Chetana Bhat Maharashtrachi Hasya Jatra

About Chetana Bhat
आजच्या आर्टिकल मध्ये आपण Marathi Actress and Comedian Chetana Bhat यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया त्यांच्या विषयी थोडीशी माहिती.

Chetana Bhat Maharashtrachi Hasya Jatra

Chetana Bhat Maharashtrachi Hasya Jatra
सध्या अभिनेत्री चेतना भट हे सोनी मराठी या वाहिनीवर महाराष्ट्राची हास्य जत्रा या टीव्ही रियालिटी शोमध्ये अभिनय करताना आपल्याला दिसत आहे, याआधी त्यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये अभिनय केला होता. चला तर जाणून घेऊया त्यांच्या पर्सनल लाईफ विषयी थोडीशी माहिती.

Chetana Bhat

अभिनेत्री चेतना भट यांचा जन्म कल्याण, मुंबई, महाराष्ट्र मध्ये झालेला आहे. अभिनेत्री चेतना भट यांनी आपल्या अभिनय करिअरची सुरुवात मराठी नाटकांपासून केलेली आहे. शाळेत असल्यापासूनच त्यांना अभिनयाची फार अवघड होती.

Education

कल्याण मुंबई महाराष्ट्र मध्ये जन्मलेली अभिनेत्री चेतना भट यांनी आपले शालेय शिक्षण Subhedar Wada GEI’s High School मधून पूर्ण केलेले आहे, तसेच त्यांनी आपले कॉलेजचे एज्युकेशन V. G. Vaze College मधून पूर्ण केलेले आहे.

Career

अभिनेत्री चेतना भट यांनी आपल्या अभिनय तर याची सुरुवात मराठी नाटकं पासून केलेली आहे तसेच त्यांना नृत्याची सुद्धा फार आवड आहे.

काटाकिर्रर्रर्र

अभिनेत्री चेतना भट यांनी काटाकिर्रर्रर्र यासारख्या लावणी महोत्सवामध्ये सुद्धा नृत्य केलेले आहे. अभिनेत्रीसोबत त्या एक उत्तम डान्सर सुद्धा आहेत.

मराठी नाटक (Marathi Drama)

अभिनेत्री चेतना भट यांनी 2018 मध्ये “शुभ दंगल सावधान” या मराठी नाटकांमध्ये अभिनय केला होता. या नाटकामध्ये त्यांनी किशोर चौगुले यांच्या सोबत अभिनय केलेला आहे.

जर त्यांच्या नाटकांविषयी बोलायचे झाले तर त्यांनी ‘गलती से मिस्टेक’ या नाटकामध्ये अभिनेता संजय खापरे आणि मराठी कॉमेडी अभिनेता आशिष पवार यांच्यासोबत अभिनय केला होता या नाटकासाठी अभिनेता आशिष पवार यांना सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता म्हणून पुरस्कार मिळालेला आहे.

चेतना भट मराठी चित्रपट (Marathi Movie)

मराठी नाटकांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री चेतना भट यांना मराठी चित्रपट “शाली” मध्ये अभिनय करण्याची संधी मिळाली.

चेतना भट मराठी सिरीयल (Marathi Serial)

मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये अभिनय केल्यानंतर अभिनेत्री चेतना भट यांना मराठी मालिका मध्ये काम करण्याची संधी मिळाली. झी युवा या वाहिनीवरील “Almost Sufal Sampoorna” या मालिकांमध्ये अभिनय केलेला आहे. या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेमध्ये अभिनेत्री गौरी कुलकर्णी आणि अभिनेता निखिल दामले यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Chetana Bhat Biography

Biography of Chetana Bhat
Profession : Actress & Comedian
Marathi Actress / Actor : Chetana Bhat
Name : Chetana Bhat
Nike Name : Chetana
Real Name : Manjiri Manndar Cholkar
Date of Brith : N/A
Age : N/A
Birthplace : Kalyan, Mumbai, Maharashtra, India
Hometown : Kalyan, Mumbai, Maharashtra, India
Current City : Kalyan, Mumbai, Maharashtra, India
Measurements : N/A
Height : N/A
Weight : N/A
Eye Colour : Black
Hair Colour : Black
Nationality : Indian
Zodiac sign :
Religion : Hindu
Debut
School : Subhedar Wada GEI’s High School
College : V. G. Vaze College
Education : Graduation
Family :
Father Name : Not Known
Mother Name : Not Known
Bother Name : Not Known
Sister : Not Known
Married Status : Married
Married Date : 20 April 2018
Boyfriend : N/A
Husband Name : Manndar Cholkar
Children : N/A
Cast : N/A
Serials : Almost Sufal Sampoorna
Movie : Shali
Song : N/A
Web Series : N/A
Natak : शुभ दंगल सावधान, गलती से मिस्टेक
Award : N/A
Hobbies : Dancing
Photo :
Lifestyle :
Instagram : Click Here
Facebook : Click Here
Twitter : Click Here
Youtube : Click Here
Wiki : Click Here
Tik Tok : N/A
Contact Number : N/A
Whatsapp Number : N/A
Net Worth : N/A
Chetana Bhat Biography

Chetana Bhat Husband Mandar Cholkar

महाराष्ट्राची हास्य जत्रा मध्ये कॉमेडी व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री चेतना भट यांचे खरी आयुष्यामध्ये लग्न झालेले आहे. त्यांचे लग्न मराठी लेखक मंदार चोळकर (Mandar Cholkar) यांच्याशी झालेले आहे. आज मराठी सिनेसृष्टीतील कविमनाचा माणूस अशी ओळख असणारे गीतकार #मंदार_चोळकर यांचा वाढदिवस. जन्म.१५ ऑगस्ट मुंबई येथे झाला.

कसदार आणि सर्जनशील कवींच्या यादीत मंदार चोळकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते. सर्वप्रथम चारोळी आणि त्यानंतर कविता रचत गीत लेखनाकडे वळलेला मंदार हे आज तरुणाईमध्ये सर्वात लोकप्रिय कवी झाले आहेत. मंदार यांच्या कविता संगीताच्या माध्यमातून लोकांच्या मुखी रुळलेल्या दिसून येत आहेत. मंदार चोळकर यांचे शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर दादर येथे झाले.
चारोळ्यांनी सुरुवात करणाऱ्या मंदार चोळकर यांनी खऱ्या अर्थाने २००९ पासून गीतलेखनाची सुरुवात केली. चारोळ्याचे कवितामय आयुष्य सुरु असताना योगिता चितळे या गायिकेच्या ‘लाइफ इज ब्युटीफुल’ या अल्बमसाठी मंदारने लिहिलेल्या एका गाण्याला निलेश मोहरीर यांनी आपल्या संगीतातून आकार दिला. गीत लेखनाच्या या प्रवासात निलेश मोहरीरची मिळालेली ही सोबत मंदार यांच्या कारकिर्दीसाठी परीस स्पर्श ठरली. त्यानंतर चार ओळींच्या आठ ओळी आणि त्यानंतर कविता अशी दरमजल करत मंदार यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमधील सर्वाधिक गाणी ही मंदार चोळकर यांनी लिहिली आहेत.

यात प्रामुख्याने श्यामचे वडिल, दुनियादारी, क्लासमेट्स, मितवा, ऑनलाइन बिनलाइन, शॉर्टकट, गुरू, फ्रेन्ड्स, मराठी टायगर्स, दगडी चाळ, पोरबाजार, कट्यार काळजात घुसली, बंध नायलॉनचे, फुंतरू, पिंडदान, वृंदावन, एक अलबेला, तालीम, कान्हा, फोटोकॉपी, वन वे तिकीट या सिनेमांचा समावेश आहे. त्यांचे ‘दुनियादारी’ चित्रपटातील ‘देवा तुझ्या गाभाऱ्याला…’ हे दर्दी गाणे व ‘कट्यार काळजात घुसली’ या चित्रपटातील ‘मनमंदिरा’ हे नाट्यगीत ही खूपच गाजली. रुस्तुम या हिंदी चित्रपटातील गाण्यांचे देखील मंदार यांनी गीत लेखन केले आहे. मंदार चोळकर यांनी अनेक मालीकांची शीर्षक गीते लिहिली आहेत. या बरोबरच मंदार यांनी म्युझिक अल्बम तसेच काही जाहिरातींसाठी देखील गीतलेखन केले आहे. मंदार चोळकर यांनी मराठीतील आघाडीच्या गायकां सोबतच अरिजित सिंग, शान, सोनू निगम, हरिहरन, शंकर महादेवन आणि आशा भोसले ह्या हिंदीतील गायकांसाठी देखील गाणी लिहिली आहेत. अशोक पत्की, श्रीधर फडके, अजय -अतुल, शंकर-एहसान- लॉय, अवधूत गुप्ते, चिनार महेश, प्रफुल कार्लेकर, निलेश मोहरीर अशा ६६ हून अधिक संगीतकारांबरोबर त्यांनी काम केलं आहे. मंदार यांनी फुगे, खेळ, जो जो रे बाळा, जीत, रेडिओ नाईट्स, अगडबंब-२, कलटी, ग्रहण, ती आणि इतर, विसर्जन, सत्य, रामप्रहर, फुल ऑन, रोपटं, मिक्स व्हेज, भ्रम, शुभमंगल, हृदयांतर या चित्रपटात ही मंदार यांनी गाणी लिहिली आहेत.

मंदार चोळकर व इतर तीन कवी मित्रांचा ‘We चार देतो नवा विचार’ हा कवितांच्या वरचा कार्यक्रम खूप गाजला आहे.
समीर सामंत, मंदार चोळकर, श्रीपाद देशपांडे, प्राजक्त देशमुख या चार कवींची एकमेकांशी ऑर्कुटवर ओळख झाली. एकमेकांच्या कविता शेअर करता करता त्यांनी ठरवलं आपल्या या कवितांची एक मोळी बांधायची आणि प्रेक्षकांच्या समोर बसून त्यातली एकेक कविता त्यांच्या ओंजळीत टाकायची. कार्यक्रमाचं नाव ठेवलं, ‘वी- चार’. ‘We चार देतो नवा विचार’ ही त्यामागची टॅगलाईन. त्यांना सुजित शिंदे यांची निर्माता म्हणून साथ मिळाली. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या कविता वाचनाचा कार्यक्रम सादर केला आणि प्रत्येक ठिकाणी प्रेक्षकांना बंद मुठी उघडून टाळ्या वाजवायला भाग पाडलं.

मंदार चोळकर यांनी अभिनेत्री चेतना भट यांच्या बरोबर विवाह केला आहे. चेतना भट या अभिनया बरोबरच लहानपणापासून नृत्य शिकल्या असून कॉलेज जीवनात त्या एकांकिकांमध्ये अभिनय करू लागल्या. कालांतराने ‘लोचा झाला रे’ ह्या नाटकासाठी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनय करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कॉमेडी शो, मालिका आदींमध्ये अभिनय केला आहे.
रेडियो मिरचीचा उदयोन्मुख गीतकाराचा पुरस्कार मंदार यांना मिळाला आहे. तसेच नाशिक (२०१४) आणि कल्याण (२०१५) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात बेस्ट लीरिसिस्ट म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.

Conclusion,
Chetana Bhat Maharashtrachi Hasya Jatra
हा आर्टिकल तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आर्टिकल आवडल्यास आपल्या फ्रेंड आणि फॅमिली मध्ये शेयर करायला विसरु नका.

Chetana Bhat Maharashtrachi Hasya Jatra

1 thought on “Chetana Bhat Maharashtrachi Hasya Jatra”

Leave a Comment

Join Information Marathi Group Join Group