Pandurang Mahadev Bapat

Biography of Pandurang Mahadev Bapat सेनापती बापट यांचा जन्म व 12 नोवेंबर 1880 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी झाला.

Biography of Pandurang Mahadev Bapat

सेनापती बापट

Biography of Pandurang Mahadev Bapat सेनापती बापट यांचा जन्म व 12 नोवेंबर 1880 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या गावी झाला त्यांचे पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट असे होते त्यांच्या वडिलांचे नाव महादेव आईचे नाव गंगाबाई असे होते.

शाळेत ते बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. मॅट्रिकच्या परीक्षेत ते संस्कृतच्या जगन्नाथ शंकरशेट शिष्यवृत्ती चे मानकरी ठरले पुढे पुण्याच्या डेक्कन कॉलेजात झाले त्यानंतर त्यांनी मुंबईत शिक्षकाची नोकरी धरली पुढे मुंबई विद्यापीठाने परदेशातील उच्च शिक्षण घेऊन इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक शिष्यवृत्ती जाहीर केली त्यासाठी चाचणीच्या परिषदेत त्यांनी उत्तम गुण मिळवले व ती शिष्यवृत्ती मिळवून 1905 सली ते इंजिनिअर बनण्यासाठी इंग्लंडला गेले.

1905 मेकॅनिकल इंजिनिअरिंग शिकण्यासाठी इंग्लंडला गेले त्याच दरम्यान त्यांचा सुप्रसिद्ध क्रांतिकारक नेते श्यामजी कृष्ण वर्मा यांच्याशी संबंध आला ते शामजी कृष्ण वर्मा यांच्या इंडिया असोसिएशनचे सदस्य बनले व या संस्थेच्या विद्यमानाने भारतातील ब्रिटिश हिंदी स्वातंत्र्य इत्यादी विषयांवर त्यांनी ठिकाणी भाषणे केली ही गोष्ट मुंबई विद्यापीठाला समजता त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती बंद केली. 

Biography of Pandurang Mahadev Bapat

त्यानंतर बापटांनी बॉम्ब विद्या शिकण्यासाठी पॅरिसला गेले पॅरिसमध्ये रशियन क्रांतिकारक होते त्यांना श्यामजी कृष्ण वर्मा, मॅडम कामा वगैरे भारतीय क्रांतिकारक  नेहमी भेटत. बंगालमधून हेमचंद्र दास, मिर्झा अब्बास वगैरे कांतिकारक बॉम्ब चे शिक्षणासाठी येथे आले होते सेनापती बापटांनी बॉम्ब विद्या चे रशियन भाषेतील पुस्तक ऑना खोस ह्या रशियन युतीकडून इंग्रजीत भाषांतरित करून घेतले या संबंधाचे पुस्तिका गुप्तपणे त्यांनी भारतात पाठवली.

1908 मध्ये ते भारतात परतले त्याच त्यापूर्वीच इंग्रजाच्या पार्लमेंट वर बॉम्ब टाकण्याची त्यांची योजना होती परंतु काही कारणाने ती रद्द करावी लागली भारतात परतल्यानंतर कलकत्त्याच्या माणिकतेळा खटल्यातील माफीचा साक्षीदार नरेंद्र गोस्वामी याने बॉम्ब बनवण्याची कृती बापटांनी पाठवलेल्या गोष्ट गोष्ट उघड करताच बापट 1908 पासून चार साडेचार वर्षे शिक्षक, मॅट्रिकच्या विद्यार्थी, शेतकरी असा विविध भूमिकेत भूमिका घेत अज्ञातवासात राहिले.

पुढे सरकारला सुगावा लागून ते पकडले गेले पण थोड्या दिवसात त्यांची मुक्तता झाली.

Biography of Pandurang Mahadev Bapat

1914 नंतर सेनापती बापट क्रांतिकारक क्रांतिकार्य पासून बाजूला झाले आणि समाज सेवेकडे वळले काही दिवस शिक्षकाची नोकरी केली या काळात त्यांनी सामाजिक कार्यावर भर देऊन रस्ते सफाई, स्वच्छता इत्यादी यांच्यासारखे कामे केली.

पुढे त्यांनी सशस्त्र क्रांतिकारक त्याग करून महात्मा गांधीजींच्या सत्याग्रहाचा मार्ग अनुसरला.

1915 ते 1917 मध्ये बापट यांनी लोकमान्यांच्या मराठा मध्ये काम केले पुढे काही दिवस ज्ञानकोशकार केतकरांच्या ज्ञानकोशाचे त्यांनी काम केले.

पुणे जिल्ह्यातून वाहणाऱ्या मुळा नदीवर मुळशी येथील टाटाने वीज उत्पादनासाठी धरण बांधण्याचे बांधण्याचे ठरविले या धरणात 54 खेडी व खूप मोठी शेतजमीन पाण्याखाली पाण्याखाली जाणार होती त्यामुळे हजारो शेतकरी देशोधडीला लागणार होते या अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोठा लढा उभारला.

या लढ्यात त्यांना चारदा तुरुंगवासात टाकले हा लढा तीन वर्षे चालू होता यासाठी बापटांना सात वर्षांची शिक्षा झाली. या लढाईच्या नेतृत्वामुळे त्यांना सेनापती ही पदवी मिळाली पण खूप प्रयत्न करूनही तीन वर्षानंतर सत्याग्रह यशस्वी होऊन धरण पूर्ण झाले.

  • 1931 मध्ये महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे काँग्रेस कमिटीचे येथे एक मताने अध्यक्ष झाले त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा काढून परदेशी कापडांवर बहिष्कार पुकारला.
  • 1938 मध्ये सुभाषबाबूंची व बापट यांची भेट झाली सुभाषबाबूंनी त्यांना महाराष्ट्र शाखा फॉरवर्ड ब्लॉकचे अध्यक्ष केले.
  • 1942 च्या चले जाव आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली.
  • 1955 मध्ये भारतीय जनतेने गोव्यातील पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात सत्याग्रहाची मोहीम उघडली या गोवा मुक्तीच्या लढ्यातही सेनापती बापट यांचा सहभाग होता.
  • मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी मराठी जनतेने 1955 पासून जे आंदोलन उभारले त्यामध्ये सेनापती बापट अग्रभागी होते.

ग्रंथसंपदा

अरविंद घोष यांच्या डिफाइन लाईव्ह या इंग्रजी ग्रंथांचा त्यांनी ‘दिव्य जीवन’ या नावाने मराठीत अनुवाद केला चैतन्य गाथा, हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

विशेषता

सेनापती

मृत्यू

28 नोव्हेंबर 1967 रोजी त्यांचे निधन झाले.

Biography of Pandurang Mahadev Bapat

Also Read

लालबहादूर शास्त्री

Biography of सरोजिनी नायडू

1 thought on “Pandurang Mahadev Bapat”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon