डॉ. राजेंद्र प्रसाद

डॉ. राजेंद्र प्रसाद बायोग्राफी इन मराठी (Dr. Rajendra Prasad) information in marathi

डॉ. राजेंद्र प्रसाद बायोग्राफी इन मराठी

Also Read

डॉ. राजेंद्र प्रसाद बायोग्राफी इन मराठी

डॉक्टर राजेंद्र प्रसाद

  • संपूर्ण नाव राजेंद्र प्रसाद महादेव सहाय
  • जन्म 3 डिसेंबर 1884
  • जन्मस्थान जिरादेई जिल्हा सारन बिहार
  • वडील महादेव
  • आईचे नाव कमलेश्‍वरी देवी
  • शिक्षण 1907 मध्ये कलकत्ता विद्यापीठातून M.A
  • 1910 मध्ये बॅचलर ऑफ लॉ परीक्षा उत्तीर्ण
  • 115 मध्ये मास्टर ऑफ लॉ परीक्षा उत्तीर्ण
  • विवाह राजबंसदेवी सोबत.

डॉ. राजेंद्र प्रसाद बायोग्राफी इन मराठी

1906 मध्ये राजेंद्रबाबू च्या पुढाकाराने बिहारी क्लब स्थापन झाला त्याचे चिटणीस म्हणून त्यांची नियुक्ती.

1908 मध्ये राजेंद्र बाबूंनी मुजफ्फर पुरच्या ब्राह्मण कॉलेजांमध्ये इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकाची नोकरी मिळवली. काही काळ ते या कॉलेजच्या प्राचार्य पदावर हि राहिले.

1909 मध्ये कलकत्ता सिटी कॉलेजमध्ये अर्थशास्त्र या विषयाचे त्यांनी अध्यापन केले.

1901 मध्ये राजेंद्र बाबूंनी कलकत्ता उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला.

1914 मध्ये बिहार व बंगाल या दोन प्रांतांमध्ये पुराने हजारो लोकांना बेघर होण्याची पाळी आली राजेंद्र बाबूनी दिवस-रात्र एक करून पूर पीडितांना मदत केली.

1916 मध्ये पटना उच्च न्यायालयात त्यांनी वकिली सुरू केली.

1917 मध्ये महात्मा गांधी चंपारण्यातील सत्याग्रह करण्यासाठी गेल्याचे कळताच राजेंद्रबाबू ही तिकडे गेले व त्यांना सत्याग्रहात सामील झाले.

1920 मध्ये महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत ते सामील झाले तेव्हा त्यांनी नोकरी सोडली त्यांच्या दातृत्वामुळे त्यांच्या बँक खात्यात फक्त 15 रुपये शिल्लक होते याच वर्षी त्यांनी देश नामक हिंदी भाषेतील साप्ताहिक काढले.

1921 मध्ये राजेंद्र बाबूनी बिहार विद्यापीठाची स्थापना केली.

1924 मध्ये पाटणा महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली.

1928 मध्ये हॉलंडमध्ये जागतिक युवा शांतता परिषद भरली होती त्यात राजेंद्र बाबूंनी भारत तर्फे भाग घेतला व भाषणही केले.

1930 मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत ही त्यांनी भाग घेतला त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले तुरुंगात खराब अन्न खाऊन त्यांना दम्याचा विकार जडला याच वेळेस बिहारमध्ये मोठा भूकंप झाला प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांना तुरुंगातून सोडण्यात आले भूकंपग्रस्तांना मदतीसाठी त्यांनी बिहार सेंट्रल रिलीफ ची कमिटी स्थापन केली त्यांनी त्याकाळात 28 लाख रुपयांची मदत गोळा करून भूकंपग्रस्तांना वाटली.

डॉ. राजेंद्र प्रसाद बायोग्राफी इन मराठी

1934 मध्ये मुंबई येथील राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे त्यांनी अध्यक्षपद भूषविले.

1936 मध्ये नागपूर येथे झालेल्या अखिल भारतीय हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले.

1942 मध्ये छोडो भारत आंदोलन ना तेही त्यांनी तुरुंगवास भोगला.

1946 मध्ये पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकार स्थापन झाले गांधींजींच्या आग्रहामुळे त्यांनी अन्न व कृषी खात्याचे मंत्रीपद स्वीकारले.

1947 मध्ये राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षपदी त्यांची निवड झाली त्यात पूर्वीचे घटना समितीचे अध्यक्ष बनले.
घटना समितीचे कामकाज दोन वर्ष अकरा महीने आणि 18 दिवस चालले घटनेचा मसुदा तयार केला 26 नोव्हेंबर 1949 ला तो मंजूर झाला आणि 26 जानेवारी 1950 रोजी तो अमलात आणला गेला भारत प्रजासत्ताक राज्य बनले.

स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती होण्याचा बहुमान राजेंद्र बाबूंना मिळाला 1950 ते 1962 असे बारा वर्षापर्यंत त्यांच्याकडे राष्ट्रपतीपद राहिले नंतर उर्वरित जीवन त्यांनी स्थापन केलेल्या पटणा येथील सदाकत आश्रमात घालवले.

डॉक्टर राजेंद्र प्रसाद बुक्स

डिवाइडेड इंडिया, आत्मकथा, चंपारण्य सत्याग्रहाचा इतिहास.

पुरस्कार 

1962 मध्ये भारत रत्न हा सर्वोच्च भारतीय सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.

मृत्यू

28 फेब्रुवारी 1963 रोजी त्यांचे निधन झाले.

डॉ. राजेंद्र प्रसाद बायोग्राफी इन मराठी

3 thoughts on “डॉ. राजेंद्र प्रसाद”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon