Biography of Mahatma Jyotiba Phule यांचा जन्म 1827 मध्ये झाला त्यांचे मूळ घराणे साताऱ्याजवळील कटगुण गावात होते.
Biography of Mahatma Jyotiba Phule
Biography of Mahatma Jyotiba Phule in Marathi महात्मा फुले यांचा जन्म 1827 मध्ये झाला त्यांचे मूळ घराणे साताऱ्याजवळील कटगुण गावात होते. महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव ज्योतिराव गोविंदराव फुले होते यांचे मूळ आडनाव गोर्हे होते पण त्यांनी फुलांचा व्यापार केल्याने लोक त्यांना गोर्हे ऐवजी फुले या आडनावाने संबोधू लागले.
ज्योतिबा एक वर्षाचे असतानाच त्यांची आई चिमणाबाई यांचे निधन झाले त्यामुळे त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी त्यांचे वडील गोविंदराव यांच्यावर येऊन पडली.
ज्योतिरावांचे प्राथमिक शिक्षण 1843-38 या काळात झाले ज्योतिराव अभ्यासू व चौकस होते त्यांची शिक्षणातील प्रगती ही चांगली होती परंतु ज्योतीबांच्या वडिलांनी ज्योतिबाचे शिक्षण बंद करून त्यांना बाग कामात लावले होते परंतु नंतर मुन्शी बेग व लिजीट त्यांच्या आग्रहामुळे जोतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले.
1841 मध्ये त्यांचे नाव मिशनरी शाळेत दाखल करण्यात आले तेथेच त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले या शाळेत ते 1847 पर्यंत होते.
जोतिरावांनी शाळेत शिक्षण घेत असताना लष्करातून निवृत्त झालेल्या लहुजी बुवा कडून तालमीचे, कुस्ती, दांडपट्टा, नेमबाजी इत्यादींचे शिक्षण घेतले होते त्यात पूर्वीच 1840 मध्ये नायगावच्या खंडोजी नेवसे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी त्यांचा लग्न झाले त्याच वेळी जोतिबांचे वय तेरा वर्षाचे तर सावित्रीबाईंचे वय नऊ वर्षाचे होते.
1847 आली थॉमस पेन यांच्या राइट्स ऑफ मॅन नावाचा ग्रंथ त्यांच्या वाचनात आला त्यांना हिंदू समाजातील धर्मातील विषमता ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे हे कळून आले त्यातून त्यांना परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नाच्या वरातीतून जाताना त्यांना एका सनातनी माणसाने शूद्र म्हणून तिथून निघून जायला सांगितले या अपमानाने त्यांना जातीवादाचा तीव्रता समजली आणि शूद्रांना शिक्षण देण्याचे विचार त्यांच्या मनात सुरू झाले.
Biography of Mahatma Jyotiba Phule in Marathi
कार्य
1847 मध्ये ज्योतीबांनी पुण्यामध्ये मुलींसाठी पहिली शाळा बुधवार पेठ येथील भिडे वाड्यात सुरू केली या शाळेत स्वतः ज्योतिबा शिक्षक म्हणून काम करीत असेल त्यांनी सावित्रीबाईंना लिहिण्यावाचण्यास शिकवले आणि त्यांची शिक्षिका म्हणून नेमणूक केली सावित्रीबाई शाळेत जाता-येता नसताना लोक त्यांना अपमानास्पद भाषा वापरीत अनेक निंदा करीत लोकांनी त्याच्या अंगावर शेण फेकले त्यांना दगड मारले पण सावित्रीबाई आपले काम निष्ठेने चालू ठेवले.
ज्योतीबांच्या वडिलांना ही आपल्या सुनेने शिक्षिका म्हणून काम करावे हे मानवले नाही. 18 39 मध्ये त्यांनी जोतिबा व सावित्रीबाई यांना घराबाहेर काढले 1851 मध्ये बुधवार पेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा त्यांनी उघडली त्यानंतर रस्ता पेठ व वेताळ पेठ येथे आणखी दोन मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केले.
Biography of Mahatma Jyotiba Phule in Marathi
- 1852 मध्ये शिक्षण क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण कार्य केल्याबद्दल मे.कॅंडी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
- 1852 मध्ये त्यांनी पुण्याच्या वेताळ पेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी दोन शाळा उघडल्या.
- 1853 मध्ये आपल्या काही मित्रांच्या सहकाऱ्यांनी महार, मांग इत्यादी लोकांना विद्या शिकविण्याकरिता मंडळी या नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली.
- 1854 मध्ये त्यांनी काही काळ स्कॉटिश मिशनच्या शाळेत अर्धवेळ शिक्षकाची नोकरी केली.
- 1855 मध्ये त्यांनी तृतीय रत्न नावाचे नाटक लिहले याच वर्षी त्यांनी प्रौढांसाठी रात्रीची शाळा काढली.
- 1856 मध्ये सनातनी ब्राह्मण लोकांनी मारेकरी पाठवून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.
- 1860 मध्ये त्यांनी विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला.
- 1863 मध्ये त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली याच ग्रहात प्रसूत झालेल्या एका ब्राह्मण विधवा काशीबाईच्या मुलांना यशवंतला त्यांनी दत्तक घेतले.
- 1864 मध्ये त्यांनी पुण्याला सारस्वत जातीतील एक पुनर्विवाह घडवून आणला.
- 1868 मध्ये ज्योतीबांच्या वडिलांचे निधन झाले याच वर्षी त्यांनी आपल्या घरचा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला.
- 1859 मध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा पोवाडा लिहिला तसेच ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक सुद्धा लिहिले.
- 1873 मध्ये पुण्यात त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली ज्योतिबा फुले हेच या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.
- 1876 ते 1882 पर्यंत फुलांनी पुणे महानगरपालिकेचे सभासद म्हणून कार्य केले.
- 1882 मध्ये फुलेंनी टिळक आणि आगरकर यांचा तुरुंगातून सुटल्यानंतर जाहीर सत्कार केला.
- 1888 मध्ये ड्युक ऑफ कॅनॉट यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत त्यांनी भारतीय परिस्थितीचे खरे वर्णन करणारे सडेतोड भाषण केले.
- ज्योतिबा फुले यांनी दिन बंधू या साप्ताहिक वृत्तपत्रांतूनही विपुल लेखन केले होते.
Biography of Mahatma Jyotiba Phule in Marathi
ग्रंथसंपदा
सार्वजनिक सत्य धर्म, गुलामगिरी, शिवाजी राजांचा पोवाडा, ब्राह्मणांचे कसब, शेतकर्यांचा आसूड, इशारा, अस्पृश्यांची कैफियत तृतीय रत्न इत्यादी.
पुरस्कार
स्त्रिया, शूद्र, उपेक्षित व सोशीत यांच्या विषयी केलेल्या महान कार्याबद्दल 1888 मध्ये जनतेने मुंबई येथे ज्योतिबा यांचा फार मोठा सत्कार करून त्यांना महात्मा ही पदवी बहाल केली.
विशेषता
महाराष्ट्राचा मार्टिन ल्युथर किंग, महाराष्ट्रातील आद्य समाजसुधारक, आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक.
मृत्यू
28 नोव्हेंबर 1890 रोजी त्यांचे निधन झाले.
4 thoughts on “Biography of Mahatma Jyotiba Phule”