पहिली मुख्याध्यापिका त्यांचा जन्मदिन स्त्रीमुक्ती दिन म्हणून पाळण्यात येतो

मृत्यू

10 मार्च 1897 रोजी त्यांचे निधन झाले.

Savitribai Phule Biography in Marathi

Also Read

Ganesh Vasudeo Joshi

Biography of Mahatma Jyotiba Phule

Savitribai Phule Biography in Marathi

2 thoughts on “Savitribai Phule”

Leave a Comment