Jagannath Shankar Sheth

Nana Jagannath Shankar Sheth information in marathi जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला.

jagannath shankar sheth

Jagannath Shankar Sheth

जन्म 10 फेब्रुवारी 1803 रोजी झाला.

नानांचे घराने दैवत ब्राह्मण सोनार (nana shankar sheth sonar) होते.

ठाणे जिल्ह्यातील मुरबाड हे त्यांचे मूळ गाव होय त्यांचे आडनाव मुरकुटे असे होते त्यांचे वडील शंकर शेठ यांना व्यापारात अमाप संपत्ती कमावली होती त्यामुळे त्यांचे बालपण सुखात गेले त्यामुळे पुढे त्यांच्या वडिलांच्या मृत्यूनंतर वयाच्या अठराव्या वर्षी घरच्या व्यापार धंद्याची जबाबदारी नानांवर येऊन पडली व्यापार धंद्याचा प्रचंड व्याप असतानासुद्धा त्यांनी सार्वजनिक कार्याची अत्यंत आवड होती.

Also Read

धोंडो केशव कर्वे

लालबहादूर शास्त्री

पंडित जवाहरलाल नेहरू

 

Nana Jagannath Shankar Sheth information in marathi

नानांचा त्या काळातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांची निकटचा संबंध होता त्यापैकी बऱ्याच संस्थांची उभारणी त्यांच्या प्रयत्नाने व पुढाकाराने झाली होती त्यांच्या या कार्यामुळेच आधुनिक मुंबईचे निर्माते किंवा मुंबईचे शिल्पकार असे त्यांना ओळखले जाते.

कार्य

 • 1823 मध्ये नानांनी बाळशास्त्री जांभेकर सदाशिव पंत छत्रे इत्यादींच्या सहकार्याने मुंबईत bombay native education society in marathi या संस्थेची स्थापना केली या संस्थेच्या विद्यमानाने त्यांनी मुंबई शहरात व मुंबई बाहेरील अनेक शाळा व कॉलेज उघडले.
 • 1829 मध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग याने सतीची चाल बंद करणारा कायदा केला या कायद्याला भारतातील सनातनी लोकांनी विरोध केला या कायद्यामुळे भारतीय समाजात असंतोष निर्माण झाला अशा वेळी नानांनी महाराष्ट्रात या कायद्याच्या बाजूने लोकमत तयार करण्यासाठी प्रयत्न केले.
 • 1836 मध्ये सरकारने सोनार पुरची समशान भूमी शिवडीला हलवण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जनतेच्या अनेक गैरसोयी होणार होत्या जनता या निर्णयाविरुद्ध आंदोलनाच्या तयारीत होती जनतेच्या भावना लक्षात घेऊन नानांनी लोकांच्या गैरसोय गव्हर्नरांना पटवून दिल्या. शेवटी गव्हर्नरांनी तो निर्णय रद्द केला.
 • 1840 मध्ये मुंबई विभागातील शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण करण्यासाठी सरकारने बोर्ड ऑफ एज्युकेशन ची स्थापना केली होती बोर्ड अस्तित्वात असेपर्यंत म्हणजे 1840 पासून ते 1856 पर्यंत नाना याचे सदस्य राहिले.
 • 1845 मध्ये दादाभाई नवरोजी, डॉक्टर भाऊ दाजी लाड आणि विश्वनाथ नारायण मंडलिक यांनी मुंबईत स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी ही संस्था स्थापन केली नानांनी या संस्थेला सर्वतोपरी मदत केली भारतीय समाजात विद्येचा व ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि तेथे युवकांमध्ये सार्वजनिक कार्याची आवड उत्पन्न व्हावी हा संस्थेचा स्थापनेमागे उद्देश होता.

Nana Jagannath Shankar Sheth information in marathi

 • मुंबई विभागाचे गव्हर्नर माउंट एल्फिन्स्टन यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याचे त्यांच्या निवृत्तीनंतर स्मारक उभारण्यासाठी नानांनी पुढाकार घेऊन एक Fund जमविला या फंडातून मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना त्यांनी केली तसेच रॉबर्ट ग्रेट या गव्हर्नरच्या स्मरणार्थ मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याचा नानांनी पुढाकार घेतला.
 • 1840 मध्ये मुंबईच्या मुनिसिपल कमिशनवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
 • 1848 मध्ये त्यांनी मुंबई येथे स्वतःच्या घरात मुलींची शाळा सुरू केली. यावरून ते स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते होते हे समजते.
 • 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ व दादाभाई नवरोजी यांनी बॉम्बे असोसिएशन या संस्थेची स्थापना केली बॉम्बे असोसिएशन हे आधुनिक काळातील भारतातील राजकीय स्वरूपाची पहिली संस्था होती असे म्हणता येईल.
 • 1857 मध्ये मुंबई विद्यापीठ स्थापन झाल्यावर या विद्यापीठाचे फेलो म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

पुरस्कार

1835 मध्ये नाना “जस्टीस ऑफ द पीस” चा बहुमान प्राप्त झाला होता.

विशेषता

आधुनिक मुंबईचे निर्माते, मुंबईचे शिल्पकार, मुंबईचा अनभिषिक्त सम्राट (आचार्य अत्रे)

मृत्यू

31 जुलै 1865 मध्ये त्यांचे निधन झाले.

Nana Jagannath Shankar Sheth information in marathi

Spread the love

4 thoughts on “Jagannath Shankar Sheth”

 1. Pingback: Dadoba Pandurang Tarkhadkar | Biography in Marathi

 2. Pingback: Gopal Hari Deshmukh | Biography in Marathi

 3. Pingback: Dr. Bhau Daji Lad | Biography in Marathi

 4. Pingback: Raghunath Dhondo Karve | Biography in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!