Vitthal Ramji Shinde

Biography of Vitthal Ramji Shinde महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जामखंडी येथे 23 एप्रिल 1873 रोजी झाला

Biography of Vitthal Ramji Shinde

Biography of Vitthal Ramji Shinde महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जामखंडी येथे 23 एप्रिल 1873 रोजी झाला त्यांचे त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव यमुनाबाई होते त्यांचे पाळण्यातील नाव तुकाराम असे होते पण रामजी शिंदे हे पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त असल्याने त्यांना आपल्या या मुलाचे नाव विठ्ठल असे ठेवले व पुढे तेच नाव रूढ झाले.

विठ्ठल रामजी शिंदे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण जाम खिंडीतच झाले शाळेत ते एक बुद्धिमान विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.

1891 मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले त्यानंतर काही काळ त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्कारली.

1893 मध्ये त्यांनी उच्चशिक्षणासाठी पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुण्यातील शिक्षण त्यांना मराठा एज्युकेशन सोसायटी व बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड महाराजांचे साहाय्य मिळाले कॉलेजमधून 1898 मध्ये त्यांनी B.A ची पदवी संपादन केली.

Biography of Vitthal Ramji Shinde

कार्य 

  • 1898 मध्ये त्यांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेतली.
  • 1901 मध्ये विठ्ठल शिंदे यांनी प्रार्थना समाचार च्या साह्याने युनिटेरियन धर्म पंथाचे शिष्यवृत्ती मिळून ते ऑक्सफर्ड गेले व तेथील मॅंचेस्टर कॉलेजात त्यांनी तैलनिक धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले इंग्लंडहून मायदेशी परत येत असताना ॲम्स्टरडॅम येथील आंतरराष्ट्रीय उदारधर्म परिषदेमध्ये त्यांनी हिंदुस्थानातील उदारधर्म हा प्रबंध वाचला
  • 1903 मध्ये ते मायदेशी परत आले.
  • एकेश्वरवादी धर्माचे प्रचारक या नात्याने त्यांनी मुंबईच्या प्रार्थना समाजाचे काम 1910 सालापर्यंत केले या काळात त्यांनी तरुण ब्राह्मसंघ काढला.
  • एकेश्वरी धर्मपरिषद भरवण्यात पुढाकार घेतला व सुबोध पत्रिका साप्ताहिकात त्यांनी अनेक लेख लिहिले.
  • 1905 मध्ये महर्षी विठ्ठल शिंदे अहमदनगर जवळ असलेल्या भिंगार या गावी अस्पृश्य बांधवांच्या सभेला निमंत्रण म्हणून गेले होते.
  • 1906 मध्ये अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून त्यांच्या उदार करण्यासाठी महर्षी शिंदे यांनी मुंबई येथे डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था स्थापन केली.
  • डिस्प्रेड क्लासेस मिशन च्या वतीने महर्षि विठ्ठल शिंदे यांनी अनेक उपक्रम हाती घेतले अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा, वसतिगृहे उघडणे, अस्पृश्यांच्या व शिवणकाम शिकवण्याचे काम करणे, त्यांच्या प्रबोधनासाठी व्याख्याने कीर्तने आयोजित करणे आजारी माणसांची शुश्रूषा करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता त्यात त्यांनी या संस्थेच्या शाखा मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, कोल्हापुर, अकोला येथे ठिकाणी उघडल्या.

Biography of Vitthal Ramji Shinde

  • 1910 मध्ये त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक सभा भरून मुरळयांकडे समाजाचे लक्ष वेधले.
  • 1917 मध्ये कलकत्ता येथे आणि बेझंट यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारण संबंधीचा ठराव संमत व्हावा म्हणून त्यांनी पुढाकार घेतला.
  • 1918 मध्ये त्यांनी अखिल भारतीय अस्पृश्यता परिषद मुंबई येथे भरले मुंबईच्या प्रार्थना समाजाला त्यांचे हे कार्य न उचलल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला.
  • 1923-24 मंगळरू येथील आचार्य म्हणून काही काळ त्यांनी काम केले.
  • 1928 मध्ये पुणे येथे शेतकरी परिषदेचे आयोजन करून त्यांनी तेथील शेतकऱ्यांच्या समस्या सरकारपुढे मांडल्या आणि त्यांचे निवारण करण्यासंबंधी सरकारकडे आग्रह धरला अशाच प्रकारच्या परिषदा मुंबई, तेरदाळ, बोरगाव, चांदवड इत्यादी ठिकाणी आयोजित केल्या.
  • 1930 मध्ये महात्मा गांधींच्या सत्याग्रह चळवळीत दाखल झाले व कायदे अभंगा बद्दल त्यांनी सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा झाली.
  • 1933 मध्ये त्यांनी भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हे पुस्तक लिहले.
  • 1934 मध्ये बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाचे वेळी भरलेल्या तत्त्वज्ञान व समाजज्ञान या शाखे संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

ग्रंथसंपदा

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न, माझ्या आठवणी व अनुभव (आत्मचरित्र) इत्यादी.

विशेषता

Biography of Vitthal Ramji Shinde महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले त्यामुळे द्वारका पीठाच्या शंकराचार्यांनी त्यांचा आधुनिक काळातील महान कलिपुरुष असा निषेध केला होता.

मृत्यू

2 एप्रिल 1944 रोजी त्यांचे निधन झाले.

Also Read

Biography of Vitthal Ramji Shinde

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon