भाऊ कदम – Bhau Kadam
मराठी सृष्टीतील एक दिग्गज कलाकार आपल्या कॉमेडी टाइमिंग लोकांना खळखळून हसवणारे भाऊ कदम यांच्या पर्सनल लाईफ विषयी आपन या आर्टिकल मध्ये माहिती जाणून घेणार आहोत थेटर पासून ते टीव्ही मालिकांच्या प्रवासामध्ये Bhau Kadam कशी मेहनत घेतली याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.
भाऊ कदम माहिती
आजच्या आर्टिकल मध्ये आपण भाऊ कदम यांच्या विषयी माहिती जाणून घेणार आहोत Bhau Kadam हे चला हवा येऊ द्या मधील एक प्रमुख कलाकार आहेत आणि त्यांचे फॅन फॉलोइंग महाराष्ट्रामध्ये खूपच जास्त आहे तसे पाहायला गेले तर त्यांचे खरे नाव भालचंद्र कदम असे आहेत पण लोक त्यांना प्रेमाने भाऊ असे म्हणतात Bhau Kadam जी कॅरेक्टर करतो त्याची छाप लोकांच्या मनावर कायम राहते, जशी कि शांताबाई आणि आनंद शिंदे यांची केलेली नक्कल किंवा यांची भूमिका आज ही लोकांच्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे.
आणखी वाचा : अनिता दाते (राधिका)
भाऊ यांनी शांताबाई हे नाव संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये पोहोचवले. आणि अजूनही त्यांचा प्रवास थांबलेला नाही तो पुढे सातत्याने चालू राहणार आहे.
भाऊ कदम बायोग्राफी
चला तर मग भाऊ कदम यांच्या बायोग्राफी विषयी थोडीशी माहिती जाणून घेऊ.
भालचंद्र कदम म्हणजेच भाऊ यांचा जन्म 3 मार्च 1970 मध्ये झालेला आहे. भाऊ हे मराठी चित्रपट सृष्टी मधील एक एक अभिनेता, कॉमेडियन आहे. चित्रपटा सोबत ते मराठी मालिका, मराठी टीव्ही अवॉर्ड शो, रियालिटी शो, नाटकांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात.
नाव | भालचंद्र कदम (भाऊ कदम – Bhau Kadam) |
जन्मदिवस | 3 मार्च 1970 |
वय | 50 वर्षे |
जन्म ठिकाण | मुंबई, महाराष्ट्र, इंडिया |
राहण्याचे शहर | मुंबई, महाराष्ट्र |
शाळा | ज्ञानेश्वर, स्कूल, वडाला, मुंबई |
कॉलेज | माहित नाही |
कॉलिफिकेशन | माहित नाही |
व्यवसाय | अभिनेता आणि कॉमेडियन |
पालक | माहित नाही |
भाऊ | माहित नाही |
व्यवहारिक स्थिती | विवाहित |
पत्नी | ममता कदम |
पण तसे पाहायला गेले तर Bhau Kadam यांना खरी ओळख ही झी मराठीवरील चला हवा येऊ द्या च्या लोक प्रसिद्ध कार्यक्रमांमुळे मिळाली.
भाऊ ची कॉमेडी टाइमिंग या शोला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले, त्यांनी साकारलेले आजपर्यंत जेवढे ही कॅरेक्टर लोकांच्या मनामध्ये घर करून राहिले. विशेष करून शांताबाई आणि आणि आनंद शिंदे यांचे केलेले भूमिका लोकांच्या खास आठवणीत राहिेली.
आज Bhau Kadam संपूर्ण महाराष्ट्राच्या घरांमधला एक एक सदस्य झालेला आहे, आणि महाराष्ट्राची जनता सुद्धा त्यांना तेवढेच भरभरून प्रेम देते.
भाऊ कदम पर्सनल लाईफ
चला तर जाणून घेऊया भाऊ कदम यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी माहिती.
तर या गोष्टीची सुरुवात होते 3 मार्च 1970 रोजी जेव्हा भालचंद्र कदम म्हणजेच भाऊ यांचा जन्म मुंबई महाराष्ट्र मध्ये झाला. प्रेमाने लोकांना भाऊ असे म्हणतात भाऊंनी आपले प्राथमिक शिक्षण ज्ञानेश्वर स्कूल वडाला मधून पूर्ण केलेले आहे.
त्यांनी आपल्या करीयरची सुरुवात 1991 पासून केली. त्याची सुरुवात त्यांनी थेटर मधून केली त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपट नाटक मालिका यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला.
भाऊ कदम कॉमेडी
पण भाऊला खरी प्रसिद्धी त्यांच्या कॉमेडी टाइमिंग मुळे मिळाली. कॉमेडी मध्ये भाऊला मराठीतील किंग समजले जाते.
Bhau Kadam ने आतापर्यंत नऊ सिरीयल मध्ये काम केलेले आहे त्यामध्ये 500 ड्रामा शोमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे.
भाऊला आयुष्यामध्ये त्याची खरी ओळख ही झी मराठी मुळे मिळाली झी मराठीवरील फू बाई फू या लोक प्रसिद्ध कॉमेडी शो मुळे भाऊ हा मराठी माणसांच्या घराघरांमध्ये जाऊन पोहोचला.
भाऊच्या अफाट कॉमेडी मुळे तो खूपच कमी कालावधीमध्ये महाराष्ट्राचा नंबर वन कॉमेडी एक्टर झाला.
Bhau Kadam यांनी ज्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत त्याच्या मागे एक एक विशेष व्यक्तीचा खूप हातभार आहे तो म्हणजे डॉक्टर निलेश साबळे.
निलेश साबळे यांच्या लेखणीतून जे जे पात्र डॉक्टरनी लिहले त्याला योग्य न्याय भाऊ यांनी मिळवून दिला.
डॉक्टरांचे स्क्रिप्ट आणि भाऊ यांचे ॲक्टींग याने महाराष्ट्र खळखळून हसला.
फू बाई फू नंतर ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा ती दिसली ती एका नव्या रूपामध्ये.
झी मराठी वरील चला हवा येऊ द्या या लोक प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये या जोडीने धमाल उडवून टाकली.
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात
चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात खूपच रंजक आहे. जेव्हा रितेश देशमुख यांचा पहिला मराठी चित्रपट ‘माऊली‘ त्याचे प्रमोशन करण्यासाठी झी मराठी ला एक प्लॅटफॉर्म हवा होता, रितेश देशमुख च्या आग्रहामुळे डॉक्टर निलेश साबळे यांनी ‘माऊली‘ या चित्रपटाचे प्रमोशनसाठी हवा येऊ द्या या कार्यक्रमाची सुरुवात केली.
पण कोणालाच माहिती नव्हते की हा कार्यक्रम खूप कमी कालावधीतच लोकांच्या मनामध्ये एवढे मोठे स्थान निर्माण करेल याचा कोणी अंदाजच बांधला नव्हता.
चला हवा येऊ द्या या शोधामुळे मराठी नाटक मराठी सिनेमा मराठी सिरीयल यांच्या प्रमोशनसाठी चला हवा येऊ द्या त्यांच्यासाठी संजीवनी म्हणून ठरला.
डॉक्टर निलेश साबळे, Bhau Kadam, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे या जोडीने महाराष्ट्राला खळखळून हसविले आहे.
या शोची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे, पण लोक त्यामुळे याचे शूटिंग तीन महिने स्थगित केले होते. पण आता हा शोध पुन्हा नव्याने चालू झाल्यामुळे त्याची लोकप्रियतेमध्ये जरा सुद्धा कमी झालेली नाही.
आणखी वाचा : अभिजीत खांडकेकर (गुरुनाथ सुभेदार)
मराठी मालिका बरोबरच भाऊ यांनी मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम केलेले आहे त्यामध्ये टाईमपास हा रवी जाधव दिग्दर्शित सिनेमा महाराष्ट्रामध्ये सुपरहिट ठरला.
भाऊ कदम मराठी चित्रपट
तुझं माझं जमेना, जाऊ तिथे खाऊ, टाइमपास, टाईमपास टू, जाऊद्याना बाळासाहेब, नशीबवान, सायकल, सांगतो ऐका, मिस मॅच, पुणे विया बिहार यासारख्या चित्रपटांमध्ये भाऊ कदम यांनी भूमिका केलेल्या आहेत. भाऊंनी आपल्या करिअरमध्ये आजपर्यंत जेवढे चित्रपट केले आहेत त्याची यादी खाली दिलेली आहे.
वेडिंग चा सिनेमा |
व्हीआयपी गाढव |
नशीबवान |
सायकल |
जगावेगळी अंतयात्रा |
जिंदगी विराट |
बॉईज |
झाला बोभाटा |
राजन |
जाऊद्याना बाळासाहेब |
हाफ तिकीट |
मेड इन महाराष्ट्र |
वाजलच पाहिजे |
टाईम बरा वाईट |
टाईमपास टू |
मिस मॅच |
सांगतो ऐका |
पुणे विया बिहार |
आम्ही बोलतो मराठी |
बाळकडू |
नर्बाची वाडी |
चांदी |
एक कटिंग चाय |
कोकणस्थ |
फरारी की सवारी (हिंदी चित्रपट) |
कुटुंब |
गोळा बेरीज |
फक्त लढ म्हणा |
मस्त चाललंय आमचं |
हरिश्चंद्राची फॅक्टरी |
डोंबिवली फास्ट |
भाऊ कदम कॉमेडी फू बाई फू
भाऊ कदम यांनी झी मराठीवरील फू बाई फू या कॉमेडी शो मध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली आणि बघता बघता भाऊंनी फू बाई फू च्या 8 सीजन मध्ये काम केले आहे, कॉमेडी एक्टर म्हणून भाऊला घरी लोक प्रसिद्धी फू बाई फू या कार्यक्रमामुळे मिळाली.
भाऊ कदम सुप्रिया पाठारे कॉमेडी
फू बाई फू या झी मराठी वरील कार्यक्रमांमध्ये भाऊ कदम सुप्रिया पठारे यांची कॉमेडी जोडी लोकांना खूप आवडली आणि त्यांचा हा प्रवास फू बाई फू चे 8 सीजन होई पर्यंत चालला. भाऊ कदम सुप्रिया पठारे यांनी फू बाई फू या कार्यक्रमांमध्ये कॉमेडी जोडी म्हणून फू बाई फू चे पारितोषक सुद्धा जिंकलेले आहे.
भाऊ कदम family
भाऊ कदम यांच्या family विषयी जर माहिती सांगायची झाली तर भाऊंनी ममता कदम यांच्याशी विवाह केलेला आहे, भाऊंना 3 मुली आहेत आणि एक मुलगा आहे अशी त्यांची family आहे.
इंस्टाग्राम
जर तुम्हाला Bhau Kadam यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फुल करायचे असेल तर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही त्यांना इंस्टाग्राम अकाउंट वर फॉलो करू शकता.
कन्क्लूजन
Bhau Kadam बायोग्रफी हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड फॅमिली मध्ये शेअर करायला विसरू नका.
7 thoughts on “भाऊ कदम – Bhau Kadam”