अरविंद घोष

अरविंद घोष Biography in Marathi

  • संपूर्ण नाव अरविंद कृष्णघन घोष
  • जन्म 15 ऑगस्ट 1872
  • जन्मस्थान कलकत्ता पश्चिम बंगाल वडील कृष्णघन
  • शिक्षण शिक्षणासाठी वयाच्या सतराव्या वर्षी इंग्लंडला गेले सेंट पॉल स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण व केंब्रिज कॉलेजात उच्च शिक्षण घेतले. आयसीएस परीक्षा उत्तीर्ण पण अश्वरोहनच्या परीक्षेत पुरेसे गुण मिळाल्याने त्यांना ही पदवी मिळू शकली नाही.
  • विवाह मृणालिनी सोबत (1901)

अरविंद घोष Biography in Marathi

इंग्लंडमध्ये बडोद्याचे सयाजीराव गायकवाड व अरविंद घोष यांची भेट झाली अरविंद घोष यांची कुशाग्र बुद्धीमत्ता पाहून ते प्रभावित झाले.

सयाजीरावांनी त्यांची बडोदा संस्थानात नेमणूक केली. अरविंद बाबूंनी बडोदा संस्थानात 1893 पासून 1906 पर्यंत अनेक मुद्द्यावर कामे केली पण बडोदा कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्रोफेसर म्हणून त्यांनी केलेली कामगिरी विशेष महत्त्वाची ठरली.

1905 मध्ये व्हाईसरॉय लॉर्ड कर्झन यांनी बंगालची फाळणी केली देशभर बंगालची फाळणी विरुद्ध चळवळ सुरू झाली संपूर्ण राष्ट्र या फाळणी विरुद्ध खवळून उठले अशावेळी अरविंद सारख्या क्रांतिकार स्वस्थपणे बसणे शक्यच नव्हते त्यांनी 1906 मध्ये आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि सक्रिय राजकारणात स्वतःला झोकून दिले त्याच वर्षी त्यांनी वंदे मातरम या वृत्तपत्राचे सहसंपादक म्हणून कार्य करण्यास सुरुवात केली.

अरविंद घोष Biography in Marathi

सरकारच्या अन्याय व पक्षपाती धोरण वंदेमातरम मधून त्यांनी जोरदार टीका चालवली वंदेमातरम मध्ये ब्रिटिश विरोधी लेखन केल्यामुळे त्यांच्यावर खटला भरण्यात आला परंतु ते निर्दोष सुटले.

बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतीकारी संघटना कार्यरत होती अनुशीलन समितीच्या 500 यावर शाखा होते अरविंद घोष यांचे बंधू ‘बारींद्रकुमार घोष’ हे या संघटनेचे प्रमुख नेते होते.

अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे कलकत्ता जवळ माणिक तळा येथे या समितीने बॉंब तयार करण्याचे केंद्र होते.

1908 मध्ये खुदीराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या दोन तरुणांनी किंग्सफोर्ड या जुलमी न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली पण ते त्यामध्ये अयशस्वी झाले.

खुदीराम बोस पोलिसांच्या हाती लागले त्यांना फाशी देण्यात आली.

पोलिसांनी अनुशील समितीच्या सदस्यांची धरपकड सुरू केली.

अरविंद घोष Biography in Marathi

अरविंद घोष यांना अटक करण्यात आली अरविंद बाबूंचा संबंध बॉम्ब तयार करणाऱ्यांशी जोडण्यात आला पण प्रसिद्ध नेते व कायदेपंडित ‘देशबंधूदास’ यांनी न्यायालयात त्यांची बाजू अतिथीने लढून त्यांना आरोप मुक्त केले.

अलीपुर च्या तुरुंगात असताना त्यांना अदृष्य शक्तीचा साक्षात्कार झाला व ते अध्यात्मकडे वळले ते पांडे चोरीला गेले तेथे त्यांनी ‘योगाश्रम’ काढला.

अरविंद ह्या आश्रमाची कीर्ती सर्व जगभर पसरली व त्यांना अनेक अनुयायी मिळाले.

अरविंद बाबू सदैव एकांतात अध्यात्मिक चिंतन करीत 1914 ते 1921 या काळात त्यांनी आर्य नावाचे अध्यात्मिक मासिक चालवले.

ग्रंथसंपदा

दि लाईफ डिवाइन, अहिंसात्मक प्रतिकाराचा सिद्धांत, भारतीय नवजीवन रहस्य, योगिक समन्वय, इत्यादी ग्रंथ खूप प्रसिद्ध आहे, त्याशिवाय ‘सावित्री’ या नावाचे काव्य ही त्यांनी लिहिले.

Death

5 डिसेंबर 1950 रोजी अरविंद घोष यांनी जगाचा निरोप घेतला.

Also Read

अरविंद घोष Biography in Marathi

3 thoughts on “अरविंद घोष”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group