Dadoba Pandurang Tarkhadkar

Dadoba Pandurang Tarkhadkar marathi mahiti दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे 1814 मध्ये झाला.

Dadoba Pandurang Tarkhadkar marathi mahiti

दादोबा पांडुरंग तर्खडकर मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाणारे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म मुंबई येथे 1814 मध्ये झाला. त्यांचे घराणे हे मूळचे वसई जवळील तरखड येथील त्यांचे आजोबा व्यवसायानिमित्त मुंबईत आले व तेथे स्थानिक झाले.

Dadoba Pandurang Tarkhadkar marathi mahiti कार्य

  • शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दादोबा काही काळ जावरा संस्थानाच्या नबाबाकडे त्यांचे खाजगी शिक्षक म्हणून राहिल्यानंतर त्यांना एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षकाची नोकरी मिळाली पुढे सुरत येथे सुरू करण्यात आलेल्या इंग्रजी शाळेत तेही त्यांनी शिक्षक म्हणून काम केले.
  • 1844 मध्ये दादोबा पांडुरंग यांनी दुर्गाराम मेहता, दिनमणी शंकर दलपतराय यांच्या सहकार्याने सुरत येथे मानवी धर्मसभा या संस्थेची स्थापना केली. या सभेच्या सदस्यांना मुर्तीपुजा मान्य नव्हती हिंदू धर्मातील जातीय संस्थेलाही त्यांचा विरोध होता या सभेतील आचार-विचार अतिशय उदार व समतावादी-मानवतावादी होते. या सभेच्या प्रचारासाठी त्यांनी धर्म विवेचन हा ग्रंथ लिहिला. पुढील काळात या संस्थेच्या वाढीसाठी निष्ठावान कार्यकर्ते लाभले नाही त्यामुळे ती संपुष्टात आली.
  • 1846 मध्ये मुंबईतील ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्‍टर पदी त्यांची नियुक्ती झाली.
  • 1848 मध्ये मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातील विद्यार्थ्यांनी दादोबा पांडुरंग यांच्या अध्यक्षतेखाली ज्ञानप्रसारक सभा स्थापन केली ज्ञान प्रसारण करणे आणि सामाजिक जागृती घडवणे हे तिचे उद्दिष्ट होते.

Dadoba Pandurang Tarkhadkar marathi mahiti

  • 1949 मध्ये दादोबा पांडुरंग यांनी काही जुन्या सहकार यांच्या सहकार्याने मुंबई येथे परमहंस सभा स्थापन केली.
  • परमहंस सभेची तत्वे मानवधर्म सभेच्या तत्वा सारखीच होती मूर्तीपूजा करू नये जातीभेद मानू नये एकेश्वरवादाचा पुरस्कार करणे, विधवा पुनर्विवाहास संमती असावी यासारख्या तत्त्वांचा स्वीकार परमहंस सभेने केला होता.
  • सभेमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येत असत अतिशय गुप्त पद्धतीने तिचे कामकाज चालत सभेच्या आरंभी आणि अखेरीस ज्या मराठीप्रार्थना म्हणण्यात येत असत त्या दादोबानी रचल्या होत्या या सभेच्या मार्गदर्शनासाठी दादोबा पांडुरंग यांनी पारमहिंसक बाह्यधर्म या नावाचा काव्य ग्रंथ लिहिला होता त्यात त्यांनी परमहंस सभेची तत्त्वे विशिद केली होती.
  • 1852 मध्ये दादोबाची ड्युटी कलेक्टर म्हणून नियुक्ती झाली या पदावर असताना त्यांनी 1857 यांचे बंड मोडून काढण्याच्या कामगिरीबद्दल सरकारकडून त्यांना ‘रावबहादुर’ हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
  • 1860 मध्ये कोणीतरी या सभेच्या सभासदांची यादी चोरून ती प्रसिद्ध केली सामाजिक बहिष्काराच्या भीतीमुळे सभासदांच्या त प्रचंड खळबळ उडाली. त्यामुळे शेवटी परम्हांस सभेच्या प्रमुखांनी ही संघटना बरखास्त करण्याचा निर्णय घेतला.

ग्रंथसंपदा

मराठी भाषेचे व्याकरण, मराठी नकाशाचे पुस्तक, विधवा श्रमाजन, शिशू बोध, यशोदा पांडुरंगी, मराठी लघु व्याकरण, धर्म विवेचन, पारमहांसिक बाह्य धर्म इत्यादी.

पुरस्कार

सरकारकडून त्यांना ‘रावबहादुर’ हा किताब देऊन गौरविण्यात आले.

विशेषतः

मराठी भाषेचे व्याकरण लिहून त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया घालण्याचे कार्य केले त्यामुळे मराठी भाषेचे पाणिनी असा त्यांचा उल्लेख केला जातो.

मृत्यू

1882 मध्ये त्यांचे निधन झाले.

Dadoba Pandurang Tarkhadkar marathi mahiti

5 thoughts on “Dadoba Pandurang Tarkhadkar”

Leave a Comment

whatsapp ग्रुप जॉईन करा
WhatsApp Icon