अबुल कलाम आझाद (Abul Kalam Azad)

अबुल कलाम आझाद Biography in Marathi इंडिया विंस फ्रीडम आत्मचरित्र , दास्ताने करबला, गुब्बारे खातीर, तजकिरह इत्यादी.

अबुल कलाम आझाद Biography in Marathi

  • संपूर्ण नाव मोहिउद्दिन अहमद खैरुद्दिन बख्त.
  • जन्मस्थान 11 नोव्हेंबर 1888
  • जन्म स्थान मक्का
  • वडील मौलाना खैरुद्दिन
  • आईचे नाव आलिया बेगम
  • शिक्षण अधिक तर शिक्षण घरीच झाले 1903 मध्ये दर्स ए निजामिया ही फारशी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन आलीम हे प्रमाणपत्र मिळवले
  • विवाह जुलेखा बेगम सोबत 1907 मध्ये.

1906 मध्ये मक्केतील मुल्ला-मौलवी ना त्यांचा सत्कार केला तेव्हा त्यांना अबुल कलाम ही पदवी देण्यात आली अबुल कलाम याचा अर्थ विद्या वाचस्पती असा होतो आझाद हे त्यांचे टोपण नाव ते त्यांनी लेखनासाठी घेतले होते आपल्या लेखनातून उर्दू काव्याच्या शेवटी ते आझाद या नावाचा वापर करत असे.

अशा पद्धतीने मौलाना आझाद यांची  मूळची नावे मागे पडली आणि ते मौलाना आझाद नावाने ओळखले जाऊ लागले आझाद हे नाव लिहिण्यामागे त्यांची जुन्या बंधनातून मुक्ती होण्याची प्रेरणा होती.

1905 मध्ये आझादांच्या वडिलांनी त्यांना मध्य आशियात पाठवले मौलाना आझाद आणि इराक इजिप्त सीरिया तुर्कस्थान इत्यादी देशांना भेटी दिल्या. त्यांनी कैरो येथील अल अझर विद्यापीठाला भेट दिली.

तसेच ते योग्य अरविंदांना जाणून भेटले व ते एका क्रांतिकारी गटात सामील झाले होते परंतु नंतर त्यांनी हा मार्ग सोडून दिला होता कारण क्रांतिकारकांचे गट मुसलमान विरोधी क्रियाशील होते असा अनुभव आझाद यांना येत होता मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत असाही समज त्यावेळी मोठ्या प्रमाणात पसरला होता.

1912 मध्ये मौलाना आझादांनी कलकत्ता येथे अल हिलाल हे उर्दू वृत्तपत्र सुरू केले.

त्यात त्यांनी ब्रिटिश विरोधी भूमिका घेतली होती तसेच भारतीय मुसलमानाच्या ब्रिटिश निष्ठेवर टीका केली होती त्यामुळे सरकारने 1914 मध्ये अल हिलाल वर बंदी घातली परंतु पुढे 1915 मध्ये अल बलाग ज्या नावाचे दुसरे वृत्तपत्र सुरू केले.

1920 मध्ये दिल्ली येथे आल्यावर त्यांनी महात्मा गांधीजींची भेट घेतली आणि काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले.

मौलाना आझाद यांनी महात्मा गांधींच्या असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे आणि ब्रिटिश शासनाच्या विरोधात भाषण केल्यामुळे त्यांना 10 डिसेंबर 1921 रोजी अटक करण्यात आली होती आणि नंतर दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.

मौलाना आझाद यांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची 1923 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

भारतीय मुसलमानात राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत राहून कार्य करण्यासाठी 1929 मध्ये नॅशनल मुस्लिम पक्षाची स्थापना करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्षपदही मौलाना आजादांकडे होते ह्या पक्षाने मुस्लिम लीग सारख्या जातीय संघटनेला विरोध केला.
समाविष्ट राष्ट्रवादावर त्यांची श्रद्धा होती.

अबुल कलाम आझाद Biography in Marathi

  • 1930 मध्ये सविनय कायदेभंगाच्या चळवळीत ते स्वतः उतरले होते तसेच त्यांनी इतर भारतीय मुसलमानांना कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी व्हायला प्रवृत्त केले होते मौलाना आझाद यांचे या चळवळीत वरचे नेतृत्व आणि प्रभुत्व लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने अझादांवर अनेक प्रांतात प्रवेशबंदी केली होती.
  • 1940 मध्ये आझाद पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले 1946 पर्यंत ते त्या पदावर राहिले.
  • 1942 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मुंबई येथे भरलेल्या ऐतिहासिक अधिवेशनाचे मौलाना आझाद अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली छोडो भारत ठराव मंजूर झाला.
  • 1940 मध्ये कॅबिनेट मिशनची चर्चा करीत असताना मौलाना आझाद यांनी वेगळ्या पाकिस्तानाच्या मागणीला कसून विरोध केला.
  • वेगळ्या पाकिस्तानमुळे प्रश्न सुटणार नाही उलट प्रश्नाची गुंतता वाढेल असे मत त्यांनी व्यक्त केले.
  • 1947 ला पंडित नेहरूंनी अंतरिम सरकार तयार केले होते त्यात अझादांना शिक्षण मंत्री म्हणून समावेश झाला होता मृत्यूपर्यंत ते त्या पदावर होते.

बुक्स ऑफ अबुल कलाम आजाद

इंडिया विंस फ्रीडम आत्मचरित्र , दास्ताने करबला, गुब्बारे खातीर, तजकिरह इत्यादी.

  • 1992 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न मरणोत्तर.

मृत्यू

  • 22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचे निधन झाले.

अबुल कलाम आझाद Biography in Marathi

4 thoughts on “अबुल कलाम आझाद (Abul Kalam Azad)”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group