लोकमान्य टिळक

लोकमान्य टिळक (biography in marathi)

लोकमान्य टिळक biography in marathi संपूर्ण नाव बाळ केशव गंगाधर टिळक जन्म 23 जुलै 1856 जन्मस्थान चिखलगाव तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी, वडील गंगाधरपंत, आईचे नाव पार्वतीबाई.

Telegram Group Join Now
WhatsApp Group Join Now

शिक्षण 1876 मध्ये बीए गणित प्रथम श्रेणीत उत्तीर्ण 1879 मध्ये एलएलबी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण विवाह सत्यभामाबाई सोबत.

1880 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना 1881 मध्ये जनजागृतीसाठी केसरी हे मराठी व मराठा हे इंग्रजी अशी दोन वृत्तपत्र प्रसिद्ध करण्यात सुरुवात केली.

1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1885 साली पुणे येथे फर्गुसन कॉलेज सुरू करण्यात आले 1885 राष्ट्रीय सभा स्थापनझाली होती लोकमान्य टिळक त्याच्या सामील झाले. पुढील काळात सामाजिक सुधारणेच्या प्रश्न वरून टिळक व आगरकर यांच्यात मतभेद निर्माण झाले त्यामुळे आगरकरांनी 1887 मध्ये केसरीच्या संपादकपदाचा राजीनामा दिला टिळक केसरीचे संपादक झाले, आपल्या या वृत्तपत्र द्वारे टिळकांनी राष्ट्रीय विचारांचा प्रसार व प्रचार करण्यास सुरू केला.

More Article Click Here

लोकमान्य टिळक (biography in marathi)

  • 1893 मध्ये ओरियन नावाचे पुस्तकाचे प्रकाशन.
  • लोकांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी सार्वजनिक  ‘गणपती उत्सव’ आणि ‘शिवजयंती उत्सव’ सुरु केला.
  • 1895 मध्ये मुंबई प्रांतिक कायदेमंडळांना चे सभासद म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती.
  • 1897 मध्ये गंगाधर टिळकांवर राजद्रोहाचा आरोप करून दीड वर्षे संमिश्र कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली.
  • 1903 मध्ये दि आर्टिक होम इन वेदाज नामक पुस्तकाचे प्रकाशन
  • 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या सुरत येथे भरलेल्या अधिवेशनात जहाल व मावळ गटातील संघर्ष विकोपाला गेला परिणामी मावळ गटाने जहालांची काँग्रेस संघटनेतून हकालपट्टी केली जहालाचे नेतृत्व लोकमान्य टिळकांनी कडेे होते.
  • 1908 मध्ये टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला त्यामध्ये त्यांना सहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली ब्रह्मदेशातील आत्ताचा म्यानमार त्यांना मंडालेच्या तुरुंगात रवानगी करण्यात आली.
  • मंडालेच्या तुरुंगात या महापुरुषांनी निरनिराळे संदर्भग्रंथ मागून गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला एवढेच नव्हे तर जर्मनीत व फ्रेंच या दोन्ही समृद्ध भाषेतील महत्त्वाचे ग्रंथ वाचता यावे म्हणून त्यांनी या भाषेचाही अभ्यास केला.

लोकमान्य टिळक (biography in marathi)

1916 मध्ये त्यांनी डॉक्टर ॲनी बेझंट यांच्या सहकार्याने होमरूल लीग या संघटनेची स्थापना केली.

भारतीय होमरूल चळवळीने स्व शासनाचे अधिकार सरकारकडे मागितले.

होमरूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे याला स्वशासन म्हणत स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच असे टिळकांनी ठामपणे सांगितले होमरूल चळवळीमुळे राष्ट्रीय आंदोलनात नवचैतन्य निर्माण झाले लोकमान्य टिळकांनी स्वदेशी , बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण व स्वराज्य या चतुसूत्री कार्यक्रमाचा पुरस्कार केला.

लोकमान्य टिळक (biography in marathi)

हिंदी ही राष्ट्रभाषा असावी ही घोषणा टिळकांनी प्रथम केली.

ग्रंथसंपदा ओरायन 1893, आर्टिक होम इन वेदाज 1903, गीतारहस्य, इत्यादी.

विशेषता भारतीय असंतोषाचे जनक. लाल बाल पाल या त्रिमूर्तींपैकी एक.

मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी लोकमान्य टिळकांचा मुंबई येथे मृत्यू झाला.

Also Read

लोकमान्य टिळक (biography in marathi)