सरदार वल्लभभाई पटेल Biography in Marathi
सरदार वल्लभाई पटेल |
- संपूर्ण नाव वल्लभभाई जव्हेरभाई पटेल
- जन्म 31 ऑक्टोंबर 1875
- जन्मस्थान करमचसद जिल्हा खेडा गुजरात.
- आई लाडबाई
- शिक्षण 1900 मध्ये वकिलीची परीक्षा उत्तीर्ण.
Also Read
सरदार वल्लभभाई पटेल Biography in Marathi
- 1916 मध्ये लखनऊमध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात वल्लभभाई नी गुजरातचे प्रतिनिधित्व केले.
- 1917 मध्ये अहमदाबाद नगरपालिकेवर निवडून आले.
- 1917 मध्ये खेडा सत्याग्रहात त्यांनी भाग घेतला साराबंदी चळवळीचे नेतृत्व त्यांनी केले.
सरदारांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात विजय मिळवला 1918 च्या जून महिन्यात किसान विजयोत्सव साजरा केला. - त्यावेळी गांधीजींनी बोलून वल्लभ भाईंना मानपत्र देण्यात आले.
- 1919 मध्ये रोलेट अटॅक च्या विरोधासाठी वल्लभभाई अहमदाबाद मध्ये प्रचंड मोर्चा काढला.
- 1920 मध्ये गांधीजींनी असहकार चळवळ सुरू केली या असहकार आंदोलनात चळवळीत वल्लभभाई निही आपले सर्वस्व देशाला अर्पण केले महिन्याला हजारो ची मिळकत देणारी नोकरी त्यांनी सोडली.
- 1921 मध्ये गुजरात प्रांतीय काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली.
- 123 मध्ये इंग्रज सरकारने तिरंगी झेंड्याच्या बंदीचा कायदा केला वल्लभभाई नि या कायद्याविरोधात नागपूरला आले तेव्हा या लढायला अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला.
- निरनिराळ्या भागातील हजारो सत्याग्रही नागपूरला एकत्र जमले साडेतीन महिने पूर्ण निराकार आणि हा लढा चालवण्यात आला सरकारने या लढायला दडपण्याचे अयशस्वी प्रयत्न पण केले.
- 1928 मध्ये बारडोली ला वल्लभभाई नि आपल्या नेतृत्वात शेतकऱ्यांची साराबंदी चळवळ उभी केली प्रथम वल्लभाई नी सरकारला सारा कमी करण्याची विनंती केली.
- परंतु सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले योजना बंद व नियोजनपूर्वक चळवळ सुरू केली चळवळीला दडपण्याचा अयशस्वी प्रयत्न सरकारने केला, परंतु याच वेळी मुंबई विधानसभेच्या काही सदस्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले, परिणामी सरकारने शेतकऱ्यांना मागण्या मान्य कराव्या लागल्या.
- बारडोलीच्या शेतकऱ्यांनी वल्लभभाई ना सरदार हा बहुमान दिला.
- 1931 मध्ये कराची येथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.
- 1942 मध्ये भारत छोडो आंदोलनात भाग घेतल्याबद्दल त्यांना कारावास घडला.
- 1946 मध्ये स्थापन झालेल्या मध्यवर्ती हंगामी मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते ते घटना समितीचे सदस्यही होते.
- 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला स्वातंत्र्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात उपपंतप्रधान पद त्यांना मिळाले. त्यांच्याकडे गृह माहिती आणि प्रसारण तसेच घटक राज्य संबंधीचे प्रश्न ही खाते सोपविण्यात आली.
- वल्लभभाई नी स्वातंत्र्यानंतर सुमारे सहाशे संस्थानाचे भारतात विलीनीकरण केले.
- हैदराबाद संस्थान सुद्धा त्यांच्या पोलीस ऍक्शन मुळे 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाले.
- पुरस्कार नागपूर विद्यापीठ बनारस हिंदू विद्यापीठ व उस्मानिया विद्यापीठ इत्यादींत विद्यापीठांकडून त्यांना डि.लीट ही मानाची पदवी मिळाली.
- 1991 मध्ये मरणोत्तर भारतरत्न
- विशेषतः सरदार भारताचा लोहपुरुष भारताच्या एकत्रीकरणाचे थोर शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व गृहमंत्री
- मृत्यू 15 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचे निधन झाले.
- स्वातंत्र्य वेळी भारतात सुमारे 562 संस्थाने होती भारतीय एकात्मतेला हे मोठे आव्हान होते.
- भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाचा विलीनीकरणात सिंहाचा वाटा उचलला.
सरदार वल्लभभाई पटेल Biography in Marathi
- सरदार पटेल यांचे कार्य
- संस्थानाच्या विलीनीकरण संदर्भात भारतसरकारने केलेल्या करारानुसार सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानिकांना भारतात सामील होण्याचे आव्हान केले.
- संस्थानाची प्रजेची राष्ट्रीय प्रवाहात सामील होण्याची इच्छा असल्यास निदर्शनास आणून त्यांनी संस्थानिकांना आपली संस्थाने स्वतंत्र न ठेवण्याबद्दल बजावले.
- परिणामी काळाची पावले ओळखून बहुसंख्य संस्थाने भारतीय संघराज्यात विलीन झाली.
- अपवाद होता तो फक्त जुनागड हैदराबाद व कश्मीर या तीन संस्थानाचा.
- जुनागड संस्थानाचे विलीनीकरण 20 फेब्रुवारी 1948
- गुजरातच्या सौराष्ट्रातील जुनागड संस्थानातील प्रजेची भारतात सामील होण्याची इच्छा होती.
- परंतु जुनागडच्या नवाबाने पाकिस्तानशी गुप्तपणे संबंध साधून पाकिस्तानात विलीन होण्याचा निर्णय घेतला.
- संस्थानी प्रजेचा याविरुद्ध आंदोलन करताच नबाब पाकिस्तानात पळून गेला.
- 20 फेब्रुवारी 1948 रोजी जनमताच्या कौलनुसार भारत सरकारने जुनागड संस्थान भारतात विलीन केले.
हैद्राबादचे विलीनीकरण 17 व 18 सप्टेंबर 1948
- रजाकार या हिंसावादी संघटनेचा नेता कासीम रझवी याने हैदराबादच्या नबाबाला भारतात सहभागी होण्याचा सल्ला दिला.
- पर्यायाने निजामाने भारत विरोधी धोरण स्वीकारून हैदराबाद हे स्वतंत्र राज्य घोषित करताच मध्यप्रांत व व-हाड यातील काही प्रदेश आपल्या राज्यात जोडण्याची मागणी केली.
- जनमताचा कौलसही न जुमानता त्यांनी पाकिस्तानला वीस कोटीचे कर्ज दिले तसेच भारतीय चलन हैदराबाद मधून रद्द केले व पाकिस्तानशी संबंध जोडले.
- रझाकारांनी जनतेवर अनन्वित अत्याचार केले.
अखेर 13 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद पोलिस कारवाई करावी लागली. - 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद भारतात विलीन करण्यात आले.
- 1956 च्या राज्य पुनर्रचना कायद्यानुसार हैदराबाद मधील तेलगु भाषिक प्रदेश आंध्र प्रदेश कन्नड भाषिक प्रदेश कर्नाटक आणि मराठी भाषिकांचा मराठवाडा हा प्रदेश महाराष्ट्रात जोडण्यात आला.
जम्मू-काश्मीरचे विलीनीकरण 26 व 27 ऑक्टोबर 1947
- काश्मीरचा राजा हरिसिंग याने आपले संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय घेतला.
- पाकिस्तानी राजा हरिसिंग वर विलन करण्यासाठी दबाव आणून अनेक घुसखोर कश्मीरमध्ये पाठविले.
- 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानी सैन्य डोळ्याच्या रूपात आत घुसून आक्रमणास प्रारंभ केला.
- या बदलत्या परिस्थितीतहरिसिंग भारत सरकारकडे मदत मागितली व 26 ऑक्टोबर 1947 रोजी सामील नाम्या वर सह्या केल्या.
- 27 ऑक्टोंबर 1947 रोजी भारतीय सेनेने प्रति आक्रमण करून घुसखोरांना हटविले.
- मेजर जनरल कुलवंतसिंग, मेजर जनरल थिमय्या, मेजर सोमनाथ शर्मा, ब्रिगेडियर उस्मान यांनी पराक्रम गाजवून निम्म्याहून अधिक कश्मीर मुक्त केला.
- दरम्यानच्या काळात 1948 मध्ये पंडित नेहरूंनी कश्मीर प्रश्न यूनो कडे नेला.
- 1 जानेवारी 1949 रोजी युद्धबंदी घोषित झाली.
- पाकने घुसखोरी केलेला कश्मीर चा उर्वरित भाग पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखला जातो.
फ्रेंच व पोर्तुगीज वसाहतीचे विलीनीकरण
- भारतात फ्रेंचांची सत्ता चंद्रनगर, पुद्दुचेरी, कारिकल, माहे, येनम येथे होती.
- 1949 50 मध्ये चंद्रनगर या वसाहतीत सार्वमत घेण्यात आले. इतरही वसाहतीत अशाच प्रकारे भारतात सामील झाल्या व भारतातील फ्रेंच सत्तेचा शेवट झाला.
गोवा मुक्तिसंग्राम
- 1928 मध्ये डॉक्टर टी बी कुन्हा यांच्या अध्यक्षतेखाली गोवा कॉंग्रेस कमिटीची स्थापना झाली.
- 1945 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोवा युथ लीग ही संस्था मुंबई स्थापन केली.
- 1940 मध्ये डॉक्टर कुन्हा यांनी गोव्यात भाषणबंदीचा हुकूम मोडल्याबद्दल त्यांना आठ वर्षाचा तुरंग वासाची शिक्षा झाली.
- जून 1946 मध्ये डॉक्टर राम मनोहर लोहिया गोव्यातून हद्दपार करण्यात आले.
- 1948 मोहन रानडे मूळ नाव मनोहर आपटे यांनी गोव्यातील पोर्तुगीजांनी विरुद्ध सशस्त्र लढा दिला त्यांना 1960 पर्यंत गोव्यात व त्यानंतर बारा वर्षे पोर्तुगालमधील तुरुंगात ठेवण्यात आले.
- 21 जुलै 1954 गोवामुक्ती आघाडीच्या स्वयंसेवकांनी दादरा परिसर पोर्तुगिजांच्या बंधनातून मुक्त केला (चळवळीचे नेते फ्रांसिस व वामन सरदेसाई)
- 28 जुलै 1954 आझाद गोमंतक दल व गोवन्स पिपल्स पार्टीयांनी स्थानिक वारली नागरिकांच्या साह्याने नगर-हवेली वर हल्ला चढविला व नगर-हवेली स्वतंत्र केले.
- 19 सप्टेंबर 1961 रोजी गोवा मुक्त झाला.
4 thoughts on “सरदार वल्लभभाई पटेल”