Karmaveer Bhaurao Patil Biography in Marathi कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 1887 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.
Karmaveer Bhaurao Patil Biography in Marathi
Karmaveer Bhaurao Patil Biography in Marathi कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जन्म 1887 मध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला.
- त्यांचे गाव एतवडे होते त्यांच्या वडिलांचे नाव पायगोंडा पाटील व आईचे नाव गंगाबाई असे होते.
- भाऊराव यांचे बालपण कुंभोज, तासगाव, दहिवडी, विटा यासारख्या गावी गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षणही असेच निरनिराळ्या या गावी झाले.
भाऊराव पाटील विटाच्या शाळेतून मराठी पाचवी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले तेथे त्यांनी इंग्रजी सहाव्या इयतेपर्यंत शिक्षण घेतले मॅट्रिक होण्यापूर्वीच त्यांनी शिक्षण सोडावे लागले.
कोल्हापूरच्या सात वर्षाच्या वास्तव्यात त्यांची शालेय शिक्षणात विशेष प्रगती दिसून आली नाही याच दरम्यान त्यांच्या सत्यशोधक समाजाच्या विचारांचा परिचय झाला आणि ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले या पुढे काही दिवस त्यांनी संस्कृत विषयाच्या शिकवण्या केल्या.
Biography of Karmaveer Bhaurao Patil
कार्य
- काहीकाळ भाऊराव पाटील यांनी ओगले ग्लास वर्क्स व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीचे फिरते विक्रेते म्हणून काम केले.
- त्यांनी निमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर केलेल्या भ्रमंतीत त्यांना बहुजन समाज अज्ञान व अंधश्रद्धा यामध्ये फार अडकून गेला असल्याचे आढळून आले त्यातून त्यांच्यातील समाजसेवक जागे झाला.
- समाजाला त्यातून बाहेर काढल्यास शिक्षणाशिवाय दुसरा मार्ग नाही ही जाणीव झाल्याने त्यांनी महात्मा फुले व राजश्री शाहू महाराज यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचे ठरविले.
- 1910 मध्ये भाऊराव पाटील यांनी दुधगाव येथे काही स्थानिक लोकांच्या मदतीने दुधगाव शिक्षण प्रसारक मंडळ या नावाची संस्था स्थापन केली तिच्यामार्फत दुधगांव विद्यार्थी आश्रम हे वसतिगृह सुरू केले तेथे सर्व जातीधर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत पुढे दूध गावाच्या धर्तीवर नेर्ले व काले या गावी ही भाऊरावांनी स्थापन केली.
- 1919 मध्ये त्यांनी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली.
- 1924 मध्ये भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या वतीने सातारा येथे छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस हे वसतिगृह सुरू केले.
Karmaveer Bhaurao Patil Biography in Marathi
- 1924 मध्ये भाऊराव सातारा येथे वास्तव्यास गेले त्यामुळे रयत शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय साताऱ्यात ठेवण्यात आले.
- 1935 मध्ये भाऊराव पाटील यांनी प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सातारा येथे सिल्वर जुबली रूल ट्रेनिंग कॉलेज सुरू केले.
- 1937 मध्ये झालेल्या प्रांतिक कायदे मंडळासाठी निवडणुकीत मुंबई प्रांत सह अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळ अधिकारावर आली मुंबई प्रांताच्या सरकारने जनतेत साक्षरतेचा प्रसार करण्यासाठी खाजगी शिक्षण संस्था प्राथमिक शाळा सुरू करण्यास प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला.
- भाऊरावांनी या योजनेअंतर्गत सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्राथमिक शाळा उघडल्या परंतु नंतरच्या काळात सरकारने प्राथमिक शाळा स्वतः चालवण्याचा निर्णय घेऊन तो अमलात आणला.
- 1940 मध्ये भाऊरावांनी सातारा येथे महाराज सयाजीराव हायस्कूल या नावाने माध्यमिक शाळा सुरू केली.
- 1947 मध्ये रयत शिक्षण संस्थेने सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नावाचे पहिले महाविद्यालय सुरू केले.
- 1953-54 यावर्षी संस्थेच्या माध्यमिक शाळांची संख्या 44 इतकी होती कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 101 माध्यमिक शाळा सुरू करण्याचा संकल्प सोडला होता व आपल्या हयातीत तो पूर्ण केला.
भाऊराव पाटील यांची शिक्षण संकल्पना
- ‘स्वावलंबन, स्वाभिमान, स्वाध्याय व स्वातंत्र्य‘ ही शिक्षणाची चतुसूत्री होती.
- ‘स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद‘ हे रयत शिक्षण संस्थेचे घोषवाक्य आहे.
- स्वावलंबी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका‘ योजना सुरू केली.
पुरस्कार
भारतात भारत सरकारने पद्मविभूषण हा किताब देऊन त्यांना सन्मानित केले.
पुणे विद्यापीठाने डि.लीट ही संबंध ही पदवी त्यांना बहाल केली.
राष्ट्रपिता महात्मा गांधीनी भाऊरावांच्या कार्याचा गौरव करताना म्हटले होते, “भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तिस्तंभ है“.
मृत्यू
9 मे 1959 रोजी त्यांचे निधन झाले.
Also Read
Mahadev Govind Ranade
Ganesh Vasudeo Joshi
1 thought on “Karmaveer Bhaurao Patil”